पाठीला मुक्का मार लागल्यास काय उपाय करावेत ?

0
340
पाठीला मुक्का मार लागल्यास काय उपाय करावेत
पाठीला मुक्का मार लागल्यास काय उपाय करावेत

नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाने आपले आरोग्य जपले पाहिजे आपल्या आरोग्याची काळजी विशेष करून घेणे खूप गरजेचे ठरते. मित्रांनो आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्याकडे ही आपण लक्ष दिले पाहिजे जर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असेल मजबूत व बळकट असेल तर त्यामुळे आपल्या आरोग्याचे संरक्षण होऊ शकते कारण अनेक संसर्गजन्य आजार हल्ली निघालेले आहेत परंतु जर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही मजबूत असेल बळकट असेल तर हे आजार सहसा आपल्याला लवकर होत नाही. कारण या आजारांशी लढण्याची ताकद आपल्या शरीरामध्ये तयार झालेली असते. त्यासाठी आपण नियमित फळे खाल्ली पाहिजेत रोज कमी वेळचे सेवन केले पाहिजे आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. त्यांच्यासोबत आणि आपण नियमित व्यायाम करण्याची सवय ही ठेवली पाहिजे.मित्रांनो अनेक वेळा अनावधाने आपल्या तोंड जाऊ शकतो अथवा एखाद्या एक्सीडेंट झाल्यामुळे आपल्याला मुका मार लागण्याची अथवा जखम होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. काही वेळेस तर घरातल्या घरात पडल्यामुळे आपल्या पाठीला मुका मार ही लागू शकतो. अनेक जणांच्या बाबतीत असे घडू शकते आणि अनेक जणांच्या बाबतीत असे घडलेले आहे. काहीजण तर घरातील जिन्यावरून खाली पडल्यामुळे त्यांच्या पाठीला मुका मार लागू शकतो. मित्रांनो, तुम्हाला पाठविला अथवा इतर ठिकाणी मुका मार लागला असेल तर त्यावर आपण काहीतरी प्राथमिक उपचार केले पाहिजेत म्हणजेच घरगुती उपाय केले पाहिजे मित्रांनो फार पूर्वीच्या काळापासून आपले पूर्वज हे घरगुती उपाय करत आलेले आहेत. पूर्वीच्या काळी लोक जंगलातीलच काही वनस्पतींपासून घरगुती उपाय करत होते कारण त्यावेळी कुठल्याही प्रकारची दवाखाने उपलब्ध नव्हते. डॉक्टर्स नव्हते. त्यामुळे काही वैद्य हे जंगलात जाऊनच औषधी वनस्पती शोधून त्यांचा उपाय करत असे. मित्रांनो पाठीला मुक्का मार लागल्यास आपण कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतो याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग, पाठीला मुक्का मार लागल्यास काय उपाय करावेत? या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

वाचा  मन शांत ठेवण्यासाठी काय करावे या समस्येवर वेगवेगळे उपाय :-

पाठीला मुका मार लागल्यास काय उपाय करावेत?

एखादी दुर्घटना घडल्यामुळे अपघात झाल्यामुळे अथवा आपला तोल जाऊन आपण पडल्यामुळे पाठीला मुका मार लागू शकतो. मित्रांनो, मुका मार लागणे म्हणजे काय? याबद्दल आपण प्रथम माहिती जाणून घेऊयात!

एखादा अपघात झाल्यानंतर अथवा अनावधानाने आपला तोल गेल्यामुळे, जर आपण पडलो असेल आणि त्या ठिकाणी जखम झालेली नसेल, आणि तरीही त्या ठिकाणी दुखत असेल तर त्याला मुका मार म्हटला जातो. ज्या ठिकाणी मुक्का मार लागलेला असतो त्या ठिकाणची जागा ही हिरवट अथवा निळसर किंवा काळपट रंगाची होत असते. आणि त्यासाठी त्या ठिकाणची जागा ही सारखी सारखी दुखत असते. तर याला आपण मुका मार म्हणू शकतो.

मित्रांनो, जर तुम्हाला पाठीला मुक्का मार लागलेला असेल, तर त्यावर आपण कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतो. त्याबद्दल आपण आता जाणून घेऊयात.

पाठीला मुक्का मार
पाठीला मुक्का मार

मुका मार लागल्यास करावयाचे उपाय :- Mukka Mar Laglyas Krayche Upay

मित्रांनो, मुका मार लागल्यास आपण काही घरगुती उपाय करू शकतो. साधे सोपे उपाय केल्यामुळे देखील आपला मुक्कामार लवकरात लवकर बरा होण्याची शक्यता असते. तर काही जणांना हे उपाय केल्यामुळे लवकर फायदाही होत असतो. तर आपण कोणत्या प्रकारचे उपाय करू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया!

  • पाठीला मुक्का मार लागल्यास आपण त्या ठिकाणी कोरफडीचा गर लावू शकतो. मित्रांनो कोरफड ही वृत्तीने थंड प्रकारचे असते. पाठीला ज्या ठिकाणी तुम्हाला मुक्का मार लागलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कोरफडीचा रस लावून थोडासा हळुवारपणे मसाज केला पाहिजे. असे तुम्ही दोन ते तीन दिवस केल्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
  • पाठीला मुक्का मार लागल्यास तुम्ही त्या ठिकाणी बर्फाने देखील शेक देऊ शकतात. ज्या ठिकाणी तुम्हाला पाठीला मुक्का मार लागलेला असेल त्या ठिकाणी एखाद्या कपड्यात अथवा पिशवीत बर्फाचे तुकडे घेऊन ती जागा शेकली पाहिजे, त्या ठिकाणी गोलाकार पद्धतीने बर्फ फिरवला पाहिजे. हा उपाय तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकतात असे केल्यामुळे लवकरच तुम्हाला बरे वाटू लागेल. मुका मार लागल्या ठिकाणी सुरू झालेली असेल तर ती सूजही उतरण्यास मदत होऊ शकते.
  • पाटीलच्या ठिकाणी मुक्का मार लागलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आंबी हळद देखील लावू शकतात. एक सांग घेऊन त्यावर आम्ही हळद उगाळून घ्यावी आणि त्यामध्ये रगतरोडा हा देखील उगवून घ्यावा हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून ज्या ठिकाणी तुम्हाला मुका मार लागलेला असेल तर त्या ठिकाणी त्याचा लेप लावावा. हा उपाय तुम्ही दिवसातून दोनदा अथवा तीनदा करू शकतात हा उपाय तुम्ही सलग दोन ते चार दिवस केल्यास लवकरच तुमचा मुका मार जाण्यास मदत होईल शिवाय कुठली दुखापत न होता तुम्ही ठणठणीत बरे होण्यास मदत होऊ शकते.
  • पाठीला ज्या ठिकाणी मुक्का मार लागलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वाळूचा देखील शेक देऊ शकतात. एका भांड्यात वाळू घेऊन ती कोमट गरम करून घ्यावी आणि नंतर एका कपड्यात ती वाळू भरून घ्यावी आणि वाळू भरलेला कपडा हा अलगदपणे मुका मार लागल्या ठिकाणी हळुवारपणे शेकावा असे केल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
  • पाठीला मुक्का मार लागल्यास तुम्ही गरम पाण्याचा देखील शेक देऊ शकतात. आणि कोमट करून एका पिशवीत भरून मुका मार लागलेल्या ठिकाणी शेकावा असे केल्यामुळे मुका मार लागलेल्या ठिकाणची सूजही जाण्यास मदत होईल जर तिथे रक्ताच्या गुठळी जमा झालेल्या असतील तर तेही जाण्यास मदत होऊ शकते.
  • मित्रांनो पाठीला मुक्का मार लागल्यास त्या ठिकाणची जागा तुम्ही जास्तीत जास्त हलू देऊ नका. म्हणजेच पाठीची जास्तीत जास्त हालचाल करू नका शक्यतो तुम्ही सात ते आठ दिवस आराम घेतला पाहिजे जेणेकरून तुमचा मुक्का मार लागलेला लवकर बरा होण्यास मदत होऊ शकते.
  • मित्रांनो, वरील प्रमाणे उपाय सांगूनही तुम्हाला बरे वाटत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जेणेकरून, तुम्हाला योग्य तो उपचार मिळू शकतो.
वाचा   स्वप्नात सोन्याचा हंडा दिसणे शुभ की अशुभ ?

तर मित्रांनो, पाठीला मुक्का मार लागल्यास आपण कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतो याबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here