लसुन चे फायदे

0
612
लसुन चे फायदे
लसुन चे फायदे

नमस्कार, मित्रांनो लसुन हा घराघरात वापरला जाणारा पदार्थ आहे. तसेच कोणत्याही पदार्थाला रुचकर चव तर लसूण शिवाय येतच नाही. तसेच आता हल्ली नवीन फुड्स मध्ये लसुन चा वापर जास्त प्रमाणात केला जात आहे. सगळ्यांचा आवडता फूड्स म्हणजे चायनीज फूड्स यामध्ये लसुन चा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. लसूण  आपल्या शरीरासाठी चांगला असतो, तसेच लसूण मध्ये अँटिबायोटिक,अँटीव्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे लसुन आपल्या शरीरासाठी फार गुणकारी आहे, पण हल्लीच्या लहान मुलांना तसेच तरुण मंडळींना लसुन खायला आवडत नाही. चला तर मग जाणून घेऊयात लसुन चे फायदे.

ते लसुन काढून ठेवतात. भाजीमध्ये लसून आला, तर ओरडतात, कशाला टाकला, पण खरं सांगू लसूण हा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही तुमच्या आहारात लसूण घेतला, तर तुमच्या पासून अनेक समस्या दूर राहतील. पूर्वीच्या काळी तर माझी आजी जेवताना, कच्चा लसूण फोडून जेवणासोबत खायची. आजी म्हणायची, की लसुन खा आणि निरोगी रहा. म्हणूनच तर आज आपण जाणून घेणार आहोत, की लसुन तुमच्या शरीरासाठी कसा फायदेशीर ठरतो? चला तर मग जाणून घेऊयात. 

लसुन खाण्याचे फायदे? 

हल्ली लसुन हा लहान मुलांना आवडत नाही, ते प्रत्येक भाजीतून लसुन काढून ठेवतात. पण लहान मुलांसाठी सुद्धा लसूण हा फार गुणकारी आहे. तर मग चला मग लसुन कोणत्या समस्यावर तुम्हाला फायदेशीर ठरतो, ते जाणून घेऊयात. 

सर्दी वर आराम मिळतो

हल्ली लहान मुलांना सर्दीचा त्रास खूप प्रमाणात होतो. कारण लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे त्यांना व्हायरल इन्फेक्शन लवकर प्रमाणात होते. अशावेळी त्यांना सर्दी  अगोदर होतेच, अशावेळी जर तुम्ही लहान मुलांना लसुन ची माळा करुन त्यांच्या गळ्यात घातली, म्हणजेच अगदी सहा सात महिन्याच्या बाळाला सर्दी वर आराम मिळतो. तसेच मुलगा जर वर्षाच्या वर असेल, तर तुम्ही त्याला लसूण घालून पेज, तसेच लसणाची डाळ खिचडी, असे खाऊ घालावे. लहान मुलांची सर्दी लसुन खाल्ल्यामुळे लवकर जाते. 

वाचा  गरोदरपणात लो ब्लड प्रेशर होणे लक्षणे व घरगुती उपाय :-

तीव्र डोकेदुखी क्षणात थांबते

हल्ली वातावरणातील बदलामुळे, तसेच प्रवास केल्यामुळे किंवा उपाशी राहिल्यामुळे, अवेळी खाणे, यामुळे अशा वेळी डोकेदुखीची समस्या भरपूर जणांना होते, पण डोकेदुखी इतकी तीव्र असते, की त्याचा त्रास आपल्याला सहन होत नाही. अशा वेळी आपले डोके फुटायला करते, तर अशा वेळी जर तुम्ही लसूण वापरला, तर तुम्हाला फायदा मिळेल. हो तुम्हाला जाणून खरंच आश्चर्य वाटेल, पण डोकेदुखीची समस्येवर लसूण हा फायदेशीर ठरतोय. त्यासाठी तुम्हाला लसणाचे तेल आणून ते कपाळावर चोळायचे आहे, त्याने तुमची डोकेदुखी वर आराम मिळतो. हे तेल तुम्हाला मेडिकल स्टोअर्स मध्ये कुठेही उपलब्ध असते, तिथे मिळेल. तसेच लसणाचे तेल तुम्ही सांधेदुखीवर,  गुडघेदुखीवर ही वापरू शकतात. 

कान दुखी वर आराम मिळेल

बऱ्याच वेळेला सर्दी-पडसे मुळे, काही जणांचे कान ठणकतात, दुखतात, किंवा कानाच्या आजूबाजूला सूज येते, अशा वेळी जर त्यांनी लसणाचे तेल कापसाच्या बोळ्यावर घेऊन, कानाच्या आजूबाजूच्या भागात लावले, तर तुमची कानदुखी त्वरित थांबते. 

पोट दुखीवर आराम मिळतो

बऱ्याच वेळेला काहीजणांना अपचन होते, पोटात दुखते, तसेच गुबारा धरल्यासारखे वाटते, गॅसेस होतात, अशा वेळी जर त्यांनी लसुन चा वापर केला, तर त्यांना त्यावर फायदा मिळेल. त्यासाठी तुम्हाला अद्रक, लसुन यांना वाटून त्यामध्ये, सैंधव मीठ टाकून, त्याचे पाणी प्यायला द्यावे. त्याने त्यांना आराम मिळतो. 

खोकला थांबतो

खूप जणांना सर्दी नंतर खोकला लागतो, तसेच काही जणांना कफयुक्त खोकला येतो, कोरडा खोकला येतो, खोकून खोकून त्यांना अक्षरशः गळल्यासारखे वाटते, अशा वेळी जर त्यांनी लसणाचा रस व त्यामध्ये मध अद्रक चा रस घालून, त्याचे चाटण केले, तर त्यांचा खोकला हा थांबतो. खोकल्यावर आराम मिळतो. 

लसुन खाल्ल्याने वजन कमी होते

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण खरंच लसुन खाल्ल्याने वजन कमी होते. कारण लसुन हा पाचक असतो. तसेच लसूण मध्ये कोलेस्ट्रॉल कमी करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच ज्यांचे वजन असते, अशा लोकांना पचन संस्थेशी निगडित समस्या असतात, आणि लसुन खाल्ल्याने तुमची पचन संस्था ही सुरळीत होते. त्यामुळे तुमचे वजन हे वाढत नाही. शिवाय वजन कमी होण्यासाठी  मदत मिळते, तसेच वजन तर जास्त असले, तर शरीरात आजारांचे प्रमाणही वाढते. त्यामध्ये हार्ट अटॅक येणे, बीपी हाय होणे, उच्चरक्तदाब होणे, यासारख्या समस्या भरपूर बघावयास मिळतात. तसेच वजन वाढल्यामुळे कॅन्सर सारख्या रोगांवर पासूनही आपल्याला धोका असतो. अशावेळी तुम्ही तुमच्या आहारात नियमित लसुन चा वापर केला, तर यासारख्या समस्या पासून तुम्ही दूर राहतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात रोजच्या रोज पाच ते सहा लसूण पाकळ्या तळून, त्यावर नमक टाकून नियमित खाल्ल्यास, अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतील. 

वाचा  स्वप्नात चतुर पक्षी दिसणे शुभ की अशुभ!

तुमची शुगर लेव्हल वाढत नाही

 जर तुम्ही नियमित लसूण खाल्लात, तर तुमची शुगर लेव्हल वाढत नाही. मधुमेही लोकांना शुगरचा खूप त्रास असतो. त्यांची शुगर व अचानक वाढून जाते, अशा वेळी जर त्यांनी त्यांच्या आहारात लसणाचा वापर केला, तर त्यांच्या शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण हे नियंत्रणात राहते. शिवाय लसुन खाल्ल्याने, कोलेस्ट्रॉल कमी होते. लसून मध्ये अंटीबॅक्टरियल, गुणधर्म असल्यामुळे ते त्यांच्या शरीरासाठी फायदेशीर असते. त्यासाठी जर त्यांनी त्यांच्या आहारात कच्चे लसुन खाल्ले, तर त्यांना खूप फायदा मिळतो. शिवाय त्यांनी कच्चा लसूण जर त्यांना आवडत नसेल, तर त्यांनी त्याची चटणी करून त्यांच्या आहारात खाल्ली, तर त्यांना फायदे होतात. तसेच त्यांनी लसुन पाकळी खाऊन, त्यावर कोमट पाणी पिल्यास, त्यांना पचन संस्थेशी निगडित समस्याही दूर होतात. 

लसुन चे काही दुष्परिणाम असतात का

लसुन चे दुष्परिणाम हे जास्त प्रमाणात नाहीत. पण ज्यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तसेच अतिसार आहे, किंवा एलर्जी आहे, अशा लोकांनी लसूण खाऊ नयेत. तसेच काही लोकांनी लसुन जास्त प्रमाणात खाल्ला, तर त्यांच्या तोंडाचा वासही येतो. अशा यावेळी त्यांनी त्यांच्या आहारात जास्ती लसूण खाऊ नये, तसेच काही चे ऑपरेशन्स झाले, म्हणजेच शस्त्रक्रिया झाली आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात लसूण काही कालावधीसाठी कमी खावा, कारण लसून मध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे त्यांनी लसुन चा वापर हा काही दिवस कमी करावा. 

जाणून घ्या : लाल काळी खाण्याचे फायदे

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एवढ्या लसुन पासून, तुम्हाला किती सारे फायदे होतात. ते सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

धन्यवाद !!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here