नमस्कार, अनेक जण त्यांच्या सौंदर्याची खूप काळजी घेतात. त्यांची त्वचा सुंदर इतकी सुंदर असते की, त्यावर एक डागही पडू देत नाही. तसेच ते उन्हात बाहेर जाताना, स्वतःच्या तोंडाला रुमाल बांधणे, तसेच बाहेरून आल्यावर आपला चेहरा स्वच्छ धुऊन घेणे, इतकी काळजी ते घेतात, की अक्षरशः कोणालाही हेवा वाटेल. पण जर त्यांच्या चेहऱ्यावर तीळ असेल तर त्यांच्या सौंदर्यात अजून भर पडते. मग त्या तीळ ओठांवर, दाढीवर, नाकावर, गालावर, कानावर, अशाप्रकारे असतात. चेहऱ्यावर तीळ येणे, म्हणजे नेमके काय? तर चेहऱ्यावर काळा डाग त्याला तीळ असे म्हणतात. पूर्वीच्या काळी तयारी केल्यानंतर पूर्वज, आजी, आई आपल्या गालावर किंवा कानामागे काजळ लावायचे, म्हणजे तुमच्या चेहऱ्याला कोणाची नजर ना लागो. काही जणांच्या चेहऱ्यावर 3 ते 4 च्या वर तीळ असतात. आता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, नाकावर तीळ असणे, शुभ की अशुभ? अनेक जणांना यामागील कारणे अजून माहित नाही. चला तर मग जाणून घेऊया की, नाकावर तीळ असणे, शुभ असते की अशुभ असते. व नाकावर तीळ असणे शुभ की अशुभ ते बघूयात.
Table of Contents
चेहऱ्यावर तीळ कशी येते ?
आपल्या चेहर्यावर लाल व काळ्या या दोन रंगाचे तीळ येतात. तसेच आपल्या चेहऱ्यावर मेलनोंसाईट्सच्या पेशी असतात. त्या मेलनिनचे पिगमेंटस तयार करतात. त्यामुळे चेहऱ्यावर तीळ व चामखीळ येतात, तसेच अतिशय केमिकलयुक्त प्रोडक्स वापरल्यामुळे, आपल्या चेहऱ्यावर रोम छिद्र असतात, ती बंद पडून चेहऱ्यावर चेहऱ्यावर तीळ येते.
नाकावर तीळ येण्या चा अर्थ काय असतो
वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, किती तीळ कशी येते, आता आपण बघत आहोत, कितीही शुभ असते की अशुभ.
ज्योतिष शास्त्राच्या म्हणण्यानुसार, नाकावर तीळ असणे शुभ असते, ज्योतिष शास्त्रानुसार अनेकजण आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असते त्यानुसार आपल्या भविष्याचे संकेत सांगत असतात. जसे की गालावर राहिली, तर बळकट, नाकाच्या बाजूला असेल तर गुढ स्वभावाचे असतात. ते त्यांचे तर्क लवकर कोणाजवळ सांगत नाही, तसेच नाकाच्या शेंड्यावर असेल, तर ते लोक एकदम कल्पनाशील असतात. ते त्यांचे काम व योग्य तसेच रचनात्मक पद्धतीने करतात. तसेच नाकाच्या खाली तीळ असेल, तर त्या लोकांना स्वतंत्रपणे जगायला आवडते. तसेच नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असेल, तर ते लोक त्यांचे काम कलात्मक पद्धतीने करतात.
नाकावर तीळ असेल तर शुभ कार्य
ज्योतिष शास्त्राच्या म्हणण्यानुसार, जर स्त्रियांच्या नाकावर तीळ असेल, तर तिला सौभाग्य प्राप्त होते, ज्यांच्या नाकावर तीळ असते, ते फार हुशार असतात. ते त्यांचे कोणतेही काम मनापासून करतात, त्यामुळे ते फार उंचीवर पोहोचतात, तसेच त्यांच्या नाकावर तीळ असते, ते यश हे नक्की मिळतात. पण थोडा वेळ लागतो. पण त्यांना यश नक्की मिळते. ज्यांच्या नाकावर तीळ असते, ते लोक खूप धनवान असतात, आणि प्रगती करतात.
नाकावर तीळ अशुभ अर्थ
नाकावर तीळ असणे, यांचे शुभ अर्थ हे सहसा नाहीतच. कारण नाकावर तीळ असणे, हे नेहमी शुभ मानले जाते. पण जर नाकावर लाल तीळ असतील, तर ते लोकं लवकर प्रगतशील बनत नाही, तसेच त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप संघर्ष करावा लागतो.
नाकावर तीळ आल्यास काय करावे
नाकावर किंवा चेहऱ्यावर तीळ असल्यास तुमच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. पण जर तीळ चे प्रमाण अधिक असेल, तर तुमचे सौंदर्य हे विद्रूप दिसते. अशावेळी जर तुम्हाला तीळ काढायचे असतील, तर त्यावर काही घरगुती उपाय आपण जाणून घेऊयात!
कोथंबीर वापरून बघा
ज्या लोकांच्या चेहऱ्यावर एक पेक्षा अधिक तीळ असतील, आणि त्यांना काढायचा असतील, तर अशा वेळी जर त्यांनी कोथिंबीरीचा वापर केला, तर त्यांना फायदा होईल, आता तुम्ही म्हणाल की, कोथंबीर तीळ काढण्यासाठी कशी फायदेशीर ठरेल, त्यासाठी तुम्ही कोथिंबीर पेस्ट करून तुमच्या तीळ असलेल्या जागेवर लावावे, त्याने तुमची तीळ कोरडी होऊन, निघण्यास मदत होते.
एरंडेल वापरून बघा
आता हल्ली मार्केटमध्ये, दुकानांमध्ये, मेडिकलमध्ये एरंडाचे तेल हे मिळते. जे तुमच्या नाकावरील तीळ कमी करण्यास मदत होते. तुमच्या चेहऱ्यावर, व शरीरावर कुठेही तीळ असतील, अशावेळी जर तुम्ही एरंडेल तेल ने तुमच्या तीळ असलेल्या ठिकाणी मसाज केला, तर तुमच्या चेहऱ्यावरील तीळ व कमी होऊन जाण्यास तुम्हाला मदत मिळेल.
विनेगर चा वापर करून बघा
हो, जर तुमच्या चेहऱ्यावर किंवा नाकावर तीळ असेल, अशा वेळी जर तुम्ही विनेगर चा वापर केला, तर तुम्हाला त्याने फायदा होईल. त्यासाठी अगोदर तुम्हाला चेहरा तुमचा कोमट पाण्याने धुवायचा आहे, त्यानंतर विनेगर हे कापसाच्या बोळ्यावर घेऊन, तुमच्या नाकावर व चेहऱ्यावर तीळ असलेल्या, ठिकाणी पाच ते दहा मिनिटे मसाज करायचा आहे. असे तुम्ही हप्त्यातून दोन ते तीन वेळेस केल्यास, तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल.
लिंबाच्या रसाचा वापर करून बघा
लिंबू मध्ये विटामिन सी असते. जे तुमच्या चेहर्यासाठी व शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते. ज्या वेळी तुमच्या चेहऱ्यावर तीळ चे प्रमाण अधिक असेल, अशावेळी जर तुम्ही लिंबाचा रस+ त्यात दोन थेंब मध मिक्स करून, तुमच्या तीळ असलेल्या ठिकाणी त्याने मसाज केल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील तीळ ची जागाही मुलायम पडून, तीळ हळू हळू जाण्यास मदत मिळेल.
जाणून घ्या : केस गळतीवर आयुर्वेदिक तेल
चला, तर मग आज आम्ही तुम्हाला नाकावर तीळ असणे, हे शुभ असते, की अशुभ असते, ते सांगितलेले आहेत. तसेच तुमच्या नाकावर व चेहऱ्यावर तीळ असेल, तर त्यावर कोणत्या घरगुती उपाय द्वारे तुम्ही काढू शकतात, हे सांगितलेले आहेत. नाकावर तीळ असणे हे तर नेहमी शुभसंकेत असते. पण शेवटी हा ज्याच्या त्याच्या विचारांचा हा प्रश्न असतो, तसेच जर विश्वास केले तर शुभ अशुभ संकेत हे आपल्या मनाचे असतात. जर तुम्ही योग्य रित्या चांगले कर्तव्य केले, तर तुम्हाला कसलेच प्रॉब्लेम होणार नाहीत. शेवटी हा विचाराचा प्रश्न असतो. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. अजून काही माहिती हवी असेल तर येथे पहा.
धन्यवाद !!