मास्क का व कसा वापरावा

0
417
मास्क का व कसा वापरावा
मास्क का व कसा वापरावा

सर्व लोकांना तर आता माहितीच आहे की आता कोरोना ही महामारी जगभर पसरलेली आहे. आणि आजचा सामना करायचा असेल तर आपले एकमेव शस्त्र म्हणजे मास्क. नाही तर अनेक आजार आहेत जे हवेच्या संसर्ग मार्फत होतात जसे की स्वाइन फ्लू, टीबी असे अनेक आजार आहेत. पण आपली सुरक्षा आपल्या हातात असते. म्हणून जर तुम्ही मास्क न लावता बाहेर जात असाल तर तुमच्या आरोग्यावर याचा धोकादायक परिणाम होऊ शकतो. तसेच तुम्ही मास्क योग्य पद्धतीने देखील लावला पाहिजे. मास्क लावणे आणि योग्य पद्धतीने लावणे या दोघांमध्ये फार फरक आहे. मास्क का व कसा वापरावा याबाबतीतही लोकांना फार संभ्रम आहे.

बऱ्याच लोक मास्क लावताना चुकीच्या पद्धतीने लावतात तर योग्य पद्धत कोणती कोणत्या प्रकारे मास्क लावावे. कोणते मास्क वापरावेत हे आपण आज बघणार आहोत. कारण बाजारामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे मास्क आहे. कोणते मास्क सर्वात चांगले आहे हे कसे समजणार या प्रश्नाचे उत्तर देखील आपणास जाणून घेणार आहोत. याच बरोबर आपण शेवटी बघणार आहोत की मास्क लावताना कोणती काळजी घ्यावी कोणत्या चुका टाळाव्यात जेणेकरून आपले आरोग्य धोक्यात येणार नाही. तसेच तुम्ही या गोष्टी तुमच्या परिवारातल्या सदस्यांना देखील सांगू शकता चला तर मग बघुया.

मास्क का वापरावा :

तर जसे की, आपण वर बघितलं अनेक प्रकारचे आजार जंतू, बॅक्टेरिया आजकाल हवेच्या मार्फत कोणाच्याही शरीरामध्ये जात आहे. आणि यामुळे आपले स्वास्थ धोक्यामध्ये येण्याची शक्यता असते. हे बॅक्टेरिया हे जंतू इतके लहान असतात की ते आपल्या डोळ्यांनी बघणे शक्य नाही. म्हणून आपण मास वापरतो जेणेकरून ते जंतू, बॅक्टेरिया समोरच्या व्यक्तीच्या शरीरातून आपल्या शरीरात येऊ नये. याच प्रकारे मास्क चे हे देखील काम आहे की, आपल्या शरीरातला जंतू आपल्या शरीरात यामध्ये जाऊ नये. यामुळे दोन्ही व्यक्ती सुरक्षित राहतात आणि हे जंतू डोळ्याने दिसत नसले तरी मास्कचा वापर केल्याने जंतू संसर्ग होत नाही. म्हणून तुम्ही गर्दीच्या ठिकाणी किंवा कुठेही बाहेर जाताना नेहमी मास्क चा वापर करावा.

वाचा  गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे काय?

मास्क कसा वापरावा :

बरेच वेळेस लोक मास्क घालतात पण मास्क योग्य पद्धतीने वापरत नाही यामुळे जंतुसंसर्गाचा धोका असतोच तर आज आपण जाणून घेऊया योग्य पद्धतीने कसा लावावा तर मग बघू या.

चरण १  :

सर्वात पहिले तुम्ही तुमच्या आकाराचा म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावर योग्य पद्धतीने बसणारा योग्य आकाराचा मास्क घ्यावा. त्यानंतर मास्क ला ज्या दोर्‍या असतात त्या दोऱ्या नीट कानामागे टाकाव्यात.

चरण २ :

मास्क घातल्यानंतर ते मास्क तुमच्या नाकापर्यंत बरोबर आले आहे की नाही हे बघा. म्हणजेच मास्क लावल्यावर नाक योग्य रीतीने झाकले गेले आहे की नाही याची तपासणी करावी.

चरण ३ :

त्यानंतर म्हणजे मास्कला पुढच्या बाजूस ज्या रेषा दिलेले असतात. त्या रेशा मास्क छोटा मोठा करण्यासाठी दिलेल्या असतात. त्यानंतर ते मास्क वरच्या व खालच्या बाजूस थोडेसे खेचून तोंड देखील नीट चांगल्या रीतीने झाकून घ्यावे. तरी सी एक साधी सोपी पद्धत आहे मास्क घालण्याची तुम्ही जर हे तीन चरण केले तर तुम्ही योग्य पद्धतीने मास घालू शकता. याचा अजून एक फायदा म्हणजे मास्क योग्य रीतीने लावल्यामुळे तुमचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होईल.

मास्क चे किती प्रकार आहेत व कोणते ?

तर बाजारामध्ये अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहे. यामध्ये नक्की कोणता मास्क सर्वात चांगला आहे कोणता मास्क आपण वापरू शकतो हे आपण आज जाणून घेऊया चला तर मग बघुया.

डिस्पोजेबल मास्क :

हे मास्क फक्त तुम्ही एकदाच वापरू शकतात. आणि एकदा वापर झाल्यावर या मास्कची तुम्ही सुरक्षित विल्हेवाट लावावी. मुख्यता हे मास्क डॉक्टर लोक वापरतात कारण बऱ्याच वेळेस ते ऑपरेशन करतात आणि ऑपरेशन केल्यानंतर त्या सर्व सामानाची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाते. त्यासोबतच त्यांचा हा मास्क आणि ग्लोज दोन्ही जातात म्हणून शक्यतो हे मास्क कुठेतरी बाहेर जाताना घालावे.

वाचा  जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

N95 मास्क :

N95 हे मास्क तुम्ही खात्रीशीर वापरू शकता. कारण याचा जो आकार आहे तो आपल्या पूर्ण चेहऱ्यावर अगदी बरोबर बसतो. तसेच मास्क घेताना याची काळजी घ्यावी की जास्त फिठ मास घेऊ नये. थोडासा सईल मास्क घ्यावा जेणेकरून तुम्हाला श्वास घेताना त्रास होणार नाही. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा रनिंग करत असाल किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत असाल तेव्हा हे N95 मास्क वापरू नये. यामुळे तुम्हाला नीट श्वास घेता येणार नाही तसेच तुमच्या शरीराला त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन हवा असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचे मास्क शक्यतो व्यायाम करताना घालू नये.

सुती कपड्याचे मास्क :

सर्व सर्वसामान्यांसाठी अगदी चांगले सोपे आणि सरळ असे हे मास्क आहे. हे मास्क तुम्ही वापरून झाल्यावर धुऊन पुन्हा वापरू शकता. तसेच हे तुम्ही घरच्या घरी देखील सहज व सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि दैनंदिन जीवनासाठी दैनंदिन वापरासाठी हे मास्क अत्यंत उपयोगी आहे. वापरतांना याची काळजी घ्यावी कि हे मास्क एकदा वापरून झाल्यावर पुन्हा वापरण्यासाठी च हे मास्क चांगले धुवून वापरावे. तुम्ही हे मास्क घालत असाल तरी देखील तुमच्या आरोग्याला कोणताही प्रकारचा धोका उद्भवणार नाही. पण मास्क बनवताना योग्य पद्धतीनेच मास्क बनवावे याची काळजी घ्यावी तसेच मास्क बनवण्याची योग्य पद्धत तुम्हाला इंटरनेटवर मिळेल.

मास्क वापरताना कोणती काळजी घ्यावी ?

सलग आठ तासाच्या वर एकच मास्क वापरू नये. तसेच शक्यतो सुती कापडाचे थोडीशी सईल मास्क वापरावे फिट मास्क वापरल्याने बऱ्याचदा आपल्या चेहऱ्याचा व माने जवळील रक्त पुरवठा कमी दाबाने होतो. याच प्रकारे तुम्हाला श्वसनास संबंधित विकार देखील होऊ शकता. म्हणजे जर कोणाला दम्याचा आजार असेल तर त्याने शक्यतो मास्क टाळावे किंवा सईल मास्क वापरावे जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

वाचा  पायासाठी चप्पल कशी वापरावी

तर मित्रांनो आज आपण जाणून घेतले की मास्क का व कसा वापरावा. तसेच कोणत्या प्रकारचे मास्क आपल्यासाठी योग्य आहे. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here