उन्हाळ्यात त्वचा काळवंडते त्यासाठी घरगुती उपाय

0
508
उन्हाळ्यात त्वचा काळवंडते त्यासाठी घरगुती उपाय
उन्हाळ्यात त्वचा काळवंडते त्यासाठी घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो. आपल्या चेहऱ्याची त्वचा ही स्वच्छ, मऊ, मुलायम व चमकदार असावी, असे सर्वांनाच वाटत असते. म्हणून त्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करत असतात. वर्षातील प्रत्येक ऋतूनुसार परिणाम हा चेहऱ्यावर होताना दिसून येत असतो. म्हणजेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूनुसार आपल्या त्वचेवर देखील त्याचा परिणाम होत असतो. हिवाळ्यामध्ये आपल्या चेहऱ्याची त्वचा ही शुष्क, कोरडी पडत असते शिवाय, हिवाळ्यामध्ये त्वचेवर ओरखडे देखील लवकर पडत असतात. तसेच, उन्हाळा ऋतूनुसार देखील आपल्या त्वचेवर त्याचे परिणाम होताना दिसून येतात. उन्हाळ्यात त्वचा काळवंडते .

उन्हाळ्यामध्ये आपल्या चेहऱ्याच्या त्वचेचे संदर्भात अनेक समस्या उद्भवत असतात. जसे, की चेहरा लवकर काळवंडणे, चेहऱ्यावर तेलकटपणा येणे, चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाइट हेड्स लवकर येणे तसेच, आपला चेहरा हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये निस्तेज दिसू लागणे इत्यादी. अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. उन्हाळा असो अथवा कुठलाही ऋतू असो पण आपल्याला काम करण्यासाठी बाहेर पडावे लागते. त्यामुळे, त्याचे परिणाम हे आपल्या त्वचेवर दिसून येत असतात. म्हणून काही लोक तर बाजारातील महागडे प्रोडक्स आणून त्यांच्या चेहऱ्यावर उपयोग करत असतात. परंतु हे प्रोडक्स महागडी तर असतातच. शिवाय, ते अति केमिकल रहित असतात. त्यामुळे, त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान देखील आपल्या त्वचेवर होऊ शकते.

म्हणून जर आपल्या चेहऱ्याची त्वचा ही उन्हाळ्याच्या दिवसात काळवंडलेली असेल अथवा चेहऱ्यावर एखादी समस्या येत असेल, तर आपण काही घरगुती उपाय करून देखील आपल्या चेहऱ्यावर चमक करू शकतो. तर मित्रांनो, आज आपण उन्हाळा त्वचा काळवंडलेली असेल तर त्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग  उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा ही काळवंडली असेल, तर त्यासाठी आपण नेमके कोणते उपाय करू शकतो? या विषयावर आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात त्वचे संदर्भात घ्यावयाची काळजी :-

मित्रांनो, उन्हाळ्याचा आपल्या चेहऱ्यावर परिणाम होताना दिसून येत असतो. म्हणून उन्हाळ्यात आपण त्याच्या संदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात आपली त्वचा ही चांगली राहावी यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी पिले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरातले पाणी हे कमी होण्याचे प्रमाण वाढत असते. म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराचे डीहायड्रेशन लवकर होत असते. म्हणून खास करून उन्हाळ्यात आपण जास्तीत जास्त पाणी गरजेचे असते. त्याचप्रमाणे लिंबू सरबत, उसाचा रस, नारळ पाणी यांसारखी पेय देखील उन्हाळ्यात पिली पाहिजे.

जेणेकरून, आपल्या शरीराचे डीहायड्रेशन होण्यापासून बचाव होऊ शकतो. जरा कशाला मध्ये पाण्याची पातळी व्यवस्थित असेल तर त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर लवकर उन्हाळ्याचे दुष्परिणाम होत नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे गर्मीचे प्रमाण देखील वाढले असते. आणि घाम आल्यामुळे देखील आपली त्वचा हे सारखे सारखे काळवंडत असते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात खास करून आपण आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने चार ते पाच वेळा आवश्यक धुतला पाहिजे. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर असलेली घाण ही पाण्यामार्फत निघण्यास मदत होऊ शकते.

वाचा  किडनी खराब होण्याची कारणे व या समस्येवर घरगुती उपाय :-

उन्हाळ्याच्या दिवसात आपण आपला आहार देखील चांगल्या प्रकारचा घेतला पाहिजे. आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश देखील असायला हवा. शिवाय, उन्हाळ्याच्या दिवसात नियमित करायला हवे जेणेकरून, पाण्याची कमतरता शरीराला भासणार नाही. शिवाय, वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स, प्रोटिन्स, कॅल्शियम, पोषक घटक, पोषकतत्वे यांचा पुरवठा देखील शरीराला व्यवस्थित प्रकारे होऊ शकेल. जेणेकरून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होऊ शकते. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात जीवनात सोबत सलाड बनवून देखील खायला हवे. काकडी टोमॅटो, काकडी, कांदा, दही, मिश्रित सलाड बनवून खायला हवे. उन्हाळ्याच्या दिवसात आपण जेवढे स्वतःची काळजी घेऊन तेवढेच आपल्या त्वचेची काळजी देखील घेतली जाते.

उन्हाळ्याच्या दिवसात देखील कामानिमित्ताने बाहेर पडावे लागत असते. तत्पूर्वी म्हणजेच बाहेर जाण्यापूर्वी त्वचेला सनक्रीम लावून घ्यायला हवी. त्यामुळे सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेवर डायरेक्ट सूर्याची किरणे पडू नये. त्यासाठी, चेहऱ्याला व्यवस्थित प्रकारे रुमाल बांधून घ्यायला हवा. त्यामुळे आपल्या त्वचेचे प्रकारे संरक्षण होऊ शकते.

उन्हाळ्यात त्वचा काळवंडल्यस घरगुती उपाय :-

मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसात आपण आपल्या त्वचेची जितकी जास्तीत जास्त काळजी घेऊ तेवढे आपल्या त्वचेचे संरक्षण होऊ शकते. उन्हाच्या उष्ण वातावरणामुळे त्याचा परिणाम हा चेहऱ्यावर लवकर दिसून येत असतो. उन्हाळ्याच्या दिवसात आपली त्वचा ही लवकर काळवंडत असते. उन्हाळ्याच्या दिवसात तुमची त्वचा काळवंडते काय ? जर तुमची त्वचा देखील उन्हाळ्याच्या दिवसात काळवंडली असेल, तर तुम्ही खालील प्रकारे घरगुती उपाय करून बघू शकतात.

  1. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना तुम्ही शक्यता सनक्रीम लावूनच बाहेर पडावे. त्यामुळे आपल्या त्वचेचा बचाव होऊ शकतो शिवाय बाहेर जाताना तुम्ही सनकोट देखील खायला हवा.
  2. घरी आल्यावर शक्यतो तुम्ही चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायला हवा जेणेकरून बाहेरील धूळ तुमच्या चेहर्‍यावरून निघून जाण्यास मदत होऊ शकते.
  3. उन्हाळ्यात त्वचा काळवंडते त्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुदिना आईस क्यूब, काकडीचा तसेच टोमॅटोचा आईस क्यूब बनवून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावायला हवे.
  4. कोणाच्या दिवसात जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर आईस क्यूब लावत असेल तर त्यामुळे देखील अनेक प्रकारचे फायदे तुमच्या शहराला होऊ शकतात शिवाय त्वचेवरील काळवंडलेली त्वचा देखील निघून जाण्यास मदत होऊ शकते.
  5. उन्हाळ्यात त्वचा काळवंडते त्यासाठी असल्यास तुम्ही दूध+लिंबू+मध मिक्स करुन चेहऱ्याला कापसाच्या सहाय्याने लावून घ्यायला हवे आणि पाच ते दहा मिनिटानंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुऊन टाकावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळी स्किन निघण्यास मदत होऊ शकते एक प्रकारे क्लिंजर म्हणून देखील काम करत असते. शिवाय असे केल्यामुळे चेहर्‍यावरील मृतपेशी देखील निघून जाण्यास मदत होऊ शकते.
  6. दोन चमचे बेसन पीठ +अर्धा चमचा मध +एक चमचा दही +अर्धा चमचा लिंबाचा रस+ चिमुटभर हळद. हे सर्व मिश्रण एकत्रित करून एकजीव केल्यानंतर ती पेस्ट ब्रशच्या साह्याने तुमच्या चेहऱ्यावर लावून घ्यावी. पंधरा मिनिटं ती चेहऱ्यावर तशीच राहू द्यावी आणि चेहरा धुणे आधी सर्कुलर मोशन मध्ये मसाज करावे. आणि मग स्वच्छ थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. असे केल्यामुळे चेहऱ्यावरील काळी त्वचा लवकर निघण्यास मदत होऊ शकते आठवड्यातून तुम्ही हा उपाय तीन-चार वेळा करू शकतात. यामुळे तुमचे ब्लॅक हेड सांग वाईट हे देखील निघून जाण्यास मदत होते शिवाय तुमच्या शरीराला एक नैसर्गिक चमक येण्यास मदत होऊ शकते. शिवाय मसाज केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ब्लड सर्कुलेशन देखील व्यवस्थित प्रकारे होत असते. ज्यामुळे चेहऱ्याला चमक येऊ शकते.
  7. उन्हाळ्याच्या दिवसात बरेच जणांची त्वचा ही निस्तेज दिसू लागते त्यासाठी अर्धा टोमॅटो घेऊन त्यावर बारीक केलेली साखर टाकून घ्यावी आणि चेहऱ्यावर सर्कुलर मोशन मध्ये मसाज करावी. असे केल्यामुळे एक प्रकारे चेहऱ्याला स्क्रब केले जाते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित प्रकारे होते शिवाय चेहऱ्यावरील काळी त्वचा निघून जाण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येण्यास मदत होऊ शकते.
  8. उन्हाळाच्या दिवसात तुम्ही काकडीच्या रसाचा उपयोग चेहर्यासाठी करायला हवा. काकडीचे पेस्ट करून त्याचा रस काढून कापसाच्या सहाय्याने चेहऱ्यावर सर्वत्र लावून घ्यावे. पाच ते दहा मिनिटे तसेच राहू द्यावे आणि नंतर स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. यामुळे तुम्ही चेहऱ्यावरची काळी त्वचा निघून जाण्यात मदत होऊ शकते.
  9. काळवंडलेली त्वचा यासाठी तुम्ही कॉफीचा देखील उपयोग करू शकतात. एक चमचा कॉफी पावडर घेऊन त्यामध्ये बारीक केलेली साखर मिक्स करून घ्यावी. चेहरा स्वच्छ पाण्यात धुऊन कॉफी+ बारीक केलेली साखर चेहऱ्यावर सर्वत्र जाऊन त्याने स्क्रब करावे. असे केल्यामुळे देखील चेहऱ्यावरील काळी त्वचा निघून जाण्यास मदत होते शिवाय चेहऱ्यावरील मृतपेशी देखील निघण्यास मदत होते व चेहऱ्याचे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित प्रकारे होते त्यामुळे चेहऱ्याला चकाकी येण्यास मदत होऊ शकते.
  10. कोरफडीच्या रसाचा देखील तुम्ही चेहऱ्यासाठी उपयोग करायला हवा. उन्हाळ्याच्या दिवसात बराच रानात चेहरा काळवंडणे ही समस्या येत असते त्यामुळे तुम्ही फ्रेश कोरफडीचा रस काढून चेहऱ्याला सर्वत्र ठिकाणी व्यवस्थित लावून घ्यावे. आणि कोरफडीचा रस हा व्यवस्थित सुकल्यानंतर त्याने सर्कुलर मोशन मध्ये मसाज करून घ्यावे. आणि स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकावा. असे केल्यामुळे देखील चेहऱ्याला एक नैसर्गिक चकाकी येण्यास मदत होते शिवाय काळवंडलेली त्वचा निघून जाण्यास मदत होऊ शकते.
  11. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही अति प्रमाणात मेकअप करणे शक्यतो टाळायला हवे. कारण उन्हाळ्याच्या दिवसात अति प्रमाणात मेकअप केल्यामुळे चेहरा काळा पडू शकतो. शिवाय, अतिप्रमाणात मेकअप केल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची शक्यता असते. त्यामुळे, उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही अतिप्रमाणात मेकअप करणे टाळायला हवे.
  12. काळवंडलेली त्वचा निघावी यासाठी तुम्ही ग्रीन टी बॅग याचा देखील उपयोग करू शकता. ग्रीन टी बॅग तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फिरवायला हवी तसेच, डोळ्यांच्या खालील काळे वर्तुळ वर देखील फिरवून घ्यावे यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे त्वचा निघून जाण्यास मदत होऊ शकते.
  13. उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो तुम्ही गुलाबजल देखील चेहऱ्यावर लावायला हवे. चेहऱ्यावर गुलाब जल लावल्यामुळे अथवा गुलाब जल स्प्रे चेहऱ्यावर मारल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळवंडलेली त्वचा निघून जाण्यास मदत होते. शिवाय, तुमच्या चेहऱ्याला एक प्रकारे थंडावा देखील मिळत असतो. ज्यामुळे तुमचा चेहरा उजळण्यासाठी मदत होऊ शकते.
  14. चेहरा जर काळवंडलेला असेल, तर त्यासाठी तुम्ही बटाट्याचा देखील उपयोग करू शकतात. त्यासाठी बटाट्याची पेस्ट तयार करून त्याचा रस काढून घ्यावा व कापसाच्या साहाय्याने चेहरा व मानेवर सर्वत्र ठिकाणी व्यवस्थित बटाट्याचा रस लावून घ्यावा. त्यामुळे चेहऱ्यावरील काळे त्वचा निघून जाण्यास मदत होते. शिवाय, चेहऱ्याला एक प्रकारची चमक देखील येण्यास मदत होत असते.
वाचा  लहान मुलांना कोरडा खोकला घरगुती उपाय

तर मित्रांनो, तुमची पण उन्हाळ्यात त्वचा काळवंडते का? जर तुमची त्वचा ही काळी पडत असेल तर तुम्ही वरील प्रमाणे नक्कीच उपाय करून बघू शकतात. वरील उपाय केल्या मुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे त्वचा निघून जाण्यास मदत होऊ शकते. शिवाय, तुमची त्वचा काळवंडू नये यासाठी तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात खास करून काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here