नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत काळे मिठाचे फायदे ,मीठ हा आपल्या जीवनातील उपयोगी पदार्थ आहे. जर आपल्या आहारात मीठ नसेल, तर आपल्याला खूप सार्या समस्या उद्भवतात. आपल्या आहारात आयोडीनयुक्त मिठाची गरज असतेच, तसेच तुम्हाला कोणत्याही पदार्थाला रूचकर बनवायचे असेल, तर मिठाशिवाय पर्याय नसतो. मीठ हे बेचव अन्नाला चव देण्याचे काम करते. मीठ हे समुद्रकिनारी निर्माण होते व त्याचे शुद्धीकरण करून, ते आपल्या पर्यंत येते. तसेच मिठाचे दोन प्रकार असतात, एक पांढरे मीठ व दुसरे काळे मीठ, काळे मीठ ला सेंदवमिठ असे म्हणतात. काळा मिठाचा रंग हा गुलाबीसर, जांभुळसर असतो. याला गुलाबीसर असण्यामागे कारण आहे, की हा ज्वालामुखी च्या दगडापासून बनवला जातो.
काळ्या मिठाची चवही आयोडीनयुक्त मिठा सारखीच असते, पण त्याचे गुण त्यापेक्षाही आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात. काळे मिठ चवीला खारट असते. काळ्या मिठामध्ये सल्फर डायॉक्साईडचे प्रमाण असते. तसेच काळ्या मिठामध्ये सोडियम, कॉपर, झिंक, मॅग्नेशियम, मिनरल्स, आयर्न यासारखे घटक मिळतात. तसेच काळ्या मिठाच्या वापराने, वात-पित्त, गॅसेस, सारख्या समस्याही कमी होतात. तर मित्रांनो आज आपण काळ मीठ खाल्ल्यामुळे, तुमच्या शरीराला अजून कोण कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? ते जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात!
काळ्या मिठापासून आपण आपल्या शरीराला कोण कोणत्या प्रकारचे फायदे करून घेऊ शकतो?
काळा मिठाचा वापर, आपल्या जीवनात तसेच आपल्या आहारात केला, तर आपल्याला त्यापासून खूप सारे फायदे होतात. तर मग ते नेमके कोणते? चला तर मग जाणून घेऊयात.
तुमची पचनक्रिया सुधारते
खूप जणांना अपचन, ऍसिडिटी, अजीर्ण, या सारख्या गोष्टी होतात. तसेच त्यांना सारखे ढेकर येतात. त्यामागील कारण की त्यांचा अन्नपचन सुरळीत होत नाही, अशा वेळी जर त्यांनी त्यांच्या आहारात काळ्या मिठाचा वापर केला, तर त्यांना यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो, तसेच तुमच्या पोटात दुखणे, पोटात गुबारा धरणे, गॅसेस, यासारख्या गोष्टींवर काळ मीठ हे फार फायदेशीर असते. काळ्या मीठाच्या वापराने, तुमची पचनक्रिया सुधारते. त्यासाठी तुम्हाला लिंबू आणि काळे मीठ यांचे एकत्र सेवन करायचे आहे. यासारख्या गोष्टींवर तुम्हाला आराम मिळेल.
मायग्रेनचा त्रास कमी होतो
खूप स्त्रियांना डिलिव्हरी नंतर मायग्रेनचा त्रास हा जाणवतो. तसेच काही जणांना डोकेदुखी इतकी तीव्र असते, की अक्षरशः त्यांना खूप त्रास होतो. मायग्रेनचा त्रास हा लवकर जात नाही, त्यामध्ये तीव्र डोकेदुखी होते. अशावेळी जर तुम्ही काळ्या मिठाचा वापर केला, तर तुम्हाला यासारख्या समस्येवर आराम मिळेल. त्यासाठी तुम्हाला सलग सात दिवस सकाळी पाच वाजता उठून, उपाशीपोटी सफरचंद कापून, त्यावर काळे मीठ लावून खायचे आहे. असे सलग तुम्ही सात दिवस केले तरच तुमचा मायग्रेनचा त्रास हा जातो. हा उपाय फार प्रभावशाली आहे, करून बघा.
रक्तदाबासाठी फायदेशीर ठरते
ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास असतो, अशा लोकांना डॉक्टर हे पांढरे मीठ कमी खायला सांगतात. अशावेळी जर तुम्ही तुमच्या आहारात काळे मीठ वापरले, तर त्याने तुम्हाला फरक पडेल. तसेच काळे मिठातील घटक हे तुमच्या शरीराला मिळतात, तसेच आपल्या शरीराला आयोडीनयुक्त मीठ घेणे आवश्यक असते. पण रक्तदाबासाठी ते धोकादायक असू शकते. त्यासाठी जर तुम्हाला काळ्या मिठाचा वापर करायचा असेल, तर ते चांगले आहेत. तसेच तो करण्यापूर्वी, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते
बदलत्या वातावरणामुळे, अवेळी खानपान मुळे, खूप जणांना वजन वाढण्याची समस्या होते. अशा वेळी ते वजन कमी करण्यासाठी, खूप सारे प्रयत्न करतात. त्यामध्ये काहींना फायदा होतो, तर काही जण निराश होतात. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आहारात काळे मीठ वापरले, तर तुम्हाला फायदा होईल. कारण काळे मिठातील पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. तसेच वजन जास्त असेल, तर ते घटवण्यासाठी मदत करतात. त्यासाठी जर तुम्ही सकाळी उठून कोमट पाण्यात, काळे मीठ दररोज पिलेत, तर तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय अतिरिक्त चरबी जाते.
तुमची त्वचा निखरते
बाहेरच्या बदलत्या प्रदूषणामुळे, तसेच थंड-गरम हवेमुळे, आपल्या त्वचेवर खूप प्रभाव होतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग, मुरूम, चट्टे, वांग डाग, यासारखे घटक बघायला मिळतात. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या चेहर्यासाठी काळ्या मिठाचा वापर केला, तर तुम्हाला खूप फायदे होतील. तसेच काही जणांची त्वचाही रुक्ष होऊन जाते, अशा वेळी काळ्या मिठाचा वापर केल्यावर, चेहऱ्यावर खूप बदल जाणवून येतात. काळे मीठ हे नॅचरली क्लिंजर आहे. त्यावेळी तुम्ही मीठ हे पाण्यात मिसळून, चेहर्यावर त्याने स्क्रब केले, तर ते तुमच्या चेहऱ्यावरील, व मधील घाण बाहेर निघते व त्वचा उजळण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर ग्लो येतो, तसेच त्वचेतील डेड स्कीन निघून जाते. तसेच मिठाच्या खड्यांनी चेहऱ्यावर मसाज केली, तर तुमच्या चेहऱ्यावर सर्कुलेशन पद्धतीने, रक्त प्रवाह सुरळीत होतो.
श्वसना संबंधित समस्येवर फायदेशीर ठरते
बरेच वेळा काहीना बाहेरच्या प्रदूषणाची ऍलर्जी असते, धुळीमुळे त्यांच्या नाकात धुळीचे कण गेल्यामुळे, त्यांना ढास लागणे, शिंका येणे, यासारख्या समस्या असतात. तसेच काही जणांच्या घशात इन्फेक्शन होते, घसा दुखतो, खवखवणे, तसेच बाहेरील जंतुसंसर्गामुळे घशामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे, आपल्याला खूप त्रास होतो. श्वास घेताना अडथळे येतात. अशावेळी जर तुम्ही काळ्या मिठाचा वापर केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरते. काळे मिठ हे तुम्ही कोमट पाण्यात टाकून, सकाळ संध्याकाळ दोन वेळा त्या पाण्याने गुळण्या केल्या, तर तुम्हाला बाहेरचे व्हायरल इन्फेक्शन जाण्यास मदत मिळतील. तसेच आपल्या शरीरला ते डिटॉक्स करते, काळे मिठाचे पाणी पिल्याने, तुम्हाला पोटातील समस्याही दूर होतात. तुमचे शरीर काळ्या मिठाच्या वापराने डीटॉक्स होते.
संधिवात तसेच वाताच्या समस्या वर फलदायी आहे
वाढत्या वयामध्ये खूप जणांना संधिवाताच्या समस्या होतात. तसेच वाताची समस्या असल्या, की त्यांच्या शरीराचे जॉइंट्स पार्ट खूप दुखतात. त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही, चालताना दुखते, गुडघेदुखीचा त्रास होतो, जर तुम्ही सैंधव मिठाचा वापर केला, तर तुम्हाला फरक पडेल. त्यासाठी तुम्हाला सैंधव मिठ तव्यावर गरम करून, सुती कापडाच्या कापडात घेऊन, त्याने तुमचे जॉइंट्स पार्ट वर शेक द्यायचे आहेत. त्याने तुम्हाला फरक पडेल. तसेच जर तुम्ही खोबरेल तेल व काळे मीठ घालून, गरम करुन ते कोमट-कोमट तुमच्या जॉइंट्स पार्ट्स वर मालिश केली, तरीही फरक पडेल. असे नियमित केल्यास, तुम्हाला यासारख्या समस्या वर आराम मिळेल.
तुमच्या घरातील वातावरण शुद्ध करते
सेंधव मीठ म्हणजे काळे मीठ यामध्ये एक प्रकारची शक्ती असते, जे बाहेरील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते. तसेच घरातील जंतुसंसर्ग असेल, ते शोषून घेण्याचे काम करते. सेंदवमिठ जर तुम्ही घरात एका वाटी मध्ये ठेवले, तर ते बाहेरील कण शोषून घेण्याचे काम करते. घरात उत्साही आणि फ्रेश वातावरण राहते.
चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला काळे मीठ व त्याचे फायदे सांगितले आहेत. तसेच काळ्या मिठापासून आपल्याला किती सारे फायदे होतात, हे आज आम्ही तुम्हाला सांगितले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.
धन्यवाद