गळू पिकण्यासाठी उपाय

0
1991
गळू पिकण्यासाठी उपाय
गळू पिकण्यासाठी उपाय

नमस्कार, मित्रांनो आज आपण गळू पिकण्यासाठी चे उपाय बघणार आहोत. आपले शरीर इतके नाजूक असते, की त्याला थोडीशी जखम किंवा इन्फेक्शन झाले की लगेच त्याचा त्रास आपल्याला होतो. आपण आपल्या शरीराची स्वच्छता राहायला हवी. तसेच हल्ली वाढत्या तापमानामुळे आपल्याला घामोळ्या, पुटकुळ्या, यासारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्याचे इन्फेक्शन आपल्याला लवकर होते. तसेच काहीजणांना अवघड जागेवर गळू होतो. गळू झाल्याने त्याचा त्रास ही तसाच असतो, तो सुजतो, पिकतो, ठणकतो एवढी प्रोसिजर त्याची असते. मग तो पूर्ण जाईपर्यंत आपल्याला त्याचा त्रास सोसावा लागतो.

पूर्वीच्याकाळी गळू झाल्यावर घरगुती उपचार करून त्याचे निरसन करायचे, गळू एक प्रकारचा केसतोडा यासारखे प्रकार आहे. अगोदर ती छोटी फुटकळी येते, त्यानंतर तिचे रूपांतर मोठ्या फुटकळी मध्ये होते, व ती फुटते, आणि नाही फुटली तर ती ठनकते, आणि त्याचा त्रास आपल्याला होतो. तर आज आपण याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की जर तुम्हाला गळू झाला असेल, त्याला तुम्हाला लवकर निरसन करायचे आहे, त्यासाठी काही घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात की गळू पिकण्यासाठी काही घरगुती उपाय ? 

गळू म्हणजे काय ? व तो कसा दिसतो ? 

मित्रांनो, गळू म्हणजे एक प्रकारचा केसतोडा ही म्हटले जाईल, किंवा मोठी फुटकळी. ज्यावेळी तुम्हाला गळू होतो. त्यावेळी त्याच्या वेदना फार असह्य होतात आणि ते दुखणे फार कठीण असते. जो पर्यंत ते पिकून फुटत नाही, त्याचा त्रास आपल्याला होतो. गळू हा तुमच्या शरीरातील बॅक्टेरिअल इन्फेक्शन होय. गळू हा साधारण फुटकळी पेक्षा मोठा असतो. सहसा करून गळू होण्यामागील कारण म्हणजे तुमची शरीरातील रोगप्रतिकारशक्ती ची कमतरता होय.

वाचा  डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे

ज्यावेळी गळू तयार होतो, त्यावेळी त्या जागेवर लालसरपणा येतो, गब ची जागा ही थोडी गरम असते. त्यानंतर तो सुजतो, नंतर त्याच्यात पिवळसर पांढरा पू तयार होतो. त्यानंतर तो जर फुटला नाही, तर ठणकतो व त्याची आग होते, आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाला खाज येते. त्यामुळे आपल्याला कुणकुण होते, तर काही जणांना त्याचा तापही येतो. अशावेळी तुम्ही त्याला पिकल्या वरच फोडावा. कच्चा फोडल्याने त्याचे इन्फेक्शन अजून वाढते. 

गळू होण्यामागील कारणे :

मित्रांनो गळू होण्यामागे काही कारणे आहेत, ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ! 

  • तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर तुम्हाला गळू होऊ शकतो, 
  • जर तुम्ही तुमच्या शरीराची स्वच्छता नीट ठेवत नसेल तर गळू होऊ शकतो, 
  • तसेच बदलती जीवनशैली चुकीचा आहार या सार्‍या गोष्टींचा प्रभाव तुमच्या शरीरावरही पडतो त्यामुळे गळू होऊ शकतो
  • जर तुम्हाला व्यसन असेल तरीही शरीरावर त्याचा परिणाम होतो तुम्हाला गळू होऊ शकतो
  • शरीरात जर एखादे इन्फेक्शन झाले तसेच विषारी घटक बाहेर निघण्यासाठी तुमच्या शरीरावर गळू होऊ शकतात
  • तिखट मसालेदार तेलकट तुपकट यासारखे पदार्थ खाल्ल्याने ही त्याचा परिणाम शरीरावर होतो व त्याचे इनफेक्शन बाहेर निघण्यास गळू तयार होतो

गळू  कुठे येतो ? 

हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो, कि गळू कुठे येतो ? शरीरातल्या कुठल्याही भागावर गळू येतो, त्याला जागेचा नेम नसतो. ज्या ठिकाणी तुमची बॅक्टेरिअल इन्फेक्शन होते त्या ठिकाणी तो येतो. तो तुमच्या मानेवर, चेहऱ्यावर, हातावर, मांड्यांवर, पायावर, शरीराच्या अवघड जागेवर, तसेच कमरेच्या मागच्या बाजूला, बसायचा जागेवर, या सगळ्या जागेवर तो येऊ शकतो. 

गळू पिकण्यासाठी काही घरगुती उपाय योजना ? 

गळू पिकण्यासाठी काही उपाय योजना आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ते करून बघा तुम्हाला फरक पडेल. 

कडूलिंबाचा वापर करून बघा :

कडूलिंबा मध्ये ऑंटीबॅक्टरियल तसेच अँटीसेफ्टीक चे गुणधर्म असतात. तसेच तुम्हाला शरीरावर कसले इन्फेक्शन झाले, तसेच बॅक्टेरिया झाला, अशा वेळी जर तुम्ही कडूलिंबाचा वापर केला, तर तुम्हाला त्यावर फायदे होतात. जर तुमच्या अंगावर किंवा हाता पायावर गळू झाला असेल, तर तुम्ही कडुलिंबाची पेस्ट वापरून बघा. त्यासाठी तुम्हाला कडुनिंबाची पंधरा ते वीस पाने घेऊन, त्यांना स्वच्छ धुऊन, त्याची पेस्ट करून, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर ती पेस्ट तुमच्या गळू ज्या जागेवर झाले, त्या जागेवर लावून ठेवावे. नंतर ते  सुकल्यावर तुम्हाला त्यावर खोबरेल तेल टाकून अलगद काढून घ्यायची आहे. त्यामुळे तुमचा गळू  पिकण्यास मदत होते, शिवाय त्या जागेची ठणकत असेल, तर तीही जाण्यास मदत मिळते. गळू लवकर जाण्यास मदत मिळते. 

वाचा  पनीर खाण्याचे फायदे

गरम पाण्याच्या कपड्याने शेका :

गळू हा पिकायला जर उशीर लागत असेल, आणि त्याची ठनक होत असेल, अशावेळी तुम्ही गळू ज्या जागेवर आहे, त्या जागेवर गरम पाण्यामध्ये कपडा बुडवून तो गळू च्या जागेवर ठेवावा. त्यामुळे गळू लवकर पिकण्यास मदत होते व त्याची ठळक ही थांबते. 

हळद वापरून बघा :

हळदीमध्ये ही ऑंटीसेप्टिक तसेच ऑंटीव्हायरल इन्फेक्शन यावर मात करण्याची क्षमता असते. जर तुम्ही तुमच्या गळूवर हळदीचा लेप लावला, तर फायदेशीर ठरतो. त्यासाठी तुम्हाला  एक चमचा हळद घ्यावयाची आहे, पाण्यामध्ये गरम करून ती थोडी शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर करू या ठिकाणी आहे, त्याच्या आजूबाजूच्या भागाला कोमट कोमट असताना लावायचे आहे. असे केल्यास तुमचा गळू लवकर पिकण्यास मदत होते. शिवाय ते त्याचे इन्फेक्शन होत नाही. तसेच त्याची ठनक ही बंद थांबते. 

चंदन पावडर लावून बघा :

ज्या जागेवर गळू झालेला असतो, ती जागा गरम असते, आणि त्याची ठनक ही होते. अशावेळी तुम्ही ठणक थांबवण्यासाठी तुमच्या पायाला किंवा अंगाला ज्या ठिकाणी गळू झालेला आहे, त्या ठिकाणी चंदन पावडरचा लेप लावून बघा. त्यासाठी तुम्हाला चंदन पावडर दुधामध्ये मिक्स करून, तुम्ही त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून, तुम्हाला ज्या जागेवर गळू झालेला आहे, त्या जागेवर त्याचा लेप लावावा. नंतर सुकल्यानंतर हळुवार पाणी टाकून त्याला भिजवून लगेच काढून घ्यावा. त्यामुळे तो पिकण्यास मदतही मिळते आणि त्या जागेवर खाज येण्याची समस्या असेल, तर तेही थांबते. 

गळू पिकत आहे असं वाटल्यास :

जर तुमच्या अंगावर गळू झाला असेल, आणि तो पिकला आहे, तरी तो फुटत नाहीये, असे वाटत असेल, तर अशावेळी तुम्ही एखाद्या सुईच्या साह्याने तो फोडू शकतात. त्यासाठी तुम्हाला अगोदर ती सुई किंवा ब्लेड निर्जंतुकीकरण करून त्याच्या साह्याने  गळूच्या तोंडावरती थोडसा कट मारायचा आहे. मग त्यातील पु लवकर बाहेर निघतो, आणि अशुद्ध रक्त बाहेर निघते. त्यावेळी तुम्ही त्याला खोबरेल तेल कापूसला लावून ती जागा अलवार पुसुन घ्यायची आहे, त्यानंतर त्याला डॉक्टरांकडून ऑंटी सेफ्टीक  क्रीम घेऊन त्या जागेवर लावायची आहे. त्यामुळे त्याचे इन्फेक्शन अजून दुसऱ्या जागेवर होत नाही. आणि जखम लवकर सावरण्यास मदत मिळते. तसेच त्याची ठळक जास्त भासत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडून पेन किलरची गोळी घेऊ शकतात. 

वाचा  जेवण करताना चे श्लोक तुम्हाला माहित आहेत का ?

योग्य आहार घ्या :

गळू होण्यामागील कारणे म्हणजे तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती ची कमतरता होय. यासाठी तुम्ही तुमच्या शरीरात रोगप्रतिकारशक्‍ती यावी, म्हणून तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, सूप, फळे, कडधान्य असा आहार घ्यायला हवा. तसेच तुम्ही तुमच्या आहारात तिखट, मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थ शक्‍यतो टाळावेत  तसेच अंमली पदार्थांचे सेवनही टाळावेत. त्यामुळे गळू होण्यासारख्या समस्या तुम्हाला होत नाहीत. शिवाय तुम्ही तुमच्या आहारात पुरेसे पाणी प्यायला हवेत. जर तुमच्या शरीरात पुरेसे पाणी राहिले, तर तुमच्या शरीरातील घाण द्रव्य, विषारी द्रव्य बाहेर होतात, व तुम्ही निरोगी राहतात. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला गळू झाल्यावर, त्यावर कोणकोणते घरगुती उपाय करावेत, तसेच तो कोणत्या कारणांनी होतो, तसेच तुम्ही काय काळजी घ्यायला हवी, हे सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here