घरात कॅलेंडर असण्याचे फायदे

0
435
घरात कॅलेंडर असण्याचे फायदे
घरात कॅलेंडर असण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? वेळ, वार, सण, तसेच निरनिराळ्या घटना, जन्मदिन, पुण्यतिथी, अमावस्या, पौर्णिमा, या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी, आपल्या घरात कॅलेंडर असणे आवश्यक असते. कॅलेंडर शिवाय घरपण नाही असे म्हटले जाते. घरात कॅलेंडर असण्याचे फायदे आज आपण जाणून घेऊया !

कॅलेंडर ही प्रथा अगदी पूर्वीच्या काळापासून आपल्या घरा-घरात आहेत. जणू काही तो एक सदस्य आहे. आपल्याला काहीही आठवण आली, की आपण लगेच त्याच्या कडे जातो व आपले दिवस बघतो, पण हल्ली बदलत्या जीवनशैलीमध्ये, कॅलेंडर हे आता मोबाईल मध्ये राहायला लागलेले आहेत. मोबाईल मध्ये वेगवेगळे प्रकारचे कॅलेंडर येतात. त्यामुळे आपण घरात कॅलेंडर घेणे टाळूनच देतो. पण घरात गृहिणी असतात, किंवा वयस्कर व्यक्ती असतात, त्यांच्यासाठी घरात कॅलेंडर असणे, आवश्यक असते. कारण कॅलेंडर नुसार त्यांचे उपवास तसेच, त्यांचे काही कार्यक्रमाचे नियोजन त्यावर आखले जाते. कॅलेंडर मध्ये भरपूर प्रकार असतात.

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत, कॅलेंडर चे वेगवेगळे प्रकार आता आपण बघतोय, पूर्वी कालनिर्णय कॅलेंडर होता. आताच्या काळात कालनिर्णय, कालदर्शिका, महालक्ष्मी, वैभव लक्ष्मी, दिनचर्या, लोकमत कॅलेंडर, सकाळ कॅलेंडर, वेगवेगळ्या देवांच्या नावाने कॅलेंडर, कंपन्यांच्या नावाने कॅलेंडर, वेगवेगळ्या नावांनी कॅलेंडरची उगम झालेले आहेत. पण मित्रांनो एक सांगू, कॅलेंडर वेगवेगळ्या नावाने जरी राहिले ना तरी तारखाही त्याच राहतात, आणि माहितीही तीच राहते, सणही तोच राहतो, तसेच वारही तोच राहतो, अमावस्या, पौर्णिमा ही त्याच वेळेला ठरलेल्या वेळेप्रमाणे येतात. तर आज आपण घरात कॅलेंडर असण्याचे फायदे नेमके कोणकोणते? ते जाणून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, की याचे काय फायदे असू शकतात ? चला, तर मग जाणून घेऊयात, की कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात ? 

कॅलेंडर मध्ये नेमकी कोणती माहिती मिळते ? 

मित्रांनो कॅलेंडर मराठी असले तर त्यामध्ये आपल्याला खूप सारी माहिती मिळते, चला तर जाणून घेऊया कोणकोणती मिळते. 

वाचा  लहान वयात केस पांढरे

 पंचांग:-  आपल्याला पंचांग असते, त्याच्यात तिथी, नक्षत्र, वार, योग, सुर्योदय, सुर्यास्त, यासारखे माहिती मिळते. 

राशिभविष्य:- कॅलेंडर मधले मागच्या पेजवर, आपल्याला आपल्या नावाचे राशीभविष्य बघायला मिळते. त्यामध्ये आपल्या भविष्यामध्ये काय होणार आहे, ही माहिती दिलेली असते. 

सण:- कॅलेंडर मध्ये वर्षभरामध्ये कोण कोणते सण येतात, ते लिहिलेले असते. त्या सणांची माहिती त्या मध्ये लिहिलेली असते. तसेच सण असलेली तारीख ही लाल रंगाने दिलेली असते. 

विशेष दिन:- कॅलेंडर मध्ये थोर व्यक्ती महान व्यक्ती यांचा जन्मदिन मृत्युदिन जसे उदा: 2 ऑक्टोबर गांधी जयंती 14 एप्रिल आंबेडकर जयंती यासारखे, दिनाचे विशेष  दिलेली असते. 

पाककलाकृती:- कॅलेंडर मध्ये मागच्या भागावर विशेष पाककलाकृती दिलेली असते. म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीज कशाप्रकारे बनवाव्यात ते दिलेली असते. 

महिने:- कॅलेंडर मध्ये मराठी महिने तसेच इंग्रजी महिने दिलेले असतात. 

घरात कॅलेंडर असण्याचे फायदे :

मित्रांनो घरात कॅलेंडर असल्यावर आपण आपल्या कामाचे नियोजन करू शकतो. जसे की मुलांसाठी अगोदर मुलांचे परीक्षा कधी असतात, त्यानुसार ते त्यांचे अभ्यासाचे नियोजन करू शकतात. त्यानुसार ते त्यांच्या वेळापत्रकानुसार अभ्यास करू शकतात. 

  • सुट्टीचे नियोजन :

कॅलेंडर वर कोणत्या दिवशी सुट्टी असते, की आतुरतेने वाट लहान मुले बघत असतात. तसेच महिलावर्गाची हे असते, त्यांना दिवाळी, अक्षय तृतीया, रक्षाबंधन या दिवशी गावाला जायचे, तसेच माहेरी जायचे, नियोजन तयार करून ठेवतात. 

  • सणांची आराखडे :

घरात कॅलेंडर असल्यामुळे  आपण कोणता सण कोणत्या वेळेस येतो, हे बघू शकतो. तसेच आपल्या मराठी संस्कृतीमध्ये,  गुढीपाडवा, अक्षय तृतीया, गणपती, नवरात्रि, दिवाळी, मकर संक्रांति, होळी, रंगपंचमी यासारखे, सण आपण केव्हा आहे, हे अगोदरच बघून घेतो. 

  • घर खर्चाचे नियोजन करता येते :

मित्रांनो, घरात कॅलेंडर राहिल्यावर आपण किराणा कोणत्या तारखेला भरला, तसेच लाईट बिल कोणत्या दिवशी दिले, तसेच दूध बिल ची तारीख, तसेच केबल बिल, तसेच इतर खर्च कोणत्या तारखेला दिले, त्यावर टिप्पणी करून ठेवू शकतो. त्यामुळे कॅलेंडर असणे आवश्यक आहे. 

  • उपवास बघता येतात :

 काहीजण सोमवार, मंगळवार तसेच एकादशी, चतुर्दशी, संकष्टी, तसेच इतर काही उपवास हे त्यांचे नियोजन आखून उपवास करता येतात. तसेच कॅलेंडर मध्ये काही जण पौर्णिमेचा उपवास करतात. काही जण पौर्णिमेचा सत्यनारायण करतात. मग त्यामध्ये पोर्णिमा कधी आहे, हे बघण्यासाठी कॅलेंडरचा उपयोग होतो. तसेच अमावस्या कधी आहे, हेही आपण बघून आपले नियोजन करू शकतो. 

वाचा  उन्हाळ्यात माठातील पाणी पिल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला घरात कॅलेंडर असणे कितपत महत्त्वाचे आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, जर तुम्हाला अजून काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here