जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

0
1160
जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे
जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

       ‘आरोग्यम् धनसंपदा’ मित्रांनो, हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. मित्रांनो आपल्या सगळ्यांना आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेता आली पाहिजे. खरंतर आपल्या आरोग्यासाठी काय खावे काय खाऊ नये तसेच जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे काय आहेत हे आपल्याला माहित पाहिजे.

बरेच जण फास्ट फूडचे सेवन करत असतात. तसेच ते आपल्या मुलाबाळांनाही फास्टफूडची सवय लावून देतात. परंतु, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हे फार धोकादायक असते. नेहमी सतत फास्ट फूड खाणे शरीरासाठी धोकादायकच आहे. नेहमी तुम्ही बाहेरचे अन्न खाल्ल्यामुळे देखील तुमचे शरीराचे आरोग्य बिघडू शकते. याने शरीराची चयापचय प्रक्रिया बिघडू शकते. फास्ट फूड खाल्ल्यामुळे शरीरात चरबी जास्त प्रमाणात जमा होते. म्हणून मित्रांनो तुम्ही तुमचे आरोग्य जपले पाहिजे.

    मित्रांनो, गुळ हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. शरीरासाठी गुळ खाणे हे फार उत्तमदायक आहे. गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. बऱ्याच लोकांना अन्नपचन याचा त्रास होत असतो, जेवण झाल्यानंतर अन्नपचन होणे ही क्रिया फार महत्त्वाची असते. अन्नपचनाची क्रिया सुरळीत राहण्यासाठी, मित्रांनो, तुम्ही जेवणानंतर गुळ खाणे फार महत्त्वाचे असते. मित्रांनो, गुळाचे खूप सारे फायदे आहेत तसेच जेवणानंतर गुळ खाल्ल्याने अनेक फायदे तुम्हाला होऊ शकतात. मित्रांनो, गुळ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकणार आहे. जेवणानंतर तुम्ही जर गुळाचे सेवन करत असाल तर तुमच्या चयापचय प्रक्रियेत वाढ होणार आहे. गुळ खाण्याचे एक ना अनेक फायदे आहेत.

मित्रांनो, तुम्ही चहा पितात पण चहा मध्ये तुम्ही साखर टाकतात, साखर टाकण्याऐवजी तुम्ही जर चहा मध्ये गुळाचा चा वापर केला तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. मित्रांनो, गुळ खाणे हे फार जुन्या काळापासून चालत आलेले आहे. जुन्या काळातील लोक उन्हातानातून घरी परतल्यानंतर सर्वप्रथम पाणी न पिता आधी गुळाचे सेवन करत होते. आणि गुळाचे सेवन केल्यानंतरच पाणी पीत होते यामुळे त्यांच्या शरीरातील थकवा हा जात होता तसेच शरीरातील उत्साह वाढण्यास देखील मदत होत होती. म्हणून जुन्या काळातील लोक जास्तीत जास्त सेवन करत. आता देखील फार कमीच लोकांना गुळाचे सेवन केल्याने काय फायदे होतात हे माहीत असेल. तर गूळ सेवन केल्याने काय नक्की फायदे होतील ? जेवणानंतर गुळाचा खडा खाल्ल्याने काय काय फायदे होतात ? हे आपल्याला जाणून घ्यायला हवे. चला तर मग जाणून घ्या गूळ सेवन करण्याची काय काय फायदे होऊ शकतात.

वाचा  टाळूला फोड येणे

जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे :

  • जेवणानंतर गुळ खाल्ल्यास शरीरातील पुढील प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.
  • बऱ्याच जणांना जेवणानंतर आंबट ढेकर येत असतात. त्यासाठी काळे तीळ + सैंधव मीठ + व थोडे गुळ एकत्र करून घ्या. एकजीव केल्यानंतर त्याचे सेवन केल्यास नक्कीच तुम्हाला आराम मिळेल.
  • बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास होत असतो तीस ते चाळीस वया नंतर हा त्रास उद्भवतो. यासाठी तुम्ही गुळाचा खडा + आलं हे एकत्र करून घ्या. आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी तुम्ही याचे सेवन करा. हे खाल्ल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो.
  • गुळ खाल्याने हाडे बळकट होण्यास मदत होते.
  • गुळा मध्ये अँटिऑक्सिडंट, anti-inflammatory गुण असतात. त्यामुळे गुळाचे सेवन करणे खूप महत्त्वाचे असते.
  • जी लोक अंगमेहनतीचे काम करतात त्यांनी गुळाच्या खड्याचे सेवन करणे फार महत्त्वाचे ठरू शकते. याने त्यांच्या शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होईल  व शरीरातील उत्साह वाढण्यास देखील मदत होऊ शकते.
  • ज्यांना पोटाच्या समस्या असतील जसे की गॅस होणे, ऍसिडिटी, पोटाच्या तक्रारी असतील तर त्यांनी नियमित जेवणानंतर गुळाचे सेवन केल्यास त्याचा फायदा नक्की होऊ शकतो.
  • बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास गुळाचे सेवन करणे खूप फायदेशीर असते. याने तुमचे पोट साफ राहण्यास मदत देखील होते.
  • शरीर बलवान होण्यासाठी तसेच शरीरातला थकवा जाण्यासाठी गुळ+ दूध यांचे सेवन करणे फार महत्त्वाचे ठरू शकते. यामुळे तुमच्या शरीरातील थकवा जाण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
  • बुद्धी कार्यरत ठेवण्यासाठी तुम्ही गुळाचे नियमित सेवन करणे महत्त्वाचे ठरू शकते. गुळाचा चहा केल्याने देखील फायदा होऊ शकतो.
  • गुळाचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते.
  • श्वसन संस्थेच्या सर्व विकारांवर गुळाचे सेवन केल्याने नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • आल्याच्या चहामध्ये गूळ टाकून प्यायल्यास शरीरासाठी आराम मिळतो किंवा तुम्ही काढा यामध्ये देखील गुळ टाकून पिल्याने तुमच्या शरीराला आराम मिळू शकतो.
  • गुळाचे सेवन केल्यामुळे शरिरांमध्ये स्फूर्ती येऊन कार्यशक्ती पूर्ववत होते.
  • जड अन्न खाल्ल्याने अन्नपचन याचा त्रास होत असतो त्यामुळे जेवणानंतर तुम्ही जर गुळ खाल्ला तर अन्नपचन याची प्रक्रिया सुधारण्यास मदत होत असते.
  • सर्दी-पडसे दूर ठेवण्यासाठी देखील तुम्ही गुळाचा वापर करू शकतात. यासाठी आलं + काळीमिरी +गुळाचा खडा हे मिश्रण एकजीव करून घ्या व  त्याचे सेवन करा.
  • उन्हाळ्यात उष्ण वातावरणामुळे डोळे, हात-पाय यांची आग होत असते. त्यामुळे तुम्ही गुळाचे सेवन करू शकतात. याने नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो.
  • गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे नक्कीच शरीराला फायदा होतो.
  • ज्या लोकांना डोळ्यांची निगडित समस्या असतील त्यांनी गुळाचे सेवन नक्कीच करून बघा. गुळाचे नियमित सेवन केल्याने तुमची दृष्टी सुधारण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
  • गुळामध्ये कॉपर, मॅग्नेशियम, आयरन, कॅल्शियम, झिंक, सेलेनियम, पोटॅशियम फॉस्फरस आहेत. हे शरीराच्या दृष्टीने फार महत्वाचे.
  • विटामिन ए , विटामिन ई, विटामिन सी आणि डी  यांचे प्रमाण जास्त आहे.
  • गुळाचे नियमित सेवन केल्याने रक्तातील आरबीसी वाढण्यास मदत होते. म्हणजेच रक्त वाढण्यास मदत होते.
  • गुळाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील इम्मुनिटी पॉवर वाढण्यास देखील नक्कीच मदत होते.   
वाचा  पायाचा अंगठा दुखणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय :-

जेवणानंतर गुळ खाल्ल्याने वरील प्रमाणे खूप फायदे तुम्हाला होऊ शकतात. जेवणानंतर तुम्ही नियमित गुळाचा खडा सेवन केल्याने तुमच्या शरीरात साठी तुम्हाला फार उत्तम ठरू शकते. तुमच्या चयापचय प्रक्रियेत वाढ होईल म्हणजेच अन्न पचन क्रिया सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. आणि तुमचे नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवू शकते. सध्या व्हायरल इन्फेक्शन फार लवकर होत असते. जसे की सर्दी-पडसे होणे हे सर्व दूर ठेवण्यासाठी तुम्ही नियमितपणे गुळाचे सेवन करू शकतात. गुळाचे सेवन केल्याने तुमच्या इम्युनिटी मध्ये वाढ होण्यास मदत होऊ शकते. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही जेवणानंतर गुळाचे सेवन करून बघा. जेवणानंतर गुळ सेवन केल्याने तुम्हाला एक ना अनेक फायदे होऊ शकतात.

मित्रांनो, जेवणानंतर गुळाचा खडा खाल्ल्याने काय काय आश्चर्यचकित फायदे होऊ शकतात हे तुम्ही वरीलप्रमाणे जाणून घेतले आहे. तर मित्रांनो जेवणानंतर नक्कीच तुम्ही गुळाचे सेवन करून बघा याने तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतात हे तुम्हाला जाणून घेऊ शकते. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.   

     धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here