कोणत्याही ऑपरेशन नंतर टाके पडल्यास काय काळजी घ्यावी

0
202
कोणत्याही ऑपरेशन नंतर टाके पडल्यास काय काळजी घ्यावी
कोणत्याही ऑपरेशन नंतर टाके पडल्यास काय काळजी घ्यावी

नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाने आपले आरोग्य जपले पाहिजे आपल्या आरोग्याच्या काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, काही वेळा जर एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झालेला असेल, गंभीर रोग झालेला असेल आणि त्या आजाराचे उपचार करून निदान होत नसेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीवर सर्जरी करावी लागत असते. म्हणजेच ऑपरेशन करूनच तो व्यक्ती हा बरा होणार असतो त्यासाठी त्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया करावी लागत असते जेणेकरून, त्याच्या आजाराचे निदान होऊ शकते. मित्रांनो काही आजार हे असे असतात की ते फक्त गोळ्या औषधे बरे होत नसतात तर त्यासाठी शस्त्रक्रिया करून ऑपरेशन करून तो बरा केला जात असतो जेणेकरून आपण रोगमुक्त होऊ शकतो. मित्रांनो शस्त्रक्रिया ही वेगवेगळ्या प्रकारे होत असते जर एखादी महिलेची प्रसूती नंतर तिला टाके पडत असतात. मग ती प्रस्तुती सिजेरियन पद्धतीने असली तर हमखास टाके पडत असतात. जर एखादा व्यक्तीला कानाबद्दल त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला शस्त्रक्रिया करावी लागत असते. म्हणजेच ज्या व्यक्तीला जो त्रास होत असेल तर त्या त्रासानुसार त्या व्यक्तीवर शस्त्रक्रियाही करावी लागत असते. ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला टाके पाडण्यात येत असतात. ऑपरेशन झाले म्हणजे सर्व काही झालं असेल तर ऑपरेशन नंतरही त्या व्यक्तीला पडलेल्या टाक्यांची खूप काळजी घ्यावी लागत असते. त्या व्यक्तीची टाकी कोरडे होण्यापर्यंत त्या व्यक्तीने त्याच्या टाक्याची काळजी घेतली पाहिजे.ऑपरेशन केल्यानंतर ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया केलेले असते ती जागा बधिर असते परंतु, त्या जागेवरील भूल गेल्यानंतर त्या व्यक्तीला खूप त्रास होत असतो. अशा वेळेस त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला मदत केली पाहिजे. मित्रांनो शस्त्रक्रिया केल्यानंतर टाके पडल्यास त्या ठिकाणी काय काळजी घ्यायची असते या बद्दल आपल्याला माहिती असायला हवी. मित्रांनो आज आपण कोणत्याही ऑपरेशन नंतर टाके पडल्यास काय काळजी घ्यावी या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग कोणत्याही ऑपरेशन नंतर टाके पडल्यास काय काळजी घ्यावी? या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

वाचा  नाभी मध्ये तेल टाकण्याचे फायदे

ऑपरेशन नंतर टाके पडल्यास काय काळजी घेतली पाहिजे?

अनेक वेळा एखाद्या आजाराचे निदान करण्यासाठी ऑपरेशन करण्याची वेळ असते. मित्रांनो, ऑपरेशन केल्यानंतर टाके पडतात. टाके पडल्यानंतर ते टाके हे कोरडे निघावेत, खराब होऊ नयेत, यासाठी खूप काळजी घ्यावी लागत असते. तर मित्रांनो, टाके पडल्यास आपण कुठल्या प्रकारची काळजी आपण घेऊ शकतो,  याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

 • ऑपरेशन झाल्यानंतर ज्या ठिकाणी ऑपरेशन केलेले आहे तर त्या ठिकाणी टाके दिले जात असतात. ऑपरेशन झाल्यानंतर ते काकांची आपण जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधी यांच्या वेळा न चुकवता आपण ते वेळेनुसार घेतल्या पाहिजेत.
 • टाकी जास्त दुखू नये यासाठी डॉक्टरांनी वेदनाशामक गोळ्या दिलेल्या असतात तर त्या गोळ्या तुम्ही टाईम घेतल्या पाहिजेत.
 • टाके हे बाहेरील बाजूस असतील आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांनी मलम लावण्यास दिलेला असेल तर तुम्ही मलम हा वेळोवेळी लावला पाहिजे जेणेकरून तुमचे टाके लवकर कोरडे होण्यास मदत होऊ शकते.
 • शस्त्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही पुरेपूर झोपही घेतले पाहिजे झोप घेतल्यामुळे तुम्हाला टाक्यांचा जास्त त्रास जाणवणार नाही.
 • गोळ्या व नियमित घेतल्यामुळे पुरेपूर विश्रांती घेतल्यामुळे आपल्या शरीराच्या वेदना या लवकर कमी होत असतात आणि टाके भरण्याची गतीही वाढत जाते जेणेकरून आपण लवकरात लवकर बरे होऊ शकतो.
 • ज्या ठिकाणी तुम्हाला टाके पडलेले असतील तर ते टाके पडलेले ठिकाण तुम्ही कोरडे ठेवावेत त्यावर कुठलाही पाण्याचा स्पर्श करू नये. जर टाकीची जागा ही नेहमी ओली होत राहिली तर टाके कालांतराने खराब होऊ शकतात आणि टाके खराब झालेत तर पुन्हा टाके टाकण्याची गरज पडते म्हणून आपण वेळीच काळजी घेतलेली बरी.
 • जर तुम्हाला नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तर टाके पडल्यावर तुम्ही लगेचच व्यायाम करू नये. काही दिवस शक्यतो तुम्ही व्यायाम करणे टाळावे टाके कोरडे झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम पुन्हा सुरू करू शकतात.
 • टाके दुखू नये टाक्यांना त्रास होऊ नये यासाठी तुम्ही जड वस्तू उचलणे शक्यतो टाळाले पाहिजे. जड वस्तू उचलल्यास टाक्यांना त्रास होऊ शकतो.
 • ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त झोप घेतली पाहिजे विश्रांती घेतली पाहिजे अगदी घाई गडबडीत कामे करणे शक्यता आले पाहिजे नाहीतर यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे.
 • टाके पडल्यानंतर जोरात धावणे, चालणे शक्यतो टाळले पाहिजे. जोवर टाके हे ओले असतील तोवर तुम्ही हळुवार गतीने काम केलेले बरे ठरेल.
 • टाके पडल्यानंतर जास्त त्रास होत असल्यास तुम्ही मानसिक टेन्शन घेणे शक्यतो टाळले पाहिजे. जर तुम्ही मानसिक टेन्शन जास्तीत जास्त घेत राहिला तर जखम लवकर बरी होत नाही. शिवाय, दुखणे ही वाढू लागते.
 • टाकी जर जास्तच दुखत असतील टाक्यातून रक्त येत असेल, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे. डॉक्टर वेळीच तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकतात व उपचार करू शकतात.
 • टाक्यांची जागा ही वारंवार हलवू नका हालचाल जास्तीत जास्त करू नका टाक्यांची जागा तुम्ही जेवढी स्थिर ठेवली तेवढी तुमची लवकर जखम भरण्यास मदत होईल.
 • कोणत्याही ऑपरेशन नंतर टाके पडल्यास काय काळजी घ्यावी (1)
  कोणत्याही ऑपरेशन नंतर टाके पडल्यास काय काळजी घ्यावी (1)

मित्रांनो, कुठलेही ऑपरेशन झाल्यानंतर टाके पडल्यास तुम्ही वरील प्रमाणे काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला झालेली जखम, पडलेले टाके हे लवकरात लवकर भरून निघावे, यासाठी तुम्ही डॉक्टरांनी दिलेल्या तंतोतंत सूचनांचे पालन केले पाहिजे. जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर बरे होऊ शकाल.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here