जांभूळ पावडर चे फायदे

0
2069
जांभूळ पावडर चे फायदे
जांभूळ पावडर चे फायदे

नमस्कार, मित्रांनो आज आपण बघणार आहोत जांभूळ पावडर चे फायदे ,जांभूळ म्हटले, की लगेच तोंडाला पाणी येते. उन्हाळ्याची चाहूल लागताच कोकणामध्ये तर जांभूळच-जांभूळ दिसतात. जांभुळचा रंग त्याच्या नावातच आहे. जांभुळचा रंग हा जांभळ-गुलाबीसर असतो. त्याचा आकार  द्राक्षाच्या आकारासारखाच असतो. चवीला तुरट-गोड अशाप्रकारे त्याची चव असते. तसेच जांभूळ हे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असते. त्या त्यामधील गुणधर्मांमुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. जांभूळचे झाड, त्याची साल, त्याची पाने, बिया, त्याचे फळ तसेच हे सगळे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.

जांभूळ, मध्ये विटामिन अ, विटामिन क, जीवनसत्त्वे तसेच आयर्न, ऐंटि ऑक्सिडेंट, ऑक्सलिक ॲसिड यासारखे गुणधर्म असतात. जांभूळ पासून आपण सरबत, सिरप, जेली यासारखे पदार्थ बनवू शकतो. तसेच जांभूळ च्या पानापासून व बियांपासून आपल्या शरीरासाठी आयुर्वेदिक गुणधर्म त्यात असतात. बऱ्याच काळापासून म्हणजेच पूर्वीच्या काळापासून जांभळाच्या बियांचा वापर आपल्या शरीरासाठी आयुर्वेदिक औषधांवर केला जात आहे. आयुर्वेदात त्याची पावडर बनवून, त्याचा उपयोग आपल्या शारीरिक समस्येवर केला जातो. आज आपण याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की जांभूळ बिया व त्यांची पावडर आपल्या शरीरासाठी कोणकोणत्या प्रकारे फायदे करू शकते? चला तर मग जाणून घेऊयात. 

जांभूळ पावडर पासून आपल्या शरीराला होणारे फायदे नेमके कोणकोणते?

मित्रांनो बऱ्याच लोकांना जांभूळ पासून आपल्या शरीराला होणारे फायदे माहिती नसतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत, की जांभूळ पावडर पासून आपल्या शरीराला होणारे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात! 

वाचा  संत्री खाण्याचे फायदे व तोटे

जांभूळ पावडर म्हणजे नेमके काय?

मित्रांनो आयुर्वेदामध्ये कोणकोणत्या प्रकारे औषधी निर्माण केल्या जातात, हे आपल्याला ठाऊक नसते. तसेच आज आपण जांभूळ पावडर विषयी जाणून घेणार आहोत, जांभूळ पावडर म्हणजे जांभूळ मधील ज्या बिया असतात, त्यांना सुकवून, वाळवून त्याची पावडर तयार केली जाते, आणि ती पावडर बंद डब्यात किंवा बॉटल मध्ये ठेवली जाते.

 तुमच्या शरीरातील ज्या व्याधी असतील, त्या व्याधींवर तिचे औषधात रूपांतर करतात, त्यानंतर ते इतर औषधी मध्ये मिक्स करून, त्याचा वापर केला जातो. या पावडरने आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे होतात. ही पावडर तुम्हाला आयुर्वेदिक भांडार मध्ये मिळेल. तसेच तुम्हाला मेडिकल स्टोअर्स मध्ये सुद्धा मिळू शकते, पण वापर करण्यापूर्वी, तुम्ही डॉक्टरांना विचारू शकतात. 

मधुमेहावर फार गुणकारी असते

ज्या लोकांची शुगर लेव्हल सारखी वाढत राहते, त्यांच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते, त्या वेळी त्यांना मधुमेह यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी जर त्यांनी त्यांच्या आहारात जांभूळ फळ व जांभूळ पावडर चा वापर केला, तर त्यांना त्यावर आराम मिळतो. कारण जांभूळ पावडर मध्ये अँटी डायबेटीक तसेच अल्कोलीड्स केमिकल्स, या गुणधर्मामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील ग्लुकोजचे म्हणजेच, साखरेचे प्रमाण कमी होते व तुम्हाला डायबिटीस वर त्वरित आराम मिळण्यास मदत मिळते. त्यासाठी त्यांनी नियमित जांभूळ पावडर घ्यायला हवे. तसेच त्यांच्या आहारात जांभूळ फळाचा समावेश करायला हवा. 

पोटाच्या समस्येवर फायदेशीर ठरतात

जांभूळ पावडर चा वापर केल्याने तुमच्या पोटाशी निगडित कोणतीही समस्या असेल, तर त्या वेळी त्यावर हे फायदेशीर ठरते. कारण जांभूळ बियांमधील गुणधर्म हे तुमच्या पोटासाठी फायदेशीर असतात. नेहमी जांभूळ खाल्ल्याने, तसेच पावडर खाल्ल्याने ज्या लोकांना सारखे सारखे पित्त होतात, तसेच अपचन होते, पचनाची निगडित समस्या होतात, तसेच शरीरात हिट असेल, तसेच ज्यांना अल्सर असेल, तसेच पोटात आग होत असेल, तर ती जाण्यास मदत मिळते. कारण जांभूळ हे थंड फळ आहे, आणि ते शरीरातील उष्णता काढण्यासाठी उपयोगी ठरते. त्यासाठी त्यांनी जांभूळ पावडर ही सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा पाण्याबरोबर घ्यावी. 

वाचा  पडवळचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते

प्रदूषणामुळे त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर पडतो. तसेच ज्यांची तेलकट त्वचा असते, त्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग, मुरुमांचे डाग पडलेले असतात, अश्यावेळी जर त्यांनी

  • जांभूळ पावडर त्यामध्ये मध, चिमुटभर हळद व दूध यांची पेस्ट करून, तुमच्या त्वचेवर डाग असलेल्या ठिकाणी तसेच त्वचेला लावल्यास, तुमची  त्वचेतील  तेलकटपणा निघेलच, शिवाय तुमच्या चेहऱ्यावरील डाग ही जाण्यास मदत मिळते.
  • तसेच त्वचेवर जखम असेल, पायांवर जखम असेल, त्यावेळी त्या जागेवर जांभूळ पावडर तेलामध्ये मिक्स करून, तुमच्या जखमेवर लावायचे. ती जखम लवकर सावरण्यास मदत मिळते.

जांभूळ पावडर तसेच ज्यूस फायदेशीर असते

हो, तुमच्या शरीरासाठी जांभूळ पावडर तसेच ज्यूस फायदेशीर राहतो. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल, थकवा जाणवत असेल,  शरीरात रक्ताची कमतरता जाणवत असेल, तर तुम्ही नियमित जांभूळ बियांची पावडर पाण्यामध्ये अर्धा चमचा टाकून, नियमित पिल्यास तुमच्या चेहऱ्यावर त्याने चमक येते. तसेच तुम्हाला अशक्तपणा थकवा जाणवत असेल, तर तेही जाण्यास मदत मिळते. तसेच तुम्ही जर नियमित जांभूळ खाल्ले, तर तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असते. त्यामध्ये लोहाचे प्रमाण असल्यामुळे, शरीरात रक्ताची कमतरता ही जाणवत नाही, तसेच लहान मुलांना त्यांच्या आहारात जर तुम्ही जांभूळ ची जेली, सिरप दिले, तर त्यांची भूक वाढते व ते जेवायला लागतात. 

जुलाब ची समस्या असल्यास फायद्याचे ठरते

जर तुम्हाला पोटात इन्फेक्शन झाले, तर सारखे सारखे जुलाब होत असतील, पोटात कळ मारून येत असेल, डायरिया सारखे वाटत असेल, अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आहारात जांभूळ पावडरचा उपयोग केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला तीन किंवा चार च्या वर जुलाब झाले, तर तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा येण्याची संभावना असते. अशावेळी तुम्ही

  • जांभूळ पावडर अर्धा चमचा पाण्यामध्ये, मिक्स करून ते प्यावेत. त्याने जुलाब थांबण्यास मदत मिळते.

तुमचे हिमोग्लोबिन वाढते

जांभूळ फळांमध्ये लोह, आयर्न, झिंक, पोटॅशियम यासारखे गुणधर्म असतात. त्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल, अशा वेळी तुम्ही जांभूळ फळ तसेच जांभूळ बियांच्या पावडर चा वापर करावा. त्याने तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. तसेच तुमचे हिमोग्लोबिन वाढते. शिवाय तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते व तुम्ही सुदृढ होतात. 

वाचा  कमरेचा घेर कमी करण्यासाठी उपाय

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते

जांभूळ पावडर मध्ये विटामिन अ, क, खनिजे, जीवनसत्वे, पोटॅशियम, झिंक, ऐंटि ऑक्सिडेंट यासारखे  गुणधर्म असतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळते. तसेच तुमच्या शरीरातील समस्येवर, तुम्हाला आराम मिळतो तसेच जांभूळ पावडर नियमित खाल्ल्याने तुमच्या पोटाच्या तक्रारी दूर होतात, तसेच यकृत संबंधित तक्रारी दूर होतात, हृदयाचे आरोग्य जपले जाते, तसे शरीरात रक्ताची कमतरता दुर होते, तुम्हाला त्वचा इन्फेक्शन असेल, तर ते जाण्यास मदत मिळते.  हे सारे गुणधर्म जांभूळ पावडर मध्ये असतात. 

जांभूळ पावडर ने तुमचे शरीर डिटॉक्स होते

जांभूळ पावडर चा तुमच्या शरीरासाठी उपयोग पूर्वीच्या काळापासून केला जात आहे. त्यासाठी पूर्वीचे लोक तसेच आता आयुर्वेदिक औषधांमध्ये जांभूळ पावडर, कार्ल्याचा ज्यूस तसेच कोरफड ज्यूस यासारखे पदार्थ मिक्स करून, त्यापासून औषधे बनवले जातात  आणि ते औषधे घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील घाण, तसेच वाईट कोलेस्ट्रॉल हे बाहेर निघण्यास मदत मिळतात. तसेच रक्तातील ग्लुकोज कमी होतात. त्यामुळे तुमचे आरोग्य हे सुदृढ व निरोगी होण्यास मदत मिळते. शिवाय वजन  वाढीच्या समस्येवरही आराम मिळतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात जांभूळ पावडर युक्‍त औषधे घ्यायला हव्यात. 

जांभूळ पावडर पासून काही, नुकसान तर होत नाही ना?

हा, प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो.  जांभूळ पावडर आपल्या शरीराला घातक तर नसते ना? तर मित्रांनो कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात घेतली, तर त्याचे दुष्परिणाम होत नाही. तसेच जांभूळ पावडर चे आहे. जर तुम्हाला शारीरिक त्रास आहे, तसेच तुम्हाला त्यावर जाभूंळ पावडरचा उपयोग करायचा आहे, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचा उपयोग करून घेऊ शकतात. तसेच जांभूळ पावडर मधले औषधी गुणधर्म शरीरासाठी फायदेशीरच असतात. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला तुमच्या शरीराला जांभूळ पावडर पासून होणारे फायदे व त्याचे गुणधर्म सांगितले आहेत. तसेच आम्ही  सांगिलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवावे. 

धन्यवाद.

काळे मिठाचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here