नॉनस्टिक भांड्यात जेवण बनवताना काय काळजी घ्यावी? Non sticky bhandyat jevan kase banval

0
504
नॉनस्टिक भांड्यात जेवण बनवताना काय काळजी घ्यावी?
नॉनस्टिक भांड्यात जेवण बनवताना काय काळजी घ्यावी?

नमस्कार मित्रांनो. जेवण तयार करण्यासाठी म्हणजे स्वयंपाक तयार करण्यासाठी आपण योग्य प्रकारचे भांडे देखी वापरणे महत्त्वाचे ठरत असते. फार पूर्वीच्या काळी लोक जेवण तयार करण्यासाठी अन्न शिजवण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करत होते. मातीच्या भांड्यात अन्न शिजवले मुळे सर्व पोषक घटक त्यांतून मिळत असे. शिवाय मातीच्या भांड्यात जेवण बनवल्यामुळे अन्न शिजवले यामुळे त्यातील सर्व प्रकारचे विटामिन्स पोषक घटक पोषक तत्व हे त्यातून जसेच्या तसे मिळत होते त्यातील कुठल्याही प्रकारची गुणवत्ता कमी होत नव्हती. आज-काल रोजचे जेवण बनवण्यासाठी वेगवेगळे प्रकारची भांडी वापरली जातात.नॉनस्टिक भांड्यात जेवण बनवताना काय काळजी घ्यावी?

जसे की स्टील ॲल्युमिनियम नॉनस्टीक भांडे प्रचलित झालेली आहेत. आणि रोजचे जेवण बनवण्यासाठी आपण हमखास ये भांड्यांचा वापर करत असतो. यामध्ये जेवण तयार करायचा ना वेळेची बचत तर होतेच, परंतु आपण जे पदार्थ ज्यांना त्यामध्ये शिजवत असतो तर त्यातील गुणवत्ता ही कमी प्रमाणात झालेली असते म्हणजे मोजून फक्त दोन ते तीन टक्केच आपल्याला त्यातून फायदा होतो बाकी 85 ते 87% आपल्याला त्यातून विटामिन्स पोषक घटक पोषक तत्व ही मिळत नाहीत. परंतु जर आपण या ऐवजी मातीची भांडी वापरत असाल तर त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारचे म्हणजे शंभर टक्के त्यातून रिझल्ट मिळत असतो. म्हणजेच आपण जे काही अन्नपदार्थ शिजत असतो त्यातून एकही घटक हा कमी होत नाही तर त्यातून जसेच्या तसे जीवनसत्त्वे ही आपल्याला मिळण्यास मदत होत असते. परंतु आजकाल धावपळीच्या जगात मुळे म्हणजेच कामाची बचत व्हावी यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर न करता आपण स्टीलची, ॲल्युमिनियम ची व नॉनस्टिकची भांडी वापरत असतो. शिवाय मातीचे भांडे वापरणे ही देखील खूपच सांभाळून वापरावे लागत असतात.नॉनस्टिक भांड्यात जेवण बनवताना काय काळजी घ्यावी?

माणसाच्या काल मातीचे भांडे कोणी वापरताना जास्त दिसून येत नाही. स्टीलची भांडी आणि आमची भांडी वापरताना देखील त्याला बनवलेले पदार्थ चिकटण्याची समस्या येत असते. त्यामुळे भांडी घासण्याचा देखील त्रास होत असतो. शिवाय या भांडण मध्ये तेलाचा वापर जास्त करावा लागत असतो. म्हणून आज काल नॉनस्टिकची भांडी यांचा सर्रास वापर होताना दिसून येत असतो. जेवण बनवण्यासाठी पदार्थ बनवण्यासाठी जर आपण नॉनस्टिकची भांडी वापरत असाल तर आपल्या वेळेची बचत देखील होत असते शिवाय, नॉन स्टिक च्या भांड्यांमध्ये तेलाचा वापर देखील कमी होत असतो.  नॉनस्टिकची भांडी जर तुम्ही वापरत असाल, तर ती भांडी वापरण्यासाठी विशेष काळजी देखील घ्यावी लागत असते. नॉन स्टिक च्या भांड्यामध्ये जेवण बनवताना आपण व्यवस्थित प्रकारे काळजी घेणे महत्त्वाचे ठरत असते. तर नेमकी ती काळजी कशी घ्यावी, याविषयी आपल्या माहिती असायला हवी. तर मित्रांनो, आज आपण नॉनस्टिक भांड्यात जेवण बनवताना काय काळजी घ्यावी? या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, जर तुम्ही देखील नॉनस्टिकची भांडी वापरत असाल तर नॉनस्टिकची भांड्यात जेवण बनवताना काय काळजी घ्यावी? या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

वाचा  त्रिफळा चूर्ण चे फायदे

नॉन स्टिक च्या भांड्यात जेवण बनवताना काय विशेष काळजी घ्यावी? non sticky bhandyat jevan bnvatanna ky kalji ghyavi:

पूर्वीच्या काळी मातीची, तांब्याची पितळाची भांडी प्रामुख्याने ही जेवण करण्यासाठी वापरली जात असे. मातीची भांडी वापरायची म्हणजे तेवढीच काळजी देखील घ्यावी लागत असे. शिवाय तांब्याची व पितळाचे भांडे ही जेवणासाठी वापरली जात होती परंतु त्यांची देखील विशेष काळजी घ्यावी लागत असे तसेच, ही भांडी खराब होऊ नये यासाठी त्यांना कलई देखील करावी लागत असे. परंतु हल्लीच्या काळात नॉन स्टिक च्या भांड्यांना जास्त महत्त्व दिले जात आहे.

ॲल्युमिनियम ची व स्टीलची भांडी वापरल्यामुळे त्यांना अन्न हे चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे भांडी घासण्याचा देखील वेळ जात असतो. म्हणून आजकाल बरेच जण नॉनस्टिकची भांडी वापरत असतात. नॉनस्टिकची भांडी वापरल्यामुळे तेलाची देखील बचत होते. पर्यंत नॉनस्टिक ची भांडी वापरताना म्हणजे त्यामध्ये जेवण बनवताना विशेष काळजी घ्यावी लागत असते. नाहीतर नॉनस्टिकची भांडी देखील लवकर खराब होऊ शकतात. तर नॉनस्टिकची भांडी मध्ये जेवण बनवताना काय विशेष काळजी घेतली पाहिजे. नॉनस्टिक ची भांडी कशी जपली पाहिजेत? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

  • नॉन स्टिक च्या भांड्यात जेवण बनवताना स्टीलचे चमचे भाजी बनवण्यासाठी वापरू नयेत. कारण नॉन स्टिक च्या भांड्यांमध्ये स्टीलचे चमचे वापरल्यामुळे त्यांची लेयर निघण्याची शक्यता असते. म्हणून नॉनस्टिकची भांडी यामध्ये जेवण बनवताना तुम्ही शक्यतो लाकडी चमच्याच वापर करावा. लाकडी चमचे वापरल्यामुळे नॉनस्टिकची भांडी खराब होत नाही शिवाय ते दीर्घकाळ देखील टिकून राहण्यास मदत होत असते.
  • नॉन स्टिक च्या भांड्यात जेवण बनवताना अतिरिक्त केला जास्त वापर करू नये. नॉन स्टिक च्या भांड्यांमध्ये तेल ही थोडेसेच वापरावे लागत असते. शिवाय नॉन स्टिक भांड्यामध्ये तेलाची जास्त आवश्यकता नसते. आपण कमी तेला मध्ये या भांड्यात चांगल्या प्रकारचे अन्न शिजवू शकतो. जर नॉनस्टिक भांडे यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तेलाचा वापर करत असाल, तर त्यामुळे त्याची लेयर हे खराब होण्याची शक्यता असते. आणि जर नॉनस्टिक भांड्यांची लेयर जर खराब झाली तर या भांड्याचा उपयोग देखील जास्त होत नाही.
  • नॉनस्टिक ची भांडी घासताना त्यावर जाडसर साबणाचा व तारेच्या घासणीचा अजिबात वापर करू नका. नॉन स्टिक च्या भांड्यांसाठी तारेचे घासणे वापरणे चुकीचे ठरते. कारण, यामुळे ताऱ्याच्या घासण्याचे घर्षण होऊन त्याची लेयर निघून जाऊ शकते. शिवाय, जाडसर साबणाने तारेच्या घसणीच्या साह्याने नॉनस्टिक ची भांडी ही घसा घसा घासल्याने त्यावर क्रॅश देखील लवकर पडतात. त्यामुळे भांडे लवकर खराब होतात.
  • नॉनस्टिक च्या भांड्यामध्ये जेवण बनवल्यानंतर ते जेवण थंड होण्याच्या आत दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे. आणि जोपर्यंत थोडे भांडण कोमट असेल तोवर त्याला चांगल्या प्रकारे साफ करून घ्यावे. असे केल्यामुळे ही भांडे लवकर स्वच्छ होते. शिवाय, त्याला घसनीने घासण्याची गरज देखिल पडत नाही.
  • नॉन स्टिक च्या भांड्यामध्ये जेवण तयार करताना एकदम फुल गॅस करू नका. कारण, यामुळे हि भांडे लवकर तापतात आणि त्यामुळे त्यांची लेयर खराब होण्याची शक्यता असते. म्हणजेच, ही भांडी अतिउष्णतेमुळे म्हणजे जास्तीत जास्त गरम झाल्यामुळे खराब होण्याची शक्यता असते. शिवाय, जर कमी फूल गॅस करून त्यावर जेवण बनवत असाल तर त्यामुळे पदार्थ देखील त्यावर चिकटण्याची शक्यता असल्याने चिकटलेले पदार्थ काढण्यासाठी तुम्ही त्या भांड्यांना घासणार जास्त घसल्यामुळे त्या भांड्याचे लेयर लवकर जाऊ शकते. आणि जर नॉनस्टिक भांड्यांची लिव्हर खराब झाले तर ही भांडी उपयोगात पडत नाहीत. म्हणून तुम्ही नॉनस्टिक भांड्यात जेवण बनवताना मिडीयम गॅस ठेवावा.
  • नॉनस्टिक ची भांडी जेवण तयार केल्यानंतर ती घासताना विशेष काळजी घ्यावी. म्हणजेच, नॉनस्टिक ची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही फायबरच्या घसनीचा वापर करू शकतात. तसेच, भांडी घासण्यासाठी जाडसर साबणाचा उपयोग न करता मऊ साबणाचा उपयोग करावा. जर तुम्ही नॉन स्टिकच्या भांड्यांची विशेष काळजी घेत असाल, तर तुमची नॉनस्टिकची भांडी ही 6-7 वर्ष आरामात निघून जाऊ शकतात.
  • नॉनस्टिकची भांडी ही जागेवर ठेवण्यासाठी ती स्वच्छ धुऊन झाल्यावर तसेच, कोरडी झाल्यावरच ठेवावीत. शिवाय, नॉनस्टिकची भांडी ठेवताना त्यावर इतर भांड्यांचे क्रॅश तर पडणार नाही ना किंवा इतर भांड्यांचे घर्षण तर होणार नाही ना याची विशेष काळजी घ्यावी.
  • नॉनस्टिक ची भांडी ही स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकतात. बेकिंग सोडा च्या साह्याने तुम्ही नॉनस्टिकची भांडी व्यवस्थित स्वच्छ करून ठेवू शकतात.
वाचा  टाळूला फोड येणे

तर मित्रांनो, नॉन स्टिक च्या भांड्यांमध्ये जेवण बनवताना शक्यतो तुम्ही लाकडी चमचे यांचा वापर करावा. लाकडी चमचे जेवण बनवताना वापरल्यामुळे नॉनस्टिक च्या भांड्याची लेअर निघत नाही शिवाय, त्यावर क्रॅश देखील पडत नाही. नॉन स्टिक च्या भांड्यांमध्ये जेवण बनवताना तेलाचा वापर देखील कमी करावा लागतो. त्यामुळे त्याची देखील बचत होते. परंतु नॉन स्टिक च्या भांड्यात जेवण तयार करताना तुम्ही नॉनस्टिकची भांड्यात त्यामध्ये काही टाकण्याआधीच अगोदरच अधिक तापवू नका.

म्हणजे, त्याला प्री हिट करणे असे देखील म्हणू शकतो. परंतु, असे केल्यामुळे नॉनस्टिक भांड्यांची लिटर लवकर निघून जाऊ शकते. नॉन स्टिक च्या भांड्यांसाठी त्यांची लेयर त्यांची कोटिंग हे फार महत्वपूर्ण ठरत असते. जर नॉनस्टिक भांड्यांची लेयर ही निघून गेले तर या भांड्यांचा उपयोग होत नाही लेअर निघाल्यावर अशा वेळेस तुम्ही हे भांडे वापरणे देखील अयोग्य ठरते. म्हणून, यामध्ये जेवण बनवताना तुम्ही वरील प्रमाणे, सर्व प्रकारची काळजी घ्यावी. जेणेकरून, तुमची भांडे ही दीर्घकाळ टिकून राहू शकतील.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कसे वाटली, ते तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here