नाकाचा शेंडा कसा वाढवायचा

0
1211
नाकाचा शेंडा कसा वाढवायचा
नाकाचा शेंडा कसा वाढवायचा

नमस्कार मित्रांनो. नाक हे चेहऱ्याच्या सौंदर्याचे केंद्रबिंदू मानले जाते. आणि जर अशात अजून नाकाचा आकार, नाकाचा शेंडा टोकदार असेल तर सौंदर्यात अजून भर पडते. प्रत्येकाची शरीराची घडण ही वेगवेगळी असते. कुठलीही व्यक्ती सारखी दिसत नाही. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही वेगळेपण असते. बरेच जण हे सौंदर्याच्या बाबतीत खूप जागृत असतात. अशात नाकाचा आकार नीट ठेवण्यासाठी अनेक जण काही ना काही उपाय करत असतात. आपले सौंदर्य वाढण्यासाठी नाकाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. चेहर्या बाबत सांगायचा म्हटले तर असं मानलं जातं की, लांब केस, मोठे डोळे, गुलाबी ओठ आणि शार्प नाक असणे गरजेचे आहे. नाक हे चेहऱ्याच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू मानले जाते.

नाकाचा आकार व्यवस्थित दिसावा, म्हणून बरेच जण हे मेकअप वर जास्त भर घालतात. आणि काही जण तर मेकअप चा सहारा घेऊन देखील नाक व्यवस्थित दिसत नसेल, तर सर्जरीचा मार्ग अवलंबतात. म्हणजेच, नाकाच्या बाबतीत शस्त्रक्रिया करून नाकाचा आकार व्यवस्थित करून घेत असतात. परंतु मित्रांनो, सर्जरी करणे म्हणजेच यासाठी खूप खर्च करावा लागतो. म्हणजेच हा महागडा प्रयोग म्हणावा लागेल. फक्त सर्जरी करूनच नाकाचा आकार व्यवस्थित होतो असे नाही, तर काही घरगुती पद्धत वापरून व्यायाम करून देखील नाकाचा शेंडा वर आणता येतो. तर मित्रांनो,आज आपण नाकाचा शेंडा कसा वाढवायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग नाकाचा शेंडा कसा वाढवायचा यासाठी कुठल्या प्रकारे व्यायाम करून तो वर आणता येईल याविषयी खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

नाक वर खाली करून मालिश करून बघा :

      मित्रांनो, खालीवर करून देखील नाकाचा आकार हा शेप मध्ये आणण्यास मदत होऊ शकते. वाढत्या वयानुसार शरीराचे हाडे आणि मास पेशींमध्ये देखील बदल होत जातो. त्यामुळे लहान मुलांच्या मालिश मध्ये जास्तीत जास्त भर दिला जातो. यासाठी बोट नाकाच्या शेंड्यावर लावून वरून खाली खालून वर अशा प्रकारे मालिश केली जाते. आणि ही क्रिया करताना ती  हळुवारपणे करावी. तसेच लहान मुलांची हाडे ही खूप नाजूक आणि कवळी असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या हाडांना जसा आकार देत गेले त्या प्रकारे आकार घडत असतो. म्हणजेच नाकाच्या हाडाला ज्याप्रकारे तुम्ही व्यायाम द्याल त्या प्रकारे ते व्यवस्थित घडेल. म्हणजेच लहान बाळांना नाकाचा शेंडा व्यवस्थित प्रकारे वर काढता येईल. यामुळे नाकाचा शेप योग्य प्रकारे काढता येऊ शकतो. अगदी लहान बाळांना तुम्ही योग्य प्रकारे नाक खाली वर करून व्यवस्थित प्रकारे करून नाकाला मालिश केली तर मोठे झाल्यावर त्यांचे नाक टोकदार होण्यास मदत होते. आणि त्यांच्या सौंदर्यात देखील भर पडते.

वाचा  बडिशोप सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध बहुमूल्य फायदे :-

नाकाची मालिश करून बघा :

मित्रांनो, मसाज करणे हा एक उत्तम व्यायाम मसाज केल्यामुळे शरीराला एक प्रकारे आराम देखील मिळत असतो. तसेच मसाज करून तुम्ही नाकाचा शेंडा देखील वाढवू शकतात.मसाज करून नाक योग्य आकारामध्ये म्हणजे शेपमध्ये आणता येऊ शकते. नाकाला तेल किंवा क्रीम लावून उजवीकडे किंवा डावीकडे तसेच वर-खाली फिरवा. आणि अशा प्रकारे मसाज करताना जास्त त्रास होणार नाही याची काळजी म्हणजेच हा मसाज करताना हळुवारपणे करावा जास्त जोर देऊ नये.ह्यामुळे नाकाचा आकार व्यवस्थित करता येतो. मसाज केल्याने सायनस आणि मायग्रेनची समस्या देखील दूर होऊ शकते. आणि नाकाचा शेप सुद्धा योग्य येऊ शकतो.

नाक दोन्ही बाजूने दाबून व्यायाम :

      मित्रांनो, तुम्ही नाक दोन्ही बाजूने दाबून देखील नाकाचा शेप व्यवस्थित प्रकारे आणू शकतात. परंतु नाक दोन्ही बाजूने कापताना ते हळुवारपणे दाबायचे आहे.एकदम जोरात दाबू नका. नाक दोन्ही बाजूने दाबले जाताना जर त्रास होत असेल, तर तो व्यायाम तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत आहात. तर नाक प्रेस करताना त्याचा त्रास होता कामा नये. नाक हे हळुवारपणे प्रेस करावे. नाक  दोन्ही बाजूने दाबल्यामुळे देखील नाक बारीक करता येऊ शकते. हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हातांच्या बोटांनी नाकाच्या दोन्ही बाजू दाबत शेंड्याच्या दिशेने आणावेत. असा व्यायाम केल्याने देखील खूप फायदा होतो.  हा व्यायाम केल्यामुळे देखील नाकाचा शेप व्यवस्थित आणता येऊ शकतो.

नाक डावीकडे आणि उजवीकडे फिरवून व्यायाम :

     मित्रांनो, नाकाचा शेंडा वाढवण्यासाठी तुम्ही नाक डावीकडे आणि उजवीकडे फिरवून देखील योग्यप्रकारे आणू शकतात. म्हणजे एक प्रकारे योग्य व्यायाम करून नाकाचा शेंडा वर काढण्यास मदत होऊ शकते. श्वास आत घेऊन नाक डावीकडे आणि उजवीकडे फिरवा. असे केल्याने देखील नाक शेप मध्ये येऊ शकते. या सोबतच नाकाच्या छिद्रांना बंद करा आणि उघडा. या व्यायामामुळे नाकाच्या मांसपेशींना देखील आराम मिळत असतो.

वाचा  पडवळचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

श्वासांचा व्यायाम करून बघा :

      मित्रांनो, श्वासांचा व्यायाम करून देखील तुम्ही नाकाचा शेप व्यवस्थित प्रकारे आणू शकतात. श्वासांचा व्यायाम करणे म्हणजे एका नाकपुडीने श्वास आत घेणे व दुसऱ्यांना नाकपुडीतून श्वास सोडणे तसेच दुसऱ्या नाकपुडीतून श्वास आत घेणे तर पहिल्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडणे. यासाठी हाताच्या एका बोटाने नाकाच एक छिद्र बंद करून दुसऱ्या छिद्राने श्वास घ्या. पुन्हा याच प्रकारे दुसऱ्या बाजूने छिद्र बंद करून मोकळा श्वास घ्या. असे केल्याने देखील नाक शेपमध्ये येण्यास खूप मदत होते. आणि हाच व्यायाम शरीरासाठी खूप फायदेशीर देखील ठरत असतो.

मित्रांनो, वरील उपाय करण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊनच उपाय करू शकतात. वरील प्रकारे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here