मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन चे उपाय

0
861
मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन चे उपाय
मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन चे उपाय

नमस्कार, मित्रांनो मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन होणे म्हणजे नेमके काय ? तर अंगावर लालसर पुरळ येणे, रॅशेश होणे, खाज येणे, जखम होणे, आग मारणे, यासारख्या गोष्टी होय. त्याला फंगल इन्फेक्शन असे म्हणतात. हे कशामुळे होते, तर हल्ली बदलत्या वातावरणामुळे, थंड गरम हवेमुळे, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. खास करून उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंमध्ये फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात. कारण उन्हाळ्यामध्ये घाम येतो, घामामुळे आपल्या रॅशेश शरीरावर येतात, आणि लालसर जागा होते. तर पावसाळ्यामध्ये ओले कपडे घालून त्याचे इन्फेक्शन आपल्या शरीरावर होते.

तसेच जास्त पाण्यामध्ये भिजल्यामुळे, ही त्याचा परिणाम आपल्या स्कीन वर होतो. त्यामुळे हे फंगल इन्फेक्शन सारख्या समस्या होतात. तसेच मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन हे जास्त वजनामुळे ही होते, वजन जास्त असेल, तर चालताना तुमच्या मांड्या लागतात. म्हणजेच एकमेकांना घर्षण होऊन लालसर रॅशेश येतात. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होते. तसेच तुम्ही सतत बैठे काम करून असाल, तर घाम येऊन तुम्हाला फंगल इन्फेक्शन सारख्या समस्या होतात. तर जाणून घेऊयात की, जर तुम्हाला मांडी मध्ये तसेच अंगावर कुठेही फंगल इन्फेक्शन झाले, तर त्यावर नेमके कोणकोणते उपाय तुम्ही करू शकतात? चला तर जाणून घेऊयात ! 

मांड्यांमध्ये फंगल इन्फेक्शन साठी काही घरगुती उपाय ? 

मित्रांनो, जर मांड्यांमध्ये तसेच अंगावर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झाले, तर त्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. 

वाचा  वजन कमी करण्यासाठी विविध व्यायामाचे प्रकार

कोरफड जेल वापरून बघा :

कोरफड ही ऑंटी बॅक्टरियल तसेच ऑंटीफंगल इन्फेक्शनल असते. तसेच ही प्रत्येकाच्या परिसरात असते. त्यामुळे तुम्हाला कुठे दूर जायचे नाही, कोरफड घेऊन तिचा गर काढून, तुम्हाला ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झाले आहे, त्या जागेवर वीस ते पंचवीस मिनिटे लावून ठेवावे. त्यामुळे त्याची दाह कमी होते. शिवाय फंगल इन्फेक्शन अजून पसरत नाही, तसेच तेथे जाण्यास लवकर मदत मिळते. 

कडुलिंबाची पेस्ट लावा :

कडूलिंब ऑंटीबॅक्टरियल, ऑंटीव्हायरल इन्फेक्शन वर मात करणारी आहे. कडुलिंबाची पाने ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जर तुमच्या शरीरावर कुठेही फंगल इन्फेक्शन होत असतील, तसेच लाल रॅशेश असतील, तर तुम्ही कडू लिंबाचे पाने तुमच्या रोजच्या वापरात घ्यावी, त्यासाठी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने उकळून, त्या पाण्याने अंघोळ करायची आहेत. त्यामुळे फंगल इन्फेक्शन वर आराम मिळतो. तसेच तुम्ही कडूलिंबाची पंधरा ते वीस पाने घेऊन, त्याची पेस्ट करून त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून, तुम्हाला ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन सारखे होते, किंवा घामाचे इन्फेक्शन होते, अशा ठिकाणी लावून ठेवावेत, त्यामुळे जाण्यास मदत मिळते. 

चंदन पावडर लावा :

चंदन पावडर ही थंड असते. उष्णता शोषून घेण्याचे काम करते. त्यासाठी जर तुम्हाला अंगावर, हातावर, पायावर किंवा मांड्यांमध्ये इन्फेक्शन  तसेच लाल रॅशेश येऊन, खाज येण्याच्या समस्या असतील, अशा वेळी तुम्ही त्या जागेवर चंदन पावडरचा लेप लावावे. पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही त्याला थंड पाण्याने धुवावे, असे केल्यास त्याची दाह कमी होते. शिवाय आग होणे, जळजळ होणे, खाज येणे, यासारख्या समस्या कमी होतात. 

वजन नियंत्रणात आणा :

जर वजन तुमची अति असेल, अशा वेळी तुमच्या मांड्या लगण्याच्या समस्या तयार होतात. अशा वेळी तुम्ही वजन वाढल्यामुळे तसेच मांड्यांचा घेर वाढतो, त्यांमुळे सारख्या मांड्या लागण्याची समस्या होतात. अशावेळी तुम्ही बाहेर जाताना शॉर्ट्स मिळतात, त्या घालाव्यात म्हणजे  मांड्यांचे घर्षण एकमेकांना होत नाही, व मांड्या लागण्याच्या समस्या होत नाही. तसेच जर तुम्ही नियमित चालायला गेले, किंवा बटरफ्लाय पोझिशन चे व्यायाम केले, तर मांड्या लागण्याची समस्या कमी होतात. 

वाचा  कुरळे केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय

खोबरेल तेलाचा वापर करा :

खोबरेल तेल अगदी पूर्वीच्या काळापासून, फंगल इन्फेक्शन तसेच शारीरिक समस्यांवर वापरले जाते. जर तुमच्या अंगावर लाल पुरळ तसेच त्वचेची जळजळ होणे, खाज येणे, यासारख्या समस्या असतील, तर तुम्ही तुमच्या इन्फेक्शन वर खोबरेल तेल लावायला हवेत. त्यामुळे त्याची दाह कमी होते, तसेच त्यांच्यावर आराम मिळतो. शिवाय नियमित तेल लावल्यामुळे त्याचा पसरण्याचा धोका टळतो व ते लवकरच जाण्यास मदत मिळते. 

तुळशीच्या पानांचा रस लावून बघा :

तुळशी हे घरगुती आयुर्वेदिक उपचारांमध्ये, वापरली जाणारी वनस्पती आहे. जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन सारख्या समस्या होत असतील, अशा वेळी जर तुम्ही तुळशी च्या पानांची पेस्ट तुमच्या जखमेवर लावली, तर त्याची दाह कमी होते. शिवाय त्याची पसरण्याची भीती ही कमी होते. शिवाय खाज येत असेल, यासारख्या समस्या वर तुम्हाला आराम मिळतो. तसेच ते लवकर जाण्यास मदत मिळते. 

उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या, शरीराची स्वच्छता राखावी :

उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास हा सगळ्यांनाच होतो. स्वाभाविकच आहे, कारण दमट हवेच्या झळा  सगळ्यांना पोहोचतात. तसेच काही जणांना घाम येण्याची समस्या फार असते. अशावेळी त्यांनी त्यांच्या शरीराची स्वच्छता राखायला हवीत. उन्हाळ्यामध्ये दिवसातून दोन वेळेस आंघोळ करायला हवी. तसेच आंघोळ झाल्यावर अंगावर स्वच्छ पुसुन घ्यावे. नंतर अंगावर पावडर लावायला हवेत. तसेच, सतत घाम येत असल्यास तो पुसून घ्यावा. त्यामुळे मांड्यांवर, अंगावर कुठेही त्याचे लाल रॅशेश होत नाही. तसेच उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी प्यावेत. त्यामुळे शरीरात सारखा-सारखा घाम जाऊन, अशक्तपणा येत नाही. 

ओले कपडे वापरणे टाळा :

अंगावरले कपडे राहिले, की त्याचा इन्फेक्शन आपल्याला खूप लवकर होते. कारण त्यामुळे आपल्या त्वचेवर लालसरपणा येणे, खाज येणे, यासारख्या समस्या होतात. तसेच पावसाळ्यामध्ये तुम्ही भिजल्यावर ते कपडे लगेच बदलायला हवेत. आपले अंग नेहमी कोरडे ठेवावेत. त्यामुळे तुम्हाला यासारख्या समस्या होत नाही. 

वाचा  जेवण झाल्यावर पोटात दुखणे कारणे व उपाय

विटामिन युक्त आहार घ्या :

मित्रांनो, आपल्या शरीराला विटामिन्स युक्त आहार असायला हवा. तो म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळे, प्रोटीन युक्त पदार्थ, कारण त्यामध्ये आवश्यक ते घटक आपल्या शरीराला मिळतात. त्यामुळे आपल्याला बाहेरची इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, तसेच फंगल इन्फेक्शन यासारख्या समस्यांपासून आराम मिळते. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन कोणत्या कारणामुळे होते, तसेच त्यावर काही घरगुती उपाययोजना सांगितलेल्या आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या उपायांमध्ये, तुम्हाला जर कसली ऍलर्जी असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला विचारूनच करावेत. तसेच आम्ही सांगितलेल्या उपायांमध्ये तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगावेत. 

 

 धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here