लहान बाळाचे कान कधी टोचावे

0
4183
लहान बाळाचे कान कधी टोचावे
लहान बाळाचे कान कधी टोचावे

नमस्कार, मित्रांनो एक पद्धतच होऊन गेली आहे, आता हल्लीच्या फॅशन मध्ये मुली, कान टोचून नवीन नवीन इयरिंग्स घालतात, अर्थातच हे आपल्याला माहितीच आहे. पण आता मुलं सुद्धा कान टोचायला लागलेले आहेत. पूर्वीच्या काळापासून सगळ्यांकडे कान टोचण्याची ही एक पद्धत होती. तिला कर्ण संस्कार असे म्हणतात. लहान बाळ झाले की, त्याचे लगेच बारा दिवसांनी किंवा सव्वा महिन्यानंतर कान टोचायचे. पण आता मुलं मोठे झाल्यावर  ही पुन्हा कान टोचतात. फॅशनचा जमाना आहे, असे ते आपल्याला सांगतात. त्यांच्या कानामधले नवीन नवीन इयरिंग्स पाहून अक्षरशः आपल्यासारख्यांना नवल वाटते! काही मुलं तर नाक ही टोचतात, तर काही भुवईच्या वर ही टोचतात. फॅशनचा जमाना आहे, असणारच! आता बदलत्या नियमानुसार आपल्यालाही बदलावे लागणारच! अजून काय काय नवीन पद्धती पाहायला मिळतात, देव जाणे! 

तर मग आज आपण बघणार आहोत, की लहान बाळाचे कान कधी टोचावेत? चला तर मग जाणून घेऊयात! 

बाळाचे कान का टोचतात? 

 

कान टोचण्याची प्रथा ही पूर्वीच्या काळापासून चाललेली आहेत. त्यामागे एक शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण आहे. कान टोचणे म्हणजे कर्ण संस्कार होय. हे शास्त्रीय कारण आहे, तसेच त्यामागील वैज्ञानिक कारण, हे आता आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात. 

 •  जर तुम्ही कान टोचतात, त्यावेळी तुमची विचार करण्याची क्षमता ही अधिक प्रमाणात वाढते. 
 • कान टोचल्याने तुमची ऐकण्याची क्षमताही वाढते. 
 • तसेच असल्याने मेंदूचा विकास होतो. म्हणजेच मेंदूकडे जी रक्तवाहिनी तुमची जाते, तेथे तिचे कार्य सुरळीत होतेच, आणि ती मेंदूला रक्त पुरवठा करण्याचे काम व्यवस्थित करते. 
 • कान टोचल्या ने तुमचे कान निरोगी राहतात. 
 • कान टोचल्याने लहान मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते. 
 • कान टोचल्याने लहान बाळांची आकलन क्षमता वाढते. 
 • तसेच कान टोचल्या ने लहान मुलांची एकाग्रता स्थिर राहते. 
 • तसेच कान टोचल्याने, तुमची शारीरिक व मानसिक आरोग्य हे एकदम उत्तम राहते. 
 • तसेच कान टोचल्याने महिलांचे मासिक पाळीचे समस्या होत नाही. 
 • तसेच कान पोचल्याने ताण-तणावापासून दूर राहतो. 
 • कान टोचल्या ने त्यामध्ये जो प्रेशर पॉईंट असतो, तो मुख्य असतो. तुम्ही त्या जागेवर कान टोचावेत, तर तुम्हाला लठ्ठपणा ही येणार नाही. 
 • कान टोचलेले लहान बाळ हे चपळ राहते. उत्तेजित राहते. 
वाचा  नाकातून पाणी येणे यावर काही उपाय

लहान बाळाचे कान कोणाकडून, व कोणत्या वेळी टोचून घ्यावेत? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला कान कोणत्या कारणांमुळे ठेवतात, ते सांगितलेले आहेतच. आता कान आपण कोणाकडून व कोणत्या वेळेत टोचावेत, हे जाणून घेऊयात, चला तर मग बघुयात! 

पूर्वीच्या काळी तर कान घरीच टोचायचे, आजी सुई दोरा चे साह्याने टोचायची. तेही शुद्ध खोबरेल तेल वापरून, त्यात धागा किंवा चांदीचा तार बुडवून त्याने कान टोचण्याची प्रथा होती, तसेच आता कान सोनाराकडून ही टोचून घेता येतातच. त्यावेळी सोनार आपल्या बाळाचे कान बघून, त्यावर एक पॉईंट घेऊन, खोबरेल तेलात सोन्याचा/चांदीचा तार बुडवून कान टोचतात. त्याने  शुद्ध खोबरेल तेलाचा वापर केल्यामुळे, कानाला इन्फेक्शन होत नाहीत. तसेच तसेच काही दवाखान्यामध्ये लहान बाळाचे कान टोचण्याचे गण असतात,  बाळाला दवाखान्यात तुम्ही घेऊन जाऊन आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली तुम्ही बाळाचे कान टोचून घेऊ शकतात. तसेच डॉक्टर बाळाच्या कानाला इन्स्पेक्शन होणार नाही, याची काळजी घेतात. तसेच बाळाला अँटिकसेफ्टीक क्रीम देतात कानाला लावायला. 

जाणून घ्या : लहान मुले लवकर बोलण्यासाठी उपाय 

कान टोचून आल्यावर बाळाची काय काळजी घ्यावी? 

ज्यावेळी लहान बाळाचे कान टोचतात, त्यावेळी त्याचे लक्ष दुसरीकडे वेधले जाते. खेळण्यांमध्ये म्हणा, किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलण्यामध्ये, मग त्याचे कान टोचले जातात. त्यामुळे ते त्याचे एक प्रकारे मुके दुखणे होय. मग त्याला ते समजून येत नाही. पण त्याला त्याचा त्रास होतो. त्याच्या त्यांचे कान सुजतात, दुखतात, त्यावेळी त्याचें कान दुखतात, त्यावेळी ते कानाला हात लावू देत नाही, सारखे रडतात. तेव्हा आपल्यालाही वाईट वाटते, पण ती एक प्रथा असल्यामुळे, आणि बाळाला ते चांगले असल्यामुळे, आपण त्याचे कान टोचतात. कान टोचल्या नंतर त्याच्या कानाला सूज येते, किंवा काही बाळाचे तिथे पु येते तर काही वेळा रक्तही येते. तर काही बाळांचे कान लवकर सावरतात. ज्या बाळांना कानाचा त्रास होतो, अशा वेळी तुम्ही खोबरेल तेलात, हळद टाकून, बाळाच्या कानाला लावावेत. कारण हळद ही अंतीबॅक्टरियल असते. त्याने बाळाच्या कानाला कोणतेही इन्फेक्शन होत नाहीत. तसेच त्याच्या कानात जो  दोरा/ चांदीचा तार घातलाय, तो दोन तीन दिवसांनी हळूहळू फिरवावा. त्याने लवकर बरा होतो आणि दोरा तिथेच कानाला चिपकून राहत नाही. 

वाचा  ओले खजूर खाण्याचे फायदे

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला लहान बाळाचे कान का टोचतात, आणि कान टोचल्यावर तुम्हाला काय फायदे होतात, तसेच कोणाकडून टोचून घ्यावेत, व काय काळजी घ्यावीच, हे सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेला माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. अधिक माहिती साठी येथे पाहू शकता.

धन्यवाद !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here