पितांबरी पावडरचा उपयोग? Pitamabari powder cha upyog

0
667
पितांबरी पावडरचा उपयोग?
पितांबरी पावडरचा उपयोग?

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंचा उपयोग करत असतो. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक वस्तूचे एक वेगळे स्थान असते एक वेगळे महत्त्व असते. प्रत्येक वस्तू या महत्त्वपूर्ण ठरत असतात. आपण जेवण तयार करण्यासाठी म्हणजे स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगवेगळ्या भांड्यांचा उपयोग करत असतो.

भांड्यांचे प्रकार मध्ये चा अनेक प्रकार आढळून येतात. जसे की स्टील, ॲल्युमिनियम, चांदीचे, तांब्याचे, पितळेचे भांडे असतात. आपण आपल्या गरजेनुसार भांडी वापरत असतो. शिवाय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक वस्तू हे स्वच्छ ठेवणे आवश्यक ठरत असते. एक प्रकारे आपण स्वच्छता राखण्याचे काम करणे महत्त्वपूर्ण ठरते. पूर्वीच्या काळी तांब्याच्या व पितळाच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर केला जात असे. शिवाय,  भांडणांमध्ये जेवण बनवल्यामुळे म्हणजेच अन्नपदार्थ शिजवल्या मुळे त्याचा शरीराला फायदा देखील होत असे. फरकाची प्राचीन काळापासून मातीची, तांबे व पितळ ही भांडे महत्त्वपूर्ण मानली जात होती. त्यांचा जास्तीत जास्त वापर होत असे. तांबे व पितळेची भांडी लवकर देखील खराब होत असे. त्यामुळे या भांड्यांची स्वच्छता ठेवण्यासाठी त्यांना वारंवार कलई करावी लागत असे.

तांबे व पितळेची भांडी जेवण बनल्यामुळे लवकर खराब होऊ नये म्हणून काहीजण त्यांना मातीचा थर देखील लावून त्यावर जेवण बनवत असे. मातीचा थर लावल्यामुळे हे भांडे लवकर खराब होत नव्हती. परंतु ज्यावेळी ची भांडी खराब व्हायचे त्यावेळेस त्यांना स्वच्छ करण्यासाठी अनेक अंगमेहनतीची कामे करावे लागत असे. घरात तांब्या-पितळेची भांडी असल्यामुळे घराला एक वेगळीच चकाकी येते. परंतु त्यासाठी ती स्वच्छ ठेवणे देखील गरजेचे असते. पूर्वीच्या काळी तर तांबे पितळी भांडी स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय केले जात असे. हल्ली तर आता बाजारामध्ये पितांबरी पावडर ही सहज उपलब्ध होत असते. तांब्याची पितळाची भांडी म्हटली म्हणजे पितांबरी पावडर ही हमखास लागते. मित्रांनो पितांबरी पावडर चा उपयोग नेमका काय होऊ शकतो कशाप्रकारे आपण त्याचा उपयोग करू शकतो या विषयाबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. तर मित्रांनो आज आपण पितांबरी पावडर चा उपयोग या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पावडरचा उपयोग या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  पाठीला मुक्का मार लागल्यास काय उपाय करावेत ?

पितांबरी पावडरचा उपयोग: Pitambari powder cha upyog ka krta:

आपल्या घरात तांब्या-पितळेची भांडी असतील तर त्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी पितांबरी पावडर ही हमखास घ्यावीच लागते. पूर्वीच्या काळात पितांबरी हा प्रकार नव्हता.तसेच, पूर्वीच्या काळी तांब्या-पितळेची भांडी ही वापरावी लागत असे. शिवाय, तांब्या-पितळेची भांडी वापरल्यामुळे त्याचे अनेक फायदे शरीराला देखील होत असतात. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवल्यामुळे आणि त्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता ही कमी होण्यास मदत होत असते.

शिवाय, तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते आणि अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. पूर्वीच्या काळी डाळ शिजण्यासाठी पितळाच्या डेग वापर केला जात असे. हे एक प्रकारे मोठे भांडे असे, ज्यामध्ये सर्वांसाठी त्यात वरणाची दाळ शिजवली जात असे. आणि त्यामध्ये बनवलेले जेवण हे पौष्टिक व चवदार देखील बनत असे. हल्ली, या भांड्यांचा उपयोग हा कमी प्रमाणात होत असतो. आजच्या काळात आपण स्टील, ॲल्युमिनियम आणि नॉन-स्टीक च्या भांड्यांना जास्त महत्त्व देत असतो.

पूर्वीच्या काळी तांबे पितळ चे भांडे स्वच्छ ठेवण्यासाठी लोक चिंच आणि राख, लिंबू, लोणचे यांचा उपयोग करून भांडे स्वच्छ ठेवत असेल. शिवाय चींच व राख यांचा वापर करून तांब्याची भांडी व पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी अधिक वेळ देखील लागत असते. पूर्वीच्या काळी घरोघरी तांब्या-पितळेची भांडी असायची जसे की, पितळाचे मोठे पातेले, तांब्याची मोठी घागर, पितळाचे डेग, पाणी तापवण्यासाठी तांब्याचा बंब, पितळाच्या बादल्या म्हणजे जास्तीत जास्त पितळाच्या व तांब्याच्या वस्तू वापरल्या जात असे. आणि त्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी वारंवार कलई करावी लागत असे. परंतु, आताच्या काळामध्ये आपल्याला ही भांडी स्वच्छ ठेवण्यासाठी पितांबरी चा उपयोग करता येतो. बाजारामध्ये कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला पितांबरी सहज उपलब्ध होते.

वाचा  फुटाणे खाण्याचे फायदे

खरंतर पितांबरी चा शोध हा श्री. रविंद्र प्रभुदेसाई यांनी लावला. त्यांनी बनवलेल्या पितांबरी चा उपयोग आज घरोघरी होताना दिसून येतो. देवघरातील देव हे देखील पितळाची असतात. देवघरातील देव स्वच्छ राहावेत यासाठी देखील आपण पितांबरी चा उपयोग करून त्यांना स्वच्छ ठेवू शकतो.

पितळ व तांबे यांची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण पितांबरी चा सहज वापर करून स्वच्छ ठेवू शकतो. शिवाय, पितांबरी पावडर वापरल्यामुळे याची देखील बचत होत असते. तांब्याच्या पितळाच्या भांड्यांना पितांबरी लावल्यामुळे ही भांडी लवकर स्वच्छ होत असतात. शिवाय, यांना एक प्रकारे शायनिंग देखील येत असते. घरात कुठलिही  पूजा असो, समारंभ असो अशा वेळेस आपणा तांबा पितळाचे भांडे ही लागतच असतात. आणि त्यावेळेस आपण पटकन हि भांडे  पितांबरी पावडरचा उपयोग करून स्वच्छ करू शकतो. पितांबरी चा पावडरचा उपयोग फक्त तांब्याच्या व पितळाच्या भांड्यांसाठी होतोच असे नाही, तर आपण स्टिलच्या भांड्यांचा साठी देखील पितांबरी पावडर चा उपयोग करू शकतो. घरोघरी स्टीलचे मोठे डबे देखील असतात. स्टीलचे डबे अथवा स्टीलची भांडी घासण्यासाठी आपण पितांबरी पावडरचा उपयोग करू शकतो. स्टीलचे भांडे आपण फक्त साबणाच्या मदतीने स्वच्छ केली तर त्यांना एक प्रकारे शायनिंग एवढी येत नसते.

जर स्टीलच्या बाटल्या, डबे, स्टीलची भांडी, बादल्या कळशी, हंडा यांना चमक यावी, ही भांडी शायनिंग करावे यासाठी आपण पितांबरी पावडरचा उपयोग करू शकतो. त्यासाठी, पितांबरी पावडर व्यवस्थित भांड्यांना लावून घ्यावी व एकदम हळुवारपणे ही भांडे पितांबरी पावडर ने हलक्या हाताने घासावी. म्हणजे सर्कुलर मोशन मध्ये पितांबरी पावडर लावून या भांड्यांना हळुवारपणे घसावे.

त्यामुळे या भांड्यांना लवकर शायनिंग येते व हे भांडे चमकण्यासाठी मदत होऊ शकते. पितांबरी पावडर चे उपयोग स्टील च्या भांड्यावर एकदम हळुवारपणे करावा जर जास्त घासले तर त्यांना क्रॅश पडू शकतात. म्हणून हलक्या हाताने पितांबरी चा उपयोग करावा. तसेच, देव घरातील समई, तांब्याचे व पितळाची दिवे, तांब्याचा तांबा, ताटल्या हि स्वच्छ ठेवण्यासाठी देखील आपण पितांबरी पावडर ओपन करू शकतो. पितांबरी पावडर चा उपयोग भांड्यांना केल्यामुळे एक प्रकारे भांडी स्वच्छ तर होतच असतात परंतु, विशिष्ट चमकदार, शायनिंग देखील भांड्यांना येत असते.

वाचा  टमाटर चे फायदे

त्यामुळे, आपले घरातील भांडे हे चमकू शकतात. तर मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या घरातील भांडे चमकावे शायनिंग करावे असे वाटत असेल तर नक्कीच मी पितांबरी पावडरचा उपयोग करायला हवा. एक प्रकारे तुमच्या घरातील स्वच्छ, शायनिंग व चमकदार भांडणामुळे तुमचे घर चमकू लागेल. तर मित्रांनो,  तुम्ही देखील पितांबरी पावडरचा उपयोग घरातील भांडी स्वच्छ ठेवण्यासाठी करून बघू शकतात.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here