कमरेचा घेर कमी करण्यासाठी उपाय

0
2073
कमरेचा घेर कमी करण्यासाठी उपाय
कमरेचा घेर कमी करण्यासाठी उपाय

नमस्कार, आज आपण बघणार आहोत कमरेचा घेर कमी करण्यासाठी उपाय. आजकालचे जगामध्ये आपल्या शारीरिक आयुष्याकडे लक्ष असणे फार गरजेचे झालेले आहे. कारण जर आपण आपल्या शरीराकडे त्याच्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले नाही तर पुढे जाऊन आपल्याला याचे गंभीर परिणाम सोसायला लागू शकतात. तर आजकाल आपण बघतो की बरेच दिवस कामांमध्ये इतके गुंतून जातात. की त्यांना आपल्या स्वास्थ्याचे भानच उरत नाही आणि आपण जर आपल्या त्याच्या कडे लक्ष देत नसू तर आपल्याला बरेचसे आजारांना देखील तोंड द्यावे लागू शकते.

त्याच बरोबर आपण कामांमध्ये असताना किंवा बाहेर असताना बऱ्याचदा फास्ट फूडचे सेवन करतो. त्याचा देखील आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो कारण आपल्या शरीरामध्ये जमा होतात आणि आपले वजन वाढत जाते. जास्त वजन असणे देखील चांगले नाही कारण आपल्याला रोजच्या काम करण्यास देखील बऱ्याच अडचणी येऊ शकतात. एका जागी बसूनच खूप काम करायला लागू शकते आणि कुठे फिरायला जात असेल किंवा कुठे बाहेर जायचे असेल तर आपल्याला तरी आपल्याला कंटाळा येतो. कारण आपली शारीरिक दृष्ट्या पण खूप जाड झालं असू तर आपल्याला कुठेही जाण्यासाठी फार संघर्ष करायला लागू शकतो. 

याच प्रकारे तुम्हाला देखील लठ्ठपणाचा त्रास जाणवत असेल किंवा तुमच्या कमरेचा घेर वाढला असेल तर मित्रांनो काळजी करण्याचे कारण नाही. कारण आज आपण घेऊन आलो आलो आहोत थोडीशी माहिती आपण बघणार आहोत की जर तुमचं कमरेचा घेर वाढला असेल तर तुम्ही तुमचा कमरेचा घेर कोणत्या पद्धतीने व कशा कमी करू शकतो तोही अगदी घरगुती उपायांनी चला तर मग बघुया.

कमरेचा घेर वाढण्याची कारणे कोणती ?

तर आपण कमरेचा घेर वाढणे बद्दल थोडी माहिती बघितली तर आता आपण बघणार आहोत कमरेचा घेर वाढण्याला कोणकोणते घटक कारणीभूत आहेत. जेणेकरून आपल्याला आपला कमरेचा घेर कमी करण्यासाठी मदत होईल.

वाचा  जुळी मुलं का आणि कशी जन्माला येतात

बदलती जीवनशैली आणि राहणीमान :

आपल्या लठ्ठपणाला व आपल्या कमरेच्या घेरला आपली बदलती जीवनशैली व राहणीमान कारणीभूत ठरू शकते. अवेळी जेवण तसेच सतत काम आपल्या आरोग्याकडे लक्ष न देणे या सर्व छोट्या छोट्या गोष्टींमुळे देखील आपल्या शरीरावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे आपल्या शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जसे की अवेळी जेवण केल्यामुळे आपल्या पचन क्रिया मध्ये बिघाड होणे तसेच पचनशक्ती कमी होणे अशा बऱ्याच समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागू शकते.

फास्ट फूडचे अतिसेवन/स्ट्रीट फूड :

बऱ्याच वेळेस आपण ऑफिसमध्ये असतो किंवा कामांमध्ये गुंतलेले असलो की आपण आपल्या आहाराकडे देखील दुर्लक्ष करतो आणि मग आपल्याला जर भूक लागली तर छोटे-मोठे पदार्थ खातो. फास्ट फूडचे सेवन करतो आणि फास्ट फूडचे सेवन केल्यामुळे आपले पोट भरत नाही. पण आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज मिळतात आणि आपल्या शरीरातील फॅट वाढत जातो. तर तुम्ही मुख्यता या फास्ट फूडचे सेवन टाळले पाहिजे आले पाहिजे.

सतत एकाच ठिकाणी बसून काम करणे :

आपण बऱ्याच वेळेस कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना एकाच ठिकाणी तासन्तास बसून काम करतो. याचा सरळ सरळ परिणाम आपल्या कमरेचा घेर वर होतो. किती वेळ आपण जेवण झाल्यानंतर आराम करत नाही. सर्व काम एका ठिकाणी बसूनच करतो आणि शरीराची कमी हालचाल झाल्यामुळे देखील जेवलेले अन्न हे पचत नाही. म्हणून तुम्ही काम करताना थोडीशी शरीराची हालचाल करावी तसेच थोडा थोडा वेळ नंतर आपल्या कामाची जागा बदलली.

कमरेचा घेर कमी करण्यासाठी उपाय :

कमरेचा घेर वाढण्याचे आपण कारण तर बघितले. आता आपण जाणून घेऊया की आपल्या कमरेचा घेर जर वाढला असेल तर तो आपण कसा व कोणत्या उपायांनी कमी करू शकतो चला तर मग जाणून घेऊया.

व्यायाम करावा :

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा कमरेचा घेर कमी करायचा असेल तर तुम्हाला सोपा आणि चांगला एकच उपाय म्हणजे तो म्हणजे व्यायाम कारणे. व्यायाम केल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीज जळतात म्हणजेच कमी होतात आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही दिवसभरातून एक तास का होईना पण तुमच्या शरीराला दिलाच पाहिजे. याच प्रकारे तुम्ही व्यायाम करताना जर तुम्ही व्यायाम शाळामध्ये जाऊन व्यायाम करू शकता.

वाचा  घरातील पाली घालवण्यासाठी उपाय

तर अति उत्तम पण जर का तुम्ही व्यायामशाळेत जाऊन करू शकत नसाल तर तुम्ही रोज सकाळ-संध्याकाळ चालावे किवा पळावे. त्यानंतर तुम्ही जेवण झाल्यावर अनवाणी गवतावर देखील चालू शकता तर अशा प्रकारचे कोणताही व्यायाम करावा. जेणेकरून तुमचा कमरेचा घेर कमी होण्यास मदत होईल.

आहार :

आपल्या कमरेचा घेर वाढण्यासाठी आपला आहार देखील तितकाच कारणीभूत आहे. कारण आपला जर आहारामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली तर त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. जर आपल्या आहारामध्ये हाय कॅलरीज असतील तर ते कमी करून त्यामध्ये सलाड, फळे अशा पदार्थांचा समावेश करावा. दिवसभर मधून एक तरी फळ खावे तुमचा एक विशिष्ट डायट बनवा आणि त्यानुसारच तुमचा आहार घ्या आहारामध्ये उकडलेले पदार्थांचा समावेश करा.

आहाराची वेळ :

तुम्हाला जर कंबर कमी करायची असेल तर तुम्ही आहाराची वेळ बदलली पाहिजे. म्हणजेच अवेळी जेवण टाळले पाहिजे त्याचबरोबर तुम्ही जर दोन वेळेस जेवत असाल तर ते चार वेळेस करावे. म्हणजेच आपला आहार जितका असतो तो चार भागांमध्ये वाटून द्यावा आणि थोडे थोडे करून थोड्या थोड्या वेळाने खावे एकदमच जास्त प्रमाणामध्ये खाने टाळावे.

पुरेशा प्रमाणात पाणी प्या :

तुम्ही जर पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिले तर तुमची किडनी किंवा पोटाच्या निगडी तुम्हाला समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागणार नाही. तसेच तुमचे रक्त देखील शुद्ध राहील तुमची त्वचा देखील तेजस्वी राहण्यास मदत होईल. पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिल्याने तुम्हाला पचनास संबंधित देखील कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या समस्या कमी होण्यास देखील मदत होईल आणि याच बरोबर कमरेचा घेर कमी होण्यास देखील मदत होईल.

योगासने :

आपल्याला तर योगाचे महत्त्व तर माहितीच असेल पूर्ण जगाने योग ला त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक मानले आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर कमरेचा घेर कमी करायचा असेल तर योगा हा त्यावर रामबाण उपाय आहे. तुम्ही मुख्यता पोटाची योगासने करावी जेणेकरून तुमच्या पोटाचा घेर व कंबरेचा घेर कमी होईल.  मुख्यता योगासन हे कोणत्याही प्रकारच्या व कोणत्याही वयाचा माणूस करू शकतो याला कोणत्याही प्रकारची अट किंवा वय मर्यादा नाही आहे.

वाचा  मोड आलेले मूग खाण्याचे फायदे जाणून घेऊया काय आहेत?

तर मित्रांनो आज आपण जाणून घेतले आपल्या कमरेचा घेर दर वाढला असेल तर आपण कमरेचा घेर कसा कमी करू शकतो. याचप्रकारे कमरेचा घेर वाढण्याची कारणे देखील आपण जाणून घेतली. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here