डोळ्यांवर काकडी ठेवण्याचे फायदे

0
1234
डोळ्यांवर काकडी ठेवण्याचे फायदे
डोळ्यांवर काकडी ठेवण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डोळ्यांवर काकडी ठेवण्याचे फायदे. आपल्या शरीराची त्वचा ही स्वच्छ सुंदर असावी, यासाठी आपण अनेक काही ना काही उपाय करत असतो. इतरांप्रमाणे आपली चेहऱ्याची त्वचा देखील मऊ, मुलायम, सुंदर आणि डाग विरहित असावी, असे प्रत्येकाला वाटत असते. बऱ्याच जणांना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या येत असते. त्यामुळे, त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग देखील पडत असतात. म्हणून चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी ते काहीना काही उपाय करत असतात. त्याचप्रमाणे, बऱ्याच जणांना डोळ्याखाली डार्क काळे वर्तुळ देखील समस्या येत असते. जर आपल्या शरीरामध्ये कुठली ना कुठली कमतरता असेल म्हणजेच, आहारातून आपल्याला पोषक घटकांची पोषक तत्त्वांची विटामिन्स ची प्रोटिन्सची कमतरता भासत असेल तर त्यामुळे आपल्या डोळ्याखालील काळे वर्तुळ पडायला लागते.

जर आपल्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण देखील कमी असेल म्हणजेच आपल्या शरीरात रक्ताची कमतरता भासत असेल, तर त्यामुळे देखील आपल्याला डोळ्याखाली लवकर काळे वर्तुळ पडायला लागतात. ड्रॉइंग खाली काळे वर्तुळ पडण्याच्या एक ना अनेक कारणे आपल्याला सांगता येतील. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे यामुळे देखील डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळ लवकर पडत असतात. दिवसातील पुरेशी झोप न घेतल्यामुळे व्यवस्थित आराम न झाल्यामुळे देखील आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडत असतात. वाढत्या वयानुसार देखील आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडण्यास सुरुवात होत असते. तर आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडले असल्यास यासाठी आपण एक ना अनेक प्रकारचे उपाय करत असतो उपाय शोधत असतो.

शिवाय काही जण तर बाजारातून महागडे क्रीम्स आणून डोळ्यांच्या खाली म्हणजे काय वर्तुळांना लावत असतात. परंतु, या क्रीम्स तर महागड्या असतातच. शिवाय, त्यांचा योग्य परिणाम होईल की, नाही हे देखील सांगता येत नाही. मित्रांनो, तुमच्या डोळ्यात खाली देखील काळी वर्तुळे पडलेली आहेत का? तुमच्या डोळ्या खाली काळे वर्तुळ पडल्यास तुम्हाला ते कमी करायचे असतील, तर तुम्ही घरातीलच काही गोष्टींचा वापर करून खालची काळी वर्तुळे कमी करू शकतात. तसेच काही घरगुती उपाय केल्यामुळे डोळ्यांखालची काळी वर्तुळे ही जाऊ शकतात. मित्रांनो,काकडी हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. बऱ्याच, जणांना तर काकडी खायला देखील आवडत असते. शिवाय, आपल्या शरीराला काकडीचा देखील अनेक प्रकारचा फायदा होत असतो.

वाचा  कुरळे केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय

काकडी चे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता देखील भासत नाही. तर काकडी चा उपयोग हा फक्त खाण्यासाठीच होतो असे नाही, तर आपण काकडी चा उपयोग आपल्या सौंदर्यासाठी देखील करू शकतो. तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडलेली असेल, तर तुम्ही काकडीचा यासाठी उपयोग करू शकतात. डोळ्याची काळी वर्तुळे जाण्यासाठी आपण काकडी चा उपयोग कसा करू शकतो. या विषया बद्दल आपल्या माहिती असायला हवी. तर मित्रांनो, आज आपण डोळ्यांवर काकडी ठेवण्याचे फायदे, या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग डोळ्यांवर काकडे ठेवण्याचे फायदे या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

डोळ्यांवर काकडी ठेवण्याचे फायदे :-

वाढत्या वयानुसार आपल्या शहरांमध्ये पोषक घटक पोषकतत्वे यांची कमतरता असल्यामुळे शरीरामधील रक्ताची कमतरता असल्यामुळे आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडत असतात. दिवसभरातून जर आपले पुरेशी झोप झाली नाही, तसेच रात्री उशिरापर्यंत जागरण करणे यामुळे देखील आपल्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे पडू लागतात. डोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी तुम्ही काकडीच्या रसाचा व डोळ्यांवर काकडी ठेवण्याचा उपयोग करू शकतात.

डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवल्यामुळे, एकप्रकारे आपल्या डोळ्यांना थंडावा मिळत असतो. दिवसभर सतत काम करणे कामाचा अतिशय लोड यामुळे आपल्या डोळ्यांना देखील थकवा येत असतो. तर अशा वेळेस तुम्ही डोळ्यांना आराम देण्यासाठी काकडीचे ते करून ते काकडीचे चकते  दोघी डोळ्यांवर ठेवावेत. त्यामुळे एक प्रकारे आपल्या डोळ्यांना आराम मिळत असतो. काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्यांची उष्णता देखील कमी होत असते. शिवाय आपल्या डोळ्यांखाली पडलेली काळी वर्तुळे ही जाण्यास देखील काकडीचे डोळ्यांवर ठेवल्यामुळे कमी होऊ शकतात. जर तुम्ही नियमितपणे काकडीचे सकते ठेवत असाल तर तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळे ही निघून जाण्यास तेथील मदत होत असते.

त्याचप्रमाणे तुम्ही काकडीचा रस काढून त्यामध्ये कापसाचे बोळे बुडवून ते अलगदपणे डोळ्यांच्या आजूबाजूला फिरवावे तसेच, काकडीच्या रसात बुडवलेले कापसाचे बोळे तुम्ही डोळ्यांवर देखील ठेवू शकतात. असे केल्यामुळे एक प्रकारे डोळ्या खालची काळी वर्तुळे देखील जाण्यास मदत होते. शिवाय डोळ्यांना एक प्रकारे थंडावा मिळून डोळ्यांची उष्णता कमी होण्यास मदत होत असते. काकडी डोईवर ठेवल्यामुळे किवा  तुम्ही काकडीचा रस संपूर्ण शरीराला लावल्यामुळे देखील फायदे होऊ शकतात. त्यामुळे तुमचा रंग उजळण्यास देखील मदत होऊ शकते.

वाचा  तोंड कोरडे पडणे ? यावर काही घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्ण वातावरण असते. उन्हाळ्यातील उष्ण वातावरणामुळे आपले डोळे जळजळ देखील होऊ लागतात. त्याचप्रमाणे डोळ्यांना थकवा देखील लवकर येत असतो. तर त्यासाठी तुम्ही काकडीचे सत्य घेऊन ते डोळ्यांवर ठेवावेत तसेच, ते संपूर्ण चेहऱ्यावर देखील फिरवून घ्यावेत. त्यामुळे तुमच्या डोळ्यांची उष्णता ही होऊ शकते. शिवाय, डोळ्यांना एक प्रकारे थंडावा मिळतो तसेच उन्हाळ्यात उष्ण वातावरणामुळे त्वचेवर काळपटपणा आला असेल, तर तो देखील निघून जाण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे काकडी चा रस आपल्या चेहऱ्याला एक प्रकारे मॉइश्चरायझर चे काम देखील करत असते.

काकडी मध्ये अँटीअक्सिडेंट चे प्रमाण हे चांगल्याप्रकारे असते. जे आपल्या डोळ्यांसाठी चेहऱ्याच्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असते. शिवाय काकडी डोळ्यांवर ठेवल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा साईड-इफेक्ट अथवा एलर्जी देखील होत नाही. कारण, काकडीचा आपल्याला एक प्रकारे नेसर्गिक आयुर्वेदिक उपयोग म्हणून करता येऊ शकतो. शिवाय काकडे मध्ये जास्तीत जास्त पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे आपल्या डोळ्यांना व त्वचेला ओलावा टिकून राहतो. काकडी डोळ्यांवर ठेवल्यामुळे तसेच काकडीचा रस संपूर्ण शरीराला लावल्यामुळे एक प्रकारे चेहऱ्याला चकाकी देखील येण्यास मदत होत असते.

काकडी मध्ये विटामिन चे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते जे आपल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. जर तुमचे डोळे सुजलेले असतील तर त्यावेळी तुम्ही काकडीच्या चकत्या करून डोळ्यांवर ठेवावेत. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल व सूज उतरण्यास मदत होऊ शकते. काकडीचे सत्ते डोळ्यांवर हे अलगदपणे ठेवावेत काकडीचा रस डोळ्यात जाता कामा नये. नाहीतर, त्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते.

तर मित्रांनो, डोळ्यांवर काकडी ठेवल्यामुळे तुमच्या डोळ्यांना एक प्रकारे थंडावा मिळण्यास मदत होते शिवाय डोळ्याखालची-काळी-वर्तुळे ही देखील हळू जाण्यास मदत होते. व काकडीचा रस संपूर्ण शरीराला लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग हा उजळण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील काळवंडलेला भाग जाण्यास देखील मदत होऊ शकते तर नक्कीच तुम्ही काकडीचा उपयोग तुमच्या डोळ्यासाठी करून बघू शकतात. ज्या व्यक्तींना कुठलीही वस्तू वापरण्याची अलर्जी असेल, अथवा काकडीची ॲलर्जी असेल तर त्यांनी हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

वाचा  जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये देऊन करू शकतात.

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here