आवळा कॅन्डी खाण्याचे फायदे

0
2381
आवळा कॅन्डी खाण्याचे फायदे
आवळा कॅन्डी खाण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो. निसर्गात बरेचसे काही आयुर्वेदिक फळे आहे, ज्यांच्या सेवनामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असते. “आवळा” नाव घेताच आले ना तुमच्या तोंडाला पाणी! आवळा हा आकाराने छोटासा असून तो गोलाकार असतो. आवळ्याची चव ही तुरट, आंबट, मधुर असते. अनेक जणांना आवळ्याचे सेवन करायला आवडते.

आयुर्वेदानुसार आवळा या फळाला अत्यंत गुणकारी मानले जाते. विविध प्रकारच्या सणासुदीला बायका आवळ्या चा वापर हा पूजेसाठी देखील करत असतात. आवळा या आयुर्वेदिक गुणकारी फळाचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे लाभ आपल्या शरीराला होत असतात. आवळ्याचे सीजन म्हणजेच हिवाळा ऋतू. हिवाळा ऋतु म्हटलं तर थंड वातावरण आलेच. हिवाळ्यामध्ये थंड वातावरण असल्याकारणामुळे अनेक आजार देखील तोंड वर काढत असतात. हिवाळा ऋतु मध्ये आपल्याला आजारांपासून दूर राहता यावे, यासाठी आपण आवळ्याचे सेवन करणे अत्यंत गरजेचे ठरू शकते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या पट्टीने वाढावी यासाठी आवळ्याचे सेवन करणे अत्यंत उपयोगी ठरू शकते. आवळ्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व आढळून येतात.

आमच्या वेळेस जर घरी जास्तीचे आवळे आणलेत तर आम्ही आईला गोड आवळा बनवायला सांगायचो. त्यालाच आज-काल आवळा कॅन्डी असेच म्हटले जाते.आवळ्याचे अनेक प्रकार बनवता येतात.जसे की,आवळ्याचे लोणचे, आवळ्याचे सरबत,आवळा कॅन्डी, आवळ्याची चटणी,आवळ्याचा ज्यूस वैगरे. शिवाय, आवळा व आवळ्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. आवळा कॅन्डी खाल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात याबद्दल आपणास माहिती असायला हवी. तर मित्रांनो,आज आपण आवळा कॅन्डी खाल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग आवळा कॅन्डी खाण्याचे फायदे या विषयाबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

आवळा कॅन्डी खाण्याचे होणारे फायदे:-

आवळा खाणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. आवळ्या मध्ये सी विटामिन्स हे चांगल्या प्रकारे असते जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. आवळ्यापासून आणि पदार्थ आपण बनवू शकतो हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतले आहे त्याचप्रमाणे आवळा कॅंडी खाल्ल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात, याबद्दल आपण आता जाणून घेऊयात!

  • आवळा चवीला आंबट तुरट असा असतो. आवळा मध्ये सी विटामिन चे प्रमाण हे चांगल्या प्रमाणात असते. जर आपण आवळा कॅन्डी नियमित खात असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या क्षमतेने वाढण्यास मदत होते. लहान मुले हे आवळ्याचे डायरेक्ट सेवन करणे टाळतात. जर तुम्ही लहान मुलांना आवळा कॅन्डी खायला द्यायला हवी. लहान मुलांनी आवळा कँडी खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीराची पचनसंस्था हे चांगले राहण्यास तर मदत होते शिवाय त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही चांगल्या पटीने वाढण्यास मदत होते त्यामुळे  इतर संसर्गजन्य आजारांपासून त्यांचा बचाव होऊ शकतो.
  • अनेक लोकांना अपचनाची समस्या येत असते. शिवाय अपचन होणे पोटात गॅस तयार होणे यांसारख्या समस्या येत असतात. तुम्हाला देखील अपचन होते का? जट म्हणा अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही जेवण झाल्यावर अथवा कुठलाही पदार्थ खाल्ल्यानंतर आवळा कॅन्डी चे सेवन करायला हवे. जेवणानंतर जर तुम्ही आवळा कँडी खाल्ली तर त्यामुळे तुमच्या शरीरातील खाल्लेले अन्न हे लवकर पचनास मदत होऊ शकते. जेवणानंतर आवळा कँडी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया ही व्यवस्थित सुरळीत चालू राहण्यास देखील मदत होत असते. जेणेकरून तुम्हाला पोटासंबंधी चा त्रास होऊ शकत नाही.
  • आवळा चावून खाल्ल्याने आपल्या दातांच्या देखील संरक्षण होत असते. दातांना मजबूती येण्यासाठी देखील आवळ्याचा उपयोग होत असतो.
  • काहीजण आवळा चावून खाण्यास कंटाळतात. आठवतं ना डायरेक्ट आवळा खायला आवडत नाही तर अशा लोकांनी आवळ्याचा मुरंबा अथवा आवळ्याची कँडी तरी खाल्ली पाहिजे. ज्यामुळे त्यांच्या शरीरासाठी ते फायदेशीर ठरू शकते.
  • आवळ्याचा हा आपल्या शरीरासाठी तर उपयोग होतो शिवाय आपल्या केसांचे आरोग्य हे चांगले राहण्यासाठी देखील आवळ्याचा उपयोग होत असतो. आवळा कॅन्डी याचे नियमित सेवन करत असाल तर त्यामुळे तुमचे केस हे निरोगी राहण्यास मदत होते.
  • केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही आवळ्याचा रसाचा देखील उपयोग करू शकतात. आवळ्याचा रस पोटातून घेतल्या मुळे शिवाय आवळ्याचा रस हा केसांच्या मुळाशी लावल्यामुळे देखील अनेक फायदे आपल्याला होऊ शकतात. आवळ्याचा रसाचे उपयोग केसांसाठी केल्यास तुमचे केस हे चमकदार मऊ मुलायम होण्यासाठी मदत होऊ शकते. शिवाय आवळ्याच्या रसाने केसांना मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया ही वाढते आणि तुमच्या केसांची लांबी देखील वाढण्यास मदत होऊ शकते केसांची गळतीची समस्या देखील जाण्यास मदत होऊ शकते.
  • आवळ्याचे सेवन केल्यामुळे ॲसिडिटीच्या त्रासापासून देखील आपण दूर राहू शकतो. ज्या लोकांना ॲसिडिटीची समस्या होत असेल तर अशा लोकांनी आवळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
  • अनेकांना शरीरात उष्णता वाढल्यामुळे त्रास होत असतो. आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी व्हावे यासाठी देखिल आवळ्याचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.आवळा हा थंड प्रवृत्तीचा असतो. त्यामुळे आवळ्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळण्यास मदत होऊ शकते.
  • आवळ्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराचे एक प्रकारे शुद्धीकरण होत असते. कारण आवळा खाल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ हे बाहेर जाण्यास मदत होत असते.
  • आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने, नियमित न चुकता आवळा कॅन्डी खाल्ल्यामुळे कर्करोगापासून कॅन्सर पासून आपण दूर राहू शकतो. आवळा मध्ये असे काही महत्त्वपूर्ण गुणधर्म असतात घटक असतात की ज्यामुळे आपल्याला कॅन्सर होत नाही आणि कॅन्सर होण्याच्या पेशी कारणीभूत ठरतात, त्या पेशीं नष्ट होतात.
  • आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन हे सुरळीत व व्यवस्थित राहण्यासाठी देखील आवळ्याच्या कॅण्डी चे सेवन केल्यामुळे, आवळा रसाचे सेवन केल्यामुळे फायदा होऊ शकतो.
  • आवळ्याचे सेवन केल्यामुळे तसेच आवळा कॅण्डी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी या योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते. जर आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी या योग्य प्रमाणात राहिल्या तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो.
  • ज्या व्यक्तींना डायबिटीज ची समस्या असेल तर अशा लोकांनी आवळ्याच्या रसाचे सेवन करण्यास हरकत नाही परंतु आवळा कॅन्डी खाणे टाळायला हवे कारण त्यांनी जर आवळा कॅन्डी खाल्ली तर त्यांच्या रक्तातील साखर ही वाढू शकते म्हणून आवळा कॅंडी न खाता तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकतात.
  • आपल्या शरीराची त्वचा ही चांगली राहावी यासाठी देखील आवळ्याचे सेवन फायदेशीर ठरते. आवळ्याचे सेवन केल्यामुळे आवळा कॅण्डी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराच्या त्वचेचा ॲलर्जी होण्यापासून  बचाव होण्यास मदत होते.
  • आवळ्याचे नियमित सेवन केल्यामुळे आवळा कॅण्डी खाल्ल्यामुळे आपल्या सौंदर्यात देखील भर पडण्यास मदत होते. आपल्या त्वचेचा पोत सुधारून आपल्या केसांचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होत असते.
वाचा  पुदिन्याचे सेवन केल्यावर होणारे शरीराला विविध फायदे :-

मित्रांनो, आवळा सेवन करणे तसेच आवळ्याचे विविध प्रकार करून त्याचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. शिवाय आपले आरोग्य देखील चांगले राहते. आपले केस हे वृद्धत्व पर्यंत काळे राहावेत असे वाटत असेल, तर तुम्ही नियमित एक तरी आवळा खाल्ला पाहिजे. शिवाय आवळ्याचा रस तुम्ही तुमच्या केसांना लावल्यामुळे देखील तुमची केस घनदाट काळेभोर आणि व लांब सडक होण्यास मदत होऊ शकते. आवळ्या मध्ये एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते ज्यामुळे आपले शरीराचे स्वास्थ्य चांगले राहते. शिवाय आवळ्याचा रस नियमित सेवन केल्याने अनेक आजारांपासून, कॅन्सर पासून आपण दूर राहू शकतो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही नियमित आवळ्याचे सेवन केले पाहिजे. जेणे करण तुमची आरोग्य हे दीर्घ काळ टिकण्यास मदत होऊ शकते.

तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here