गाडीवर हेल्मेट का घालतात

0
559
गाडीवर हेल्मेट का घालतात
गाडीवर हेल्मेट का घालतात

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया गाडीवर हेल्मेट का घालतात ? आपले जीवन किती मौल्यवान आहे हे काय तुम्हाला नव्याने सांगायला नाही पाहिजे. पण बरेच लोक आपल्या जीवनाची काळजी घेत नाही. तसेच आपल्या सोबत जो कोणी गाडीवर बसतो त्याचे जीवन देखील आपल्या हातात असते. बरेच वेळा असे होते की जे लोक तरुण असतात ते लोक गाडी खूप वेगाने चालवतात किंवा कशी ही चालवतात. याच बरोबर या तरुण पिढी होऊन जय छोटे मुलं असतात त्यांच्याकडे लायसन नसते. ते देखील कोणत्याही प्रकारे गाडी चालवत आहे. यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. पण त्यांच्या जीवाला काय तर त्यांच्या परिवाराला देखील धोका होऊ शकतो.

भारतामध्ये दर चार तासाला एक्सीडेंट होतो यावर विचार करू शकतात की किती लोकांना आपले आयुष्य या गाडीमुळे गमवावे लागले. पण जर त्यांनी सर्व योग्य त्या सुरक्षा पाहिल्या असतील तर ते कदाचित वाचू शकतात. म्हणजेच त्यांना मुक्कामार तर नक्की लागेल पण त्यांच्या जीव तरी वाचेल आणि जिवापेक्षा महाग किंवा मौल्यवान या जगामध्ये कोणतीही वस्तू नाही. आजकाल हेल्मेट महाग आहे म्हणून लोक हेल्मेट घालत नाही किंवा त्याची अनेक कारणे असू शकतात. पण त्यांना हे समजत नाही की एक हेल्मेट त्यांचा मोलाचा जीव वाचू शकतो. 

तसेच जर त्यांना काय झाले तर त्यांच्या परिवाराकडे कोण बघणार. त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार याचा देखील विचार करत नाही. म्हणून मित्रांनो आजचा आपला विषय आहे की गाडीवर हेल्मेट का घालावे. तसेच काही लोक गाडीवर हेल्मेट घालत घालत नाही तर त्याची कोणकोणती कारणे आहेत आणि याच बरोबर आपण हे देखील बघणार आहोत की जर तुम्ही हेल्मेट घेण्यासाठी बाजारामध्ये गेला तर कोणत्या प्रकारचे हेल्मेट निवडावे. जेणेकरून तुमच्या सुरक्षा मध्ये अधिक वाढ होईल. चला तर मग जाणून घेऊया या सर्व गोष्टी.

लोक गाडीवर हेल्मेट का घालत नाही ?

तरुण पिढीला तर हेल्मेट घातल्यावर असा विचार येतो की त्यांचा चेहरा झाकला जातो किंवा त्यांचे केस खराब होतात. याचप्रकारे बऱ्याच लोकांना अशा अडचणी देखील येतात की त्यांचे हेल्मेट मध्ये कान दाबले जातात किंवा त्यांना हेल्मेटमध्ये श्वास घेता येत नाही. स्त्रियांच्या बऱ्याच वेळेस कानामध्ये अलंकार असतात ते हेल्मेट मध्ये दबले जातात. त्यामुळे देखील त्यांना हेल्मेट घालण्यासाठी मोठा त्रास होतो. मुलांमध्ये बघायला गेलो तर या धावपळीच्या जगामध्ये कोणाला स्वतःकडे बघायला किंवा त्या स्वतःच्या शरीराला लक्ष देण्यास वेळ भेटत नाही. म्हणून कधीकधी हेल्मेट घालण्यास कंटाळा करतात. तर असे बरेच कारण असू शकतात हेल्मेट न घालण्याचे.

हेल्मेट का घालावे ?

चला आता आपण बघितले की बरेच लोक गाडीवर हेल्मेट घालत नाही. तर हे लोक हेल्मेट घालत नाही हे देखील आपण जाणून घेतले आता आपण बघूया की आपण गाडीवर हेल्मेट का घातले पाहिजे. तुम्ही जर हेल्मेट घातला तर तुमच्या जीवाला तुमच्या शरीराला त्याचा फायदा होईलच. तो कोणत्या प्रकारे ते आपण बघूया. तर जसे की आपण बघितलं की भारतामध्ये दर चार तासावर एक्सीडेंट होतोच आणि यामध्ये मृतांचा आकडा वाढतच जातो. जर तुमचा एक्सीडेंट झाला तर तुमचा मौल्यवान जीव वाचू शकतो कारण डोक्याला वाचणारे एकमेव तुमच्या शास्त्र म्हणजे हेल्मेट घातले. असेल तर तुमचा मोठा एक्सीडेंट झाला तरी तुमचे तुम्हीच त्यातून वाचू शकता.

ते म्हणजे एक्सीडेंटमुळे जर तुमच्या डोक्याला कोणते प्रकारचे दुखापत होणार असेल तर हेल्मेट मुळे ती कमी होते किंवा अपघाताची तीव्रता कमी करण्यासाठी देखील हेल्मेट ओळखला जातो. तसेच हेल्मेट च्या आजूबाजूला जो थर्माकोलचे आवरण असतं त्यामुळे आपल्या मेंदूच्या नसा व आपले डोके सुरक्षित राहण्यास मदत होते. कारण जर तुमचा एक्सीडेंट हायवेवर झाला तर मागून फार भरधाव वेगाने गाड्या येत असतात आणि जर का त्या गाड्यांनी तुम्हाला ठोकले तर तुमच्या शरीराला दुखापत होऊ शकते.

तुमचे डोके सोडून जर तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला दुखापत झाली तर तुमचा जीव जाणार नाही. पण जर का डोक्याला दुखापत झाली तर बऱ्याच वेळेस तुम्हाला जीव गमवावा लागेल. म्हणून आजपासून तुम्ही गाडीवरून कधीही कुठे जात असेल तर डोक्यामध्ये हेल्मेट नक्की घालावे आणि हेल्मेट घालताना हेल्मेटला धरून ठेवण्यासाठी जे बक्कल असतं ते नीट लागली आहे की नाही याची तपासणी देखील करावी. 

हेल्मेट निवडताना कोणती काळजी घ्यावी ?

बाजारामध्ये विविध प्रकारचे हेल्मेट उपलब्ध आहे तर नक्की या विविध प्रकारचे हेल्मेट मधून आपण नक्कीच चांगले हेल्मेट कसे निवडावे हे आपण जाणून घेऊया चला तर मग बघुया !

तुमच्या आकाराचे हेल्मेट घ्यावे ?

बऱ्याच वेळेस आपण आपल्या आकाराचे हेल्मेट घेत नाही ज्यामुळे आपण गाडी चालवतो तेव्हा ते हेल्मेट आपल्या डोक्यामध्ये हलू लागते. जर का कोणत्या खड्ड्यांमध्ये गाडी उधळली तर ते हेल्मेट आपल्या डोक्याच्या आतल्या बाजूने लागू शकते. आणि जर कोणता अपघात झाला तर आपल्या डोक्यातून ते हेल्मेट सहज निघू देऊ शकते.

हेल्मेट मध्ये हवेत संचार होते की नाही याची पडताळणी करावी ?

बरेच लोक ह्या कारणाने हेल्मेट घालत नाही कि त्यांना हेल्मेट मध्ये गरम होते किंवा श्वास घ्यायला जमत नाही. पण तुम्ही जेव्हा हेल्मेट घ्यायला जाल तेव्हा याची काळजी घ्यावी की हेल्मेट मधून नीट श्वास घेता येईल.

हेल्मेट हे चांगल्या गुणवत्ता चे घ्यावे ?

आपण थोडे पैसे वाचवण्यासाठी आपल्या जिवाशी खेळतो. म्हणजेच आपण जर हेल्मेट घेत असू तर ते चांगल्या गुणवत्तेचे घेत नाही. रस्त्यावरून कोणत्याही प्रकारचे कोणतेही हेल्मेट भेटते ते घेतो. जेणेकरून आपल्या जीवाला धोका उद्भवू शकतो. कारण हे स्वस्त किंवा कमी गुणवत्तेचे हेल्मेट कोणते अपघाताला सामावले जाऊ शकत नाही यांची सहनशीलता फार कमी असते. म्हणून तुम्ही बाजारात गेल्यानंतर जास्त किमतीचे असले चांगल्या गुणवत्तेचे हेल्मेटचा घ्यावे. जेणेकरून मोठ्यातला मोठा अपघाता मदन तू देखील तुमचा जीव वाचेल.

काळया रंगाची काच असलेले हेल्मेट टाळावे ?

बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेल्मेट उपलब्ध आहे. त्यामध्येच काळा रंगाची काच असलेले हेल्मेट देखील बाजारामध्ये उपलब्ध आहे. लोकांना वाटते की ते काळ रंगाच्या काचेचे हेल्मेट जर आपण घातले तर आपण चांगले दिसू. पण त्या काळया रंगाच्या काचेच्या मुळे आपल्याला हेल्मेट च्या आत मधून अस्पष्ट दिसू लागते. जर तुम्हाला उन्हापासून वाचण्यासाठी काळया रंगाच्या काचेच्या हेल्मेट घ्यायचे असेल तर घेऊ नये. साध्या काचेचे हेल्मेट वापरावे तसेच जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही हेल्मेट च्या आत मध्ये गॉगल देखील वापरू शकता.

तर आज आपण बघितले की गाडी चालवताना हेल्मेट का घालावे. तसेच आपण हे देखील जाणून घेतले की हेल्मेट घातल्याने आपला जीव कोणत्या प्रकारे वाचतो. तसेच बाजारामध्ये गेल्यावर कोणत्या प्रकारचे हेल्मेट घ्यावे हेदेखील आपण जाणून घेतले. तसेच मी तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here