मैदानी खेळ खेळण्याचे फायदे

0
2724
मैदानी खेळ खेळण्याचे फायदे
मैदानी खेळ खेळण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया मैदानी खेळ खेळण्याचे फायदे याबद्दलची माहिती. पूर्वीच्या काळी इलेक्ट्रिक वस्तू या कमी प्रमाणात असायच्या. आणि त्यापूर्वीच्या काहीतरी इलेक्ट्रिक वस्तू नव्हत्याच. आज काय तर घरोघरी इलेक्ट्रिक वस्तू आढळून येतात. संगणक, मोबाईल, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादी वस्तू तरी आता घरोघरी बघायला मिळते. हल्ली तर घरातील लहान मुलं हे घराबाहेर खेळण्याची घरातच बसून गेम खेळत असतात. आजकाल घरोघरी तुम्हाला लहान मुलांच्या हातात मोबाईल बघायला मिळेल. आमच्या काळात आम्ही मैदानी खेळ खूप खेळायचो. शाळेत देखील मैदानी खेळ खेळले जायचे. शिवाय शाळा सुटल्यानंतर आम्ही घरी दप्तर ठेवला नंतर लगेच खेळायला तसेच जायचो. अगदी जेवण करण्यासाठी देखील आमच्या आई ओढून घरी न्यायची. मैदानी खेळ खेळण्यात एक वेगळीच मजा असते.

मैदानी खेळ म्हटले की, कबड्डी बॅट बॉल, लपंडाव, लगोरी, फुटबॉल, विटी दांडू, पकडा-पकडी हे खेळ खेळण्यात खूपच मजा येत असे. शिवाय मैदानी खेळ खेळायला मुळे आमची उंची वाढण्याचा त्रास देखील आम्हाला जाणवला नाही. त्याचप्रमाणे मैदानी खेळ खेळायला मुळे आम्हाला भूक देखील जास्तीची लागायची त्यामुळे आम्ही आजारी देखील लवकर पडलेले कारण मैदानी खेळ खेळायला मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढत आणि असे खेळ खेळल्यामुळे आपल्या शरीराचा थकवा देखील जात असतो.

परंतु आजकालची पिढी मात्र घरातच बसून मोबाईल गेम अथवा टीव्ही वर गेम खेळताना दिसून येते. त्यामुळे त्यांच्या लठ्ठपणा देखील वाढताना दिसून येतो. सतत घरात बसून गेम खेळणे कुठल्याही प्रकारची जास्त हालचाल न करणे यामुळे त्यांचा लठ्ठपणा तर वाढतो शिवाय त्यांच्या मेंदूचा विकास हा देखील कमी प्रमाणात होतो. हल्ली मुले हे घरातच बसून खेळणे पसंत करतात. सतत मोबाईल मध्ये गेम खेळत बसणे नाही तर यूट्यूब चैनल तरी बघत बसणे इत्यादी मध्ये वेळ घालवत असतात. त्यामुळे जर घरात सतत बघत राहिले मैदानी खेळ खेळले नाहीत तर त्यांची उंची देखील वाढणार नाही शिवाय ते गोलू-मोलू होत जातील.

मित्रांनो घरातल्या मुलांचे आरोग्य चांगले रहावे तसेच त्यांचे शारीरिक क्षमता चांगल्या पटीने वाढावी त्यासाठी तुम्ही त्यांना मैदानी खेळ खेळण्याची सवय लावली पाहिजे. मैदानी खेळ केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. मैदानी खेळ खेळणे म्हणजे एक प्रकारे व्यायाम केला जात असतो. मैदानी खेळ खेळणे मध्ये शरीराच्या हालचाली होऊन व्यायाम होत असतो. मैदानी खेळ खेळल्यामुळे अजून कोणत्या प्रकारचे फायदा आपल्याला होऊ शकतात शिवाय मैदानी खेळ खेळला पाहिजे याबद्दल आपला माहिती असायला हवी. तर मित्रांनो आज आपण मैदानी खेळ खेळण्याचे फायदे या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मैदानी खेळ खेळण्याचे फायदे या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध

मैदानी खेळ खेळण्याचे महत्त्व:-

पूर्वीच्या वेळी लहान मुले जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळणे वर भर देत असे. शिवाय मैदानी खेळ खेळण्यास मुलांना आवडत देखील असे. शाळांमध्ये मैदानी खेळ हे तर खेळवले जायचेच. तरीपण मुले घरी आल्यावर दप्तर तसेच टाकून पुन्हा बाहेर खेळण्यास पडत असे. परंतु आजकाल लहान मुलेही घरातच बसल्याबसल्या गेम खेळताना दिसून येतात. घरोघरी बघितले तर लहान मुलांचे हायामध्ये तुम्हाला मोबाईल आढळून येईल. हल्लीच्या काळात मोबाईल चे इतके वेड लागले आहेत की, लहान मुलेच काय मोठी माणसं देखील मोबाईल मध्ये वेळ घालताना दिसून येते.

परंतु जर आपण आपल्या सवयी बदलल्या तरी त्याचा परिणाम हा आपल्या मुलांवर देखील होईल. लहान मुले जर मोबाईल खेळत असतील घरातलेच गेम खेळत असतील तर तुम्ही त्यांना मैदानी खेळ खेळण्यात शिकवले पाहिजे. स्वतःहून त्यांना मैदानी खेळ खेळवले पाहिजे. शिवाय आजकाल मुलांवर अधिक अभ्यास करण्याची टेंशन देखील आलेले दिसून येते. त्यात असून पालक त्यांच्यावर अभ्यास करण्याचा जोर देत असतात. आधी त्यांच्यावर अभ्यास करण्याचे टेन्शन शिवाय त्यांच्यावर तुम्ही अजून जर अभ्यासाचा जोर देत असाल, तर त्यामुळे तुमच्या मुलांनी वर मानसिक टेन्शन, मानसिक ताण तणाव देखील येऊ शकते.

ज्या वेळेस त्यांना थोडा वेळ नाही भेटत असेल तर अशा वेळेस ते त्यांच्या वेळेस हा टीव्हीमध्ये कार्टून बघण्यात घालवत असतात नाहीतर मोबाईल खेळण्यात बघण्यात वेळ घालवतात. मुलांच्या या सवयी बदलणे आपल्या हातात असते आपण मुलांना योग्य त्या सगळ्यांची ओळख करून दिली पाहिजे. अभ्यास करून जास्त असतो शिवाय जेवण थोडा फ्री वेळ भेटत असेल तर अशा वेळेस तुम्ही त्यांना घरातले गेम न ठेवता त्यांना मैदानी गेम खेळायला पाठवायला हवे. जेणेकरून त्यांच्या अभ्यासाचा ताण तणाव हा थोडा वेळ कमी होऊन त्यांची शारीरिक हालचाल व्यवस्थित होऊन त्यांचे आरोग्य देखील सुधारू शकते.

वाचा   कानाचे ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी

मैदानी खेळ खेळल्यामुळे आपल्या शरीराच्या कसरती होत असतात एक प्रकारे व्यायाम होत असतो. त्यामुळे तुम्ही मुलांना खेळ खेळण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे शिवाय त्यांच्या मेंदूचा विकास देखील व्यवस्थित होण्यास त्यांना मदत होऊ शकते. मैदानी खेळ खेळण्यासाठी मुले हे एकत्रित जमत असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये एकात्मता निर्माण होत असते. शिवाय मुले एकत्र खेळत असताना जर कुणाला दुखापत झाली तर त्यांच्यामध्ये सहन करण्याची ताकद म्हणजे सहनशीलता, मदत करण्याची वृत्ती या भावना निर्माण होतात. मैदानी खेळ खेळायला म्हणून मुले एकत्र जमून खेळ खेळत असतात. त्यामुळे एक प्रकारे त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती तयार होते. मैदानी खेळामुळे अनेक प्रकारचे फायदे हे मुलांना होऊ शकतात त्यामुळे तुम्ही त्यांना मैदानी खेळ खेळाचे महत्त्व पटवून द्यायला हवे.

मैदानी खेळ खेळण्याचे फायदे:-

मैदानात खेळ खेळाचे महत्व हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. मैदानी खेळ खेळला माहिती आणि प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात शिवाय आपल्या आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते. तर मग मित्रांनो, मैदानी खेळ खेळल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात?  याबद्दल आपण आता जाणून घेऊया.

  • मैदानी खेळ खेळल्यामुळे आपल्या शरीराच्या हालचाली होत असतात. त्यामुळे आपल्या शरीराच्या अवयवांची कार्यक्षमता देखील चांगली वाढण्यास मदत होते.
  • मैदानी खेळ खेळल्यामुळे बुद्धीचा विकास होतो शिवाय बुद्धीला चालना मिळते गती मिळते.
  • मैदानी खेळ खेळताना मुले एकत्रित खेळत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये संघभावना, एकात्मता निर्माण होते. एकोपा राहतो.
  • मैदानी खेळ खेळायल्यामुळे स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते. शिवाय, आत्मविश्वास वाढण्यास देखील मदत होत असते.
  • मैदानी खेळ खेळल्यामुळे जिज्ञासू वृत्ती देखील वाढण्यास मदत होते.
  • मैदानी खेळ खेळल्यामुळे शारीरिक हालचाली व्यवस्थित होऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते शिवाय थकवा देखील निघून जाण्यास मदत होते.
  • मैदानी खेळ खेळल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.
  • मैदानी खेळ खेळल्यामुळे आपल्या शरीरात एनर्जी वाढते उत्साह टिकून राहण्यास मदत होते.
  • घरात बसून बसून मोबाईल खेळत बसणे नाहीतर टीव्हीवरचे कार्टून बघत बसणे यामुळे मुलांचे वजन वाढत जाते पण आहे जातो शिवाय त्यांच्या बुद्धीला पाहिजेत अशी चालना मिळत नाही बुद्धीचा विकास होत नाही. परंतु मैदानी खेळ खेळल्यामुळे बुद्धीचा विकास हा वृद्धिंगत होतो. शिवाय मुलांच्या शारीरिक हालचाली झाल्यामुळे त्यांचे वजन हे नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • मैदानात खेळ खेळायला मुळे शरीराला एक प्रकारे लवचिकता प्राप्त होते. थोडी तरी खर्च केल्याशिवाय दुखापत झाली तरी त्याचा जास्त त्रास होत नाही शिवाय सहनशीलता हे भावना देखील निर्माण होत असते.
  • मैदानी खेळ खेळल्यामुळे मुलांना भूक देखील चांगल्याप्रकारे लागते. शिवाय, त्यांची झोप पूर्ण होते. ज्यामुळे त्यांचा शरीरातील थकवा हा पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते.
  • मैदानी खेळ खेळायला मुळे आपल्या शरीराची पचनक्रिया हे व्यवस्थित व सुलभ रीतीने सुरळीत राहते. त्यामुळे आपल्याला अपचनाचा त्रास होत नाही.
  • मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीराची उंची देखील चांगल्या प्रकारे वाढते.
  • मैदानात जाऊन खेळ खेळल्यामुळे शरीराचा आकार देखील व्यवस्थित होण्यास मदत होते. शिवाय मैदानी खेळ खेळायला मुळे एक प्रकारे संपूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो त्यामुळे आपण दीर्घकाळ तरुण दिसण्यास मदत होते.
  • मैदानी खेळ खेळायला मुळे आपल्या केसांचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होते शिवाय आपल्या केसांची वाढ ही चांगल्या रीतीने होते व केस गळतीची समस्या देखील नष्ट होण्यास मदत होते.
वाचा  ग्राईप वॉटर चे फायदे व उपयोग

मित्रांनो, मैदानी खेळ खेळण्याची किती महत्त्व आहे शिवाय मैदानी खेळ झाल्यामुळे किती प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात याबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतली आहे. तुम्ही देखील तुमच्या मुलांना फक्त घरात बसून गेम, मोबाईल, टीव्हीवरील कार्टून बघणे, यामध्ये गुंतवून न ठेवता मैदानी खेळ खेळण्याचे महत्व पटवून द्यावे. मैदानी खेळ खेळायला मुळे मुलांचा शारीरिक विकास हा चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. शिवाय, त्यांच्या बुद्धीला त्यांना देखील मिळते. बुद्धीचा विकास होतो. त्यांची जिज्ञासू वृत्ती वाढते. आत्मविश्वास वाढतो. शिवाय, स्पर्धात्मक वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होण्यास मदत होत असते. तर नक्कीच तुम्ही मैदानी खेळ खेळायला हवेत जेणे करून, तुमचे मानसिक स्वास्थ्य हे चांगले राहण्यास मदत होते. शारीरिक आरोग्य चांगले राहते.

     तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे कळू शकतात.

 

        धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here