हिवाळ्यात केसांची काळजी

0
689
हिवाळ्यात केसांची काळजी
हिवाळ्यात केसांची काळजी

           हिवाळा,उन्हाळा, पावसाळा असे तीन ऋतू सगळ्यांनाच ठाऊक असतात. आणि या तीनही ऋतूनुसार आपण आपल्या केसांची काळजी योग्य पद्धतीने घेतली पाहिजे. प्रत्येक ऋतूनुसार आरोग्य आपण जपले पाहिजे. कुठल्या ऋतूनुसार आपण आपल्या केसांची काळजी कुठल्या पद्धतीने घेता आली पाहिजे हे ठाऊक असणे गरजेचे असते. विशेषतः हिवाळ्यात केसांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. हिवाळ्यात दिवसेंदिवस थंडीचा पारा हा चढत असतो. हिवाळा सुरू झाला की आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यामध्ये केसा विषयी अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात. तसेच हिवाळ्यात त्वचा ही कोरडी देखील पडण्याची शक्यता असते.  हिवाळ्यात केस जपणे हे फार महत्त्वाचे असते.  

हिवाळ्यात तुम्ही जर आरोग्य जपले तर त्याचा तुमच्या केसांवर चांगला परिणाम होत असतो. हिवाळ्यात अंडी चा समावेश तुम्ही तुमच्या आहारात केला पाहिजे. हिवाळ्यात दुग्धजन्य पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश केला पाहिजे जसे की ताक,पनीर इत्यादींचा. हिवाळ्यात तुम्ही जास्तीत जास्त पालेभाज्यांची सेवन करणे आरोग्यासाठी उत्तम दायक ठरू शकते. ड्रायफ्रूट चा समावेश देखील हिवाळ्यात तुम्ही तुमच्या नियमित आहारात करू शकतात. हिवाळ्यात बाजरीच्या भाकरी चा देखील समावेश तुम्ही करू शकता. तसेच तुम्ही हिवाळ्यात नियमित व्यायाम करण्याची सवय लावून घेतली पाहिजे याने चांगलाच परिणाम तुमच्या केसांवर होऊ शकतो. विशेषतः हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी, हिवाळ्यात तुम्ही केसांची निगा कशी राखावी हे तुम्हाला जाणून घेणे फार गरजेचे असते. हिवाळ्यात केसांची निगा राखावी यासाठी तुम्ही काय खाल्ले पाहिजे आरोग्य कसे जपले पाहिजे केसांसाठी काय वापरले पाहिजे हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते.

हिवाळ्यात केसांवर काय परिणाम होतात?

      हिवाळा म्हटला की आरोग्य जपणे आलेच. हिवाळा लागला म्हणजे त्याचा केसांवर परिणाम होत असतो विशेषत: हिवाळ्यात तुम्ही केसांची काळजी घेतली पाहिजे. हिवाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे हे देखील तुम्ही  जाणून घेतले पाहिजे. हिवाळ्यात जर तुम्ही तुमच्या केसांची निगा राखली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या केसांवर दिसून येतो. जसे की केसात कोंडा होणे, केस निस्तेज आणि शुष्क होणे असे विपरीत परिणाम दिसून येतात.        

  • हिवाळ्यात थंड वातावरणाचा केसांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे थंडीत केसांची जास्त काळजी घेणे गरजेचे असते.
  • हिवाळ्यात केस निस्तेज आणि शुष्क बनतात.
  • अनेकजण हिवाळ्यात त्वचेची काळजी घेत असतात पण केसांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. यासाठी केसांसाठी त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.
  • थंड वातावरण म्हटले की आपण केस धुणे सहजरीत्या टाळतो त्याचा परिणाम केसांवर होतो.
  • त्यामुळे तुम्हाला केस गळतीची समस्या उद्भवू शकते.
  • हिवाळ्या मध्ये केस निस्तेज आणि शुष्क बनल्यामुळे केसांचा मुलायमपणा जातो.
  • हिवाळ्यात केस कोरडे झाल्यामुळे केसांतील नैसर्गिक चमक कमी होते.
  • तसेच केसांवर कोंडा अधिक प्रमाणात होऊ शकतो.
  • त्यामुळे तुम्हाला केस गळतीची समस्या उद्भवू शकते.
  • हिवाळ्यात केसांना शक्यतो मेहंदी लावणे टाळावं त्यामुळे केस जास्त कोरडे होतात.
  • हिवाळ्यातील वातावरण थंड असल्यामुळे तुम्ही अतिगरम पाणी ने केस धुतल्यास केस गळतीची समस्या होऊ शकते.
वाचा  पोटातील आतड्याला आलेली सूज घालवण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपचार :-

थंडीत केसांची काळजी कशी घ्याल ?

       हिवाळा म्हटला म्हणजे थंड वातावरण आलेच थंड वातावरणाचा परिणाम हा केसांवर होत असतो. हिवाळ्यात थंड वातावरणामुळे केसांवर काय परिणाम होते हे तुम्ही वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे. हिवाळ्यात आपल्या केसांवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे हे देखील जाणून घेणे फार महत्त्वाचे असते.चला तर मग, आपण हिवाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.

  1. हिवाळ्या मध्ये  केस धुताना नेहमी माईल्ड शाम्पू वापरावा.
  2. हिवाळ्यात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा anti-dandruff शाम्पूने केस धुवावेत.
  3. आठवड्यातून किमान एकदा तरी केसांना कंडिशनर लावावे.
  4. केस धुण्या आधी केसांना तेलाने मसाज केली पाहिजे.
  5. केस धुवून झाल्यावर केसांना सिरम लावले पाहिजे.
  6. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कॅल्शिअम आणि बायोटीन असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
  7. केसांचे आरोग्य हिवाळ्यामध्ये चांगले राहण्यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे.
  8. हिवाळ्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहारात केला पाहिजे. जसे की ताक,पनीर इत्यादी.
  9. शिवाय तुम्ही तुमच्या आहारात ड्रायफ्रूट चा आवर्जून समावेश करावा.
  10. हिवाळ्यात केस धुऊन झाल्यावर केसांना ब्लो ड्राय करणं शक्यतो टाळावे.
  11. हिवाळ्यात थंड हवामानामुळे डोक्याची त्वचा ही कोरडी होऊन डोक्यात कोंडा होत असतो.
  12. केसांच्या मुळांना पोषण मिळणे फार गरजेचे असते.त्यासाठी केसांना पोषण आणि चकाकी येण्यासाठी हिवाळ्यात 5 बदाम आणि 1 ते 2 अक्रोड नियमित सेवन करा.
  13. हिवाळ्यात केसांना कोरडेपणा येत असतो तर हा कोरडेपणा कमी करून केसाचे आरोग्य सुधारण्यासाठी  डोक्यात रक्तभिसरण वाढण्याची गरज असते.
  14. हे रक्ताभिसरण वाढवण्यासाठी तुम्ही एक मूठभर ड्रायफ्रूट्स खाणं फायदेशीर ठरतं. ड्रायफ्रुट्स मध्ये असलेल्या पोषक गुणधर्मामुळे केस दाट,मऊ आणि मुलायम होण्यास नक्कीच मदत होत असते.
  15. हिवाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना तेलाने मसाज केली पाहिजे.
  16. केसांची  मसाज करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा एरंडेल तेलाचा वापर करू शकतात.
  17. हिवाळ्यात कोंडा वाढीचा त्रास होत असतो तर यासाठी टी ट्री ऑइल तेलात खोबरेल तेल मिसळून ते केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने फायदा तुम्हाला होऊ शकतो.
  18. तसेच कोंड्यावर कोरफडीचा रस हा उत्तम ठरत असतो. अंघोळीला जाण्यापूर्वी 15 ते 20 मिनिट आधी कोरफडीच्या रसाने किंवा लिंबाच्या रसाने केसांना मसाज केल्यास केसातील कोंडा निघून जाण्यास मदत  होते.
  19. थंड ऋतू मधे केसांना मेहंदी लावण्याने देखील केस कोरडे पडण्याची शक्यता असते.पण जर मेहंदी लावायची असेल तर मेहंदी मध्ये दोन चमचे खोबरेल तेल मिक्स करून मेहंदी केसांनालावावी याने तुमची केस कोरडे पडणार नाहीत.
  20. हिवाळ्यात केसांसाठी मास्क वापरायचे असेल तर त्यासाठी अंड आणि कोमट खोबरेल तेल व्यवस्थित एकत्रित करून ते तुम्ही कसाला लावू शकतात.
  21. केस मुलायम होण्यासाठी तुम्ही नारळ पाणीदेखील केसांना लावू शकतात.
  22. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही आहारात मोड आलेल्या धान्यांचा समावेश नक्कीच करून बघा. त्याने तुमची त्वचा देखील उत्तम राहण्यास मदत होते.
वाचा  लहान मुलांना उन्हाळी लागणे या समस्येवर घरगुती उपाय

हिवाळ्यात केस धुवावेत का?

       हिवाळा लागला म्हणजे म्हणजेच अनेकांना केसांविषयीच्या समस्या उद्भवत असतात. त्यासाठी केसांचे आरोग्य जपण्यासाठी नेमके करावे तरी काय?  केसांचे आरोग्य जपावे तरी कसे ? हा प्रश्न अनेक जण याच पडलेला असतो. तर मित्रांनो जास्त घाबरण्याचे कारण नाही आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही करून बघा. बऱ्याच जणांना हा प्रश्न देखील पडलेला असतो की हिवाळ्यात केस धुवावेत का? हिवाळ्यात केस धुतले पाहिजे का हे देखील जाणून घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात नेमकी केस किती वेळा धुवावेत. केस कशा पद्धतीने धुवावेत हे जाणून घेणे फार गरजेचे आहे.

  •  हिवाळ्यात केस आठवड्यातून किमान दोनदा तरी धुवावेत.
  • थंडी जास्त असेल तरीही अति गरम पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करणं तुम्ही शक्यतो टाळावं.
  • थंडीत केस धूतांना ते हळुवारपणे धुवावेत.
  • केस धुतल्यानंतर ते लगेच विंचरू नयेत. आणि केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर तुम्ही शक्यतो करू नये.
  • तसेच केस धुतल्यानंतर ते नैसर्गिक पद्धतीने सुकवावेत आणि केस नीट व्यवस्थित पद्धतीने सुकल्यानंतर वाईल टूथ च्या म्हणजेच जाड  कंगव्याने केस विंचरावेत.
  • तसेच केस ओले असताना घराबाहेर जाणे देखील टाळणे गरजेचे असते.
  • कारण वातावरणातील धुळ ,प्रदूषण केसांना चिकटते म्हणून त्यामुळे केस गळण्याची शक्यता वाढते. आणि बाहेर जाणे गरजेचे असेल तर केसांना स्कार्फ बांधून घ्यावेत.
  •  केसांवर केमिकल कलरचा वापर केल्याने केस कमकुवत होऊन तुटतात.
  • शक्यतो हिवाळ्यात रोज केस धुणे टाळावे. रोज केस धुतल्याने केस कोरडे होतील तसेच केस गळतीची समस्या उद्भवू शकते.
  • हिवाळ्यात केस धूण्याआधी शक्यतो रात्री केसांना तेल लावून मसाज करावी आणि दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने केस धुवावेत.

हिवाळ्यात देखील तुम्ही तुमच्या केसांची नीट काळजी घेतली पाहिजे. केसांचे आरोग्य जपले तर नक्कीच तुमचे केस मऊ, मुलायम व घनदाट होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे फक्त हिवाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतू तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेणे फार गरजेचे आहे. तुमच्या नेहमीच्या आहारात योग्य तो फळांचा, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. तसेच नियमित ड्रायफ्रुट्स सेवन करणे देखील केसांना त्याचे पोषण मिळते.

वाचा   चेहऱ्यावर गुलाब जल लावण्याचे फायदे

     मित्रांनो हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी, केसांची निगा कशी राखावी, हिवाळ्यात केस धुणे योग्य आहे कि नाही? हे वरील प्रमाणे तुम्ही जाणून घेतले आहेत. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्कीच आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

     धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here