शतावरी चे फायदे

0
680
शतावरी चे फायदे
शतावरी चे फायदे

नमस्कार मित्रांनो. बरेच जण हे आपल्या शरीराचे स्वास्थ चांगले राहावे यासाठी जास्तीत जास्त आयुर्वेदालाच मानत असतात. म्हणजेच शरीराचे आरोग्य चांगले राहावे. जर कुठल्याही प्रकारचा बिघाड झाला असेल तर काही जण हे आयुर्वेदिक उपचार घेत असतात. खरंतर आयुर्वेदिक उपचार घेताना त्याला वेळ लागतो परंतु ते फायदेशीर ठरत असते त्यामुळे जी समस्या असेल ती काहीवेळा मुळापासून जाण्यास मदत होत असते. शिवाय ती केमिकल राहील देखील असतात. त्यातीलच एक आयुर्वेदिक वनस्पती शतावरी चे खूप फायदे आहेत.

जर आपण इतर औषधे वगैरे घेऊन उपचार करत असाल तर याने समस्याही तात्काळ बरी होते परंतु, पुन्हा पुन्हा येत असते शिवाय ते केमिकल सिद्ध केले असतात. त्यामुळे, आपल्या शरीराला त्याचे नुकसान होऊ शकते. आयुर्वेदाच्या दृष्टीने जर आपण आयुर्वेदिक उपचार घेत असतो तर, त्यामुळे नक्की आपल्या शरीराला फायदा होऊ शकतो. आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक औषधी वनस्पती आढळून येतात. प्रत्येक वनस्पतींचे वेगवेगळे गुणधर्म असतात वेगळे वैशिष्ट्य असतात आणि वेगळे उपाय देखील आपल्याला होत असतात. हो मित्रांनो शतावरी ही खूपच आयुर्वेदिक वनस्पती मानली जाते. शतावरी चे एक ना अनेक फायदे आपल्याला होत असतात. शतावरीच्या झाडाच्या पानांचा, मुळांचा एक प्रकारे संपूर्ण झाडाचा आयुर्वेदिक दृष्टीने आपल्यासाठी फायदेशीर उपयोग होत असतो.

बऱ्याच लोकांना शरीराविषयी काही ना काही समस्या येत असतात. तर त्यासाठी आपण शतावरी वापरू शकतो. शतावरी चा उपयोग हा स्त्रियांच्या दृष्टीने फारच लाभदायक ठरत असतो. म्हणजेच स्त्रियांना अनेक प्रकारच्या काही ना काही समस्या येत असतात तर त्यासाठी शतावरीचा उपयोग होत असतो. शतावरी मध्ये अँटी ऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे आपल्या शरीरासाठी ती लाभदायक ठरू शकते. तर मित्रांनो आज आपण शतावरी चे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, शतावरी नेमकी काय असते? शतावरी चे कोणकोणते फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात ? तसेच, शतावरी चा वापर आपण कसा करायला हवा? या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

शतावरी चे कोणकोणते फायदे आपल्याला होऊ शकतात ?

मित्रांनो, शतावरी ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. शतावरी च्या झाडाच्या पानांचा झाडाच्या मुळांचा एक प्रकारे संपूर्ण झाडाचा आयुर्वेदिक या दृष्टीने खूप उपयोग होत असतो. आणि आपल्या शरीरासाठी ते लाभदायक देखील ठरत असते. तसेच शतावरीचे आपल्या शरीरासाठी कुठल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात हे या बद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  लहान मुलांचे वजन कसे कमी करावे

आपल्या केसांसाठी शतावरी चे फायदे :

मित्रांनो बऱ्याच लोकांना केसांबद्दल समस्या येत असतात. केसांची गळती होणे, अकाली केस पांढरे होणे, केसांची वाढ न होणे अशा एक ना अनेक केसांबद्दल समस्या निर्माण होत असतात. जर तुम्हाला देखील केसांच्या संदर्भात समस्या येत असतील तर तुम्ही शतावरी चा उपयोग करणे तुम्हाला लाभदायक ठरू शकते. तुमचे केस स्वच्छ, लांब,घनदाट व्हावेत असे वाटत असेल, तर तुम्ही शतावरीची पावडर यापासून फेसपॅक बनवून तुमच्या केसांना लावू शकतात. तसेच शतावरी पावडर हे तुम्ही पोटातून देखील घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला आणि प्रकारचे फायदे होऊ शकतात. तुमचे केसांबद्दल समस्या येऊ नये यासाठी तुम्ही एक ग्लास दुधामध्ये अश्वगंधा पावडर एक चमचा व शतावरी पावडर एक चमचा मिक्स करून दूध कोमट करून घ्यावे. आणि त्या दुधाचे सेवन करायला हवे. हा उपाय तुम्ही केल्यामुळे तुमचे केस घनदाट लांब सडक होण्यास मदत होऊ शकेल.

शतावरी पावडर मुळे दूध वाढण्यास मदत होते :

डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाच्या आईला बाळाला लगेच स्तनपान करावे लागत असते. तर काही महिलांना स्तनांना दूध न येण्याची समस्या येत असते. तर काही महिलांना फार कमी प्रमाणात स्तनातून दूध येत असते. जर बाळाला पुरेसे दूध मिळाले नाही तर बाळाचे पोट भरत नाही. परिणामी बाळाच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असतो. बाळाला पुरेसे दूध मिळावे यासाठी तुम्ही शतावरी पावडरचा वापर करू शकतात. बाळाला पुरेसे दूध मिळावे यासाठी तुम्ही सकाळी एक ग्लास गरम दूध त्यामध्ये दोन चमचे शतावरी पावडर टाकून मिक्स करून घ्यावी. आणि त्या दुधाचे सेवन करावे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी देखील एक ग्लास गरम दूध यांमध्ये दोन चमचे शतावरी पावडर मिक्स करून घ्यावी. आणि ते दूध प्यावे. असे केल्यामुळे बाळाला पुरेसे दूध मिळण्यास मदत होईल. शिवाय बाळाची वाढ आणि विकास देखील चांगल्या रीतीने होऊ लागेल.

त्वचेसाठी शतावरी चे फायदे :

बऱ्याच जणांना चेहऱ्यावर पिंपल्स व मुरूम येण्याची समस्या येत असते. तर अशावेळी तुम्ही शतावरी पावडर चा उपाय करू शकतात. त्यासाठी कमी चेहऱ्यावर शतावरी पावडर चे लेप तयार करून तुमच्या चेहऱ्यावर तो लावून घ्यावा. हा उपाय तुम्ही नियमित केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील येणारे मुरूम व पिंपल्स या समस्या पासून तुम्ही दूर राहू शकाल. शिवाय पिंपल्स चेहऱ्यावर डाग पडलेले असतात ते देखील जाण्यास मदत होऊ शकते. तुमच्या चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल. तुमचा चेहरा हात स्वच्छ देखील होण्यास मदत होऊ शकेल. त्याचप्रमाणे जर तुमचे हे काय पडलेले असतील तर यासाठी देखील तुम्ही शतावरी पावडर चा उपयोग करू शकतात. तसेच शतावरी पावडर चा लेप लावल्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील सुरकुत्या देखील नाहीशा होऊ लागतात व सुरकुत्या लवकर देखील पडल नाही.

वाचा  पापण्यावर असलेले केस गळणे कारणे व घरगुती उपाय

डोकेदुखी जाण्यासाठी शतावरी चे फायदे :

मित्रांनो, हल्लीची धावपळीचे जग आहे. त्यामुळे कामाचे प्रेशर आपल्यावर असते. यामुळे बऱ्याच लोकांची दगदग देखील होत असते आणि डोकेदुखीचा त्रास देखील होऊ लागतो. ज्या लोकांना डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर अशा लोकांनी शतावरी पावडरचा उपयोग करायला हवा. डोकेदुखी साठी तुम्ही शतावरी पावडर मध्ये तिळाचे तेल मिक्स करून त्याचा लेप तुमच्या माथ्यावर लावू शकतात असे केल्यामुळे तुम्हाला आराम मिळेल व तुमची डोकेदुखी जाण्यास देखील मदत होऊ शकते.

सर्दी खोकला झाल्यास शतावरी चे फायदे :

अनेक वेळा वातावरण बदल मुळे किंवा एक प्रकारे संसर्ग यामुळेदेखील आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो. सर्दी ही वायरल इन्फेक्शन आहे जर एका व्यक्तीला सर्दी झालेले असेल तर त्यामुळे दुसर्‍या व्यक्तीला लगेच सर्दी होत असते. सर्दी सोबत खोकला देखील लागण्याची शक्यता असते. शिवाय त्यामुळे घसा बसण्याची समस्या देखील येत असते. तर या सर्वांवर रामबाण उपाय म्हणून आपण हुशार द्वारे पावडरचा करू शकतो. शतावरीचा काढा करून तुम्ही तो प्यायला हवा जेणेकरून तुम्हाला आराम मिळेल. छातीमध्ये कप जमत असतो तर शतावरी पावडर मुळे नाहीसा होऊ शकतो. शिवाय तुमचे सर्दी खोकला व घसा बसणे यावर शतावरीचा काढा घेतल्यामुळे लाभदायक ठरू शकतो.

झोप न येणे या समस्येसाठी शतावरी चे फायदे :

मित्रांनो बऱ्याच लोकांना झोप न येण्याची समस्या येत असते. बरेच लोक हि झोपण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्यांना झोप लागत नसते. यालाच आपण निद्रानाश असे देखील म्हणू शकतो. ज्या लोकांना झोप न येण्याची समस्या येत असेल तर अशा लोकांनी शतावरीचा उपयोग करायला हवा. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये एक चमचा शतावरी पावडर टाकून मिक्स करून घ्यावे व त्या दुधाचे सेवन करायला हवे असे तुम्ही केल्यामुळे तुम्हाला शांत झोप येण्यास मदत होत असते. शिवाय झोप न येण्याची समस्या देखील नाहीशी होऊ लागते.

वाचा  उन्हाळ्यात आहार कसा असावा.

शरीराची ताकद वाढवण्यासाठी शतावरी चे फायदे :

बरेच लोक हे शरीराने कमजोर असतात. म्हणजेच कुठल्याही प्रकारचे काम करायला गेले तरी लवकर त्यांना थकवा येत असतो. थकवा आल्यामुळे त्यांना एकदम कमजोर झाल्यासारखे वाटत असते. ज्या लोकांना शारीरिक कमजोरी वाटत असेल तर अशा लोकांनी देखील शतावरी पावडर चा उपयोग करायला हवा. शरीराची कमजोर ता जावे यासाठी तुम्ही शतावरी घेऊन ती गायीच्या तुपामध्ये मिक्स करून गरम करून घ्यावी. आणि त्यानंतर शरीराची त्याने मसाज करायला हवे. यामुळे तुमचे शरीराचे कमजोर होण्यापासून बचाव होते. शिवाय तुमच्या शरीराची ताकद देखील वाढू लागते. तसेच तुम्ही शतावरी ही दुधातून देखील घ्यायला हवी. जेणेकरून, तुम्हाला ताकद वाढण्यास मदत होऊ शकेल.

शतावरी घेताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी ?

मित्रांनो, शतावरी चे आपल्याला एक ना अनेक प्रकारचे फायदे होत असतात. शतावरी घेतल्यामुळे आपले वजन नियंत्रित राहू शकते शिवाय आपण या आपल्या त्वचेसाठी देखील शतावरी चा उपयोग होऊ शकतो. शतावरीची तर आपल्या केसांसाठी खूपच चांगल्या प्रकारचे फायदे होत असतात.तसेच बाळंतीन महिलांना तर शतावरी चे खूपच फायदे होत असतात. प्रथम मित्रांनो शतावरी घेताना देखील आपण काही प्रकारचे काळजी घ्यावयाची असते.

  • ज्या लोकांना सतत कसली ना कसली एलर्जी होत असते तर अशा लोकांनी शतावरी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
  • ज्या लोकांना कांदा व लसूण यांची ऍलर्जी देखील असते त्या लोकांनी देखील शतावरी घेणे शक्यतो टाळावे.
  • शतावरी ही चेहऱ्यावर लावताना ती डायरेक्ट लावू नये. यामुळे, देखील ऍलर्जी होऊ शकते. तर त्यामध्ये काय मिक्स करायला हवे काय नाही याविषयी आपल्याला माहिती असायला हवी.
  • गर्भवती स्त्रियांना देखील शतावरी चे अनेक फायदे होत असतात. परंतु गर्भावस्थेत दरम्यान शतावरी घ्यावे किंवा नाही याबद्दल डॉक्टरांना विचारायला हवे.
  • अनेक लोकांना शरीरा विषयक कुठल्या ना कुठल्या तरी आजरा संदर्भात त्रास होत असतो अशा लोकांनी देखील शतावरी घेणे शक्यतो टाळा हवे.
  • ज्या लोकांना किडनी संदर्भात त्रास होत असेल तर अशा लोकांनी देखील शतावरी घेणे शक्यतो टायला हवी.

मित्रांनो, शतावरी घेतल्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारच्या फायदे होऊ शकतात या विषयाबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतली आहे. परंतु जर आपल्या शरीराबद्दल काही तक्रारी असतील कुठल्या तरी आजार असतील तर शतावरी घेण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यायला हवा जेणेकरून, कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम आपल्या शरीराला होणार नाहीत.

मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here