टाळूला खाज येणे

नमस्कार मित्रांनो, प्रत्येक जण आपल्या सौंदर्या संदर्भात जागृत असतात. आणि त्यात जर केस स्वच्छ निरोगी असेल तर आपले सौंदर्यात अजून जास्त भर पडते. यासाठी आपण आपल्या केसांची वेळोवेळी काळजी घेत असतो. आपले केस स्वच्छ व निरोगी रहावे यासाठी आपण आठवड्यातून दोन-तीन वेळा केस धूत  असतो. परंतु अनेक जण हे.  कामाच्या गडबडीत केस नैसर्गिक पद्धतीने न सुकवता ड्रायरचा वापर करतात किंवा तसेच ओले केस बांधून कामाला निघतात.  पण मित्रांनो, यामुळे एक समस्या उद्भवू शकते. ती म्हणजेच केसांतील त्वचेला खाज येणे. म्हणजेच, टाळूला खाज येणे.

ही जरी सर्वसामान्य समस्या असली तरी याकडे दुर्लक्ष केल्यास अजून पुढे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जसे की टाळूला अतिशय खाज येणे म्हणजेच कोंड्याचे प्रमाण वाढणे. आणि केसात कोंडा झाला म्हणजे केस गळतीची समस्या उद्भवते. केस शुष्क आणि निस्तेज होणे अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. केस स्वच्छ न धुतल्यास किंवा केसांची योग्य देखभाल न केल्यास टाळूला खाज येत असते. आणि या समस्यांमुळे अनेक लोकही त्रस्त होतात. परंतु मित्रांनो जास्त घाबरण्याचे देखील कारण नाही. कारण, ही समस्या दूर करण्यासाठी काही आयुर्वेदिक घरगुती उपचार करून देखील या समस्येपासून तुम्ही दूर जाऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण टाळूला खाज येणे या समस्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच त्यावर कोणत्या प्रकारचे घरगुती उपाय करता येतील याविषयी जाणून घेणार आहोत.

टाळूला खाज येण्याची कारणे :

मित्रांनो अनेक कारणांमुळे टाळूला खाज येऊ शकते. टाळूला खाज येणे या समस्येला दुर्लक्ष केल्यास ते जास्त प्रमाणात वाढू शकते. टाळूला खाज येण्याची कारणे खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 • हवामानातील मोठ्याप्रमाणात बदल
 • सूर्य प्रकाशाने होणारा त्वचेचा क्षोभ
 • त्वचेच्या पेशी मध्ये कमी आद्रता
 • केसांच्या विशिष्ट उत्पादनांची अतिसंवेदनशीलता
 • टाळूवर चांगले वाढणारी विशिष्ट प्रकारचे बुरशीजन्य संक्रमण
 • केसात घाम येणे
 • केस स्वच्छ न धूतल्यास
 • केस कोरडे न सूकवल्या मुळे
वाचा  काळे मीठ याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

मित्रांनो, सर्व कारणांमुळे टाळूला खाज येऊ शकते. टाळू ला खाज येऊ नये, यासाठी आपण योग्य त्यावेळी केसांची काळजी घेतली पाहिजे. नेहमी केस स्वच्छ धुतले पाहिजे आणि धुतल्यानंतर देखील नैसर्गिक पद्धतीने केस कोरडे सुकवले पाहिजेत. टाळू ला खाज आल्यास काही घरगुती उपाय देखील करता येतील. तर, हे घरगुती उपाय नेमके कोणते हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

टाळूला खाज आल्यास घरगुती उपाय :

टाळूच्या त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तेल मसाज करने आवश्यक आहे. कारण यामुळे केसांना ओलावा मिळतो.  आपल्या केसांची योग्य देखभाल करण्यास केली पाहजेत.टाळूला तेल लावून हाताने मसाज करावी  तेल मसाज केल्यानंतर केसांना सोम्य क्लिंजर आणि कंडिशनर देखील लावा आणि कंडिशनरचा वापर करणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी चांगले ठरते. तसेच आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणे देखील गरजेचे आहे. केस धुण्यापूर्वी आपण आयुर्वेदिक हेअर मास्क चा देखील वापर करू शकतो. ज्यामुळे टाळूला खाज कमी होण्यास मदत मिळेल. मित्रांनो, टाळूला खाज आल्यास खालील प्रमाणे घरगुती उपाय करता येतील.

दही आणि लिंबू :

मित्रांनो दही आणि लिंबू यांच्या साह्याने टाळूची खाज कमी करता येऊ शकते. तरी याचा वापर कसा करावयाचा आहे हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

 • दोन चमचे दही
 • एक चमचा लिंबाचा रस

सर्वप्रथम एका वाटीमध्ये दोन चमचे दही आणि एक चमचा लिंबाचा रस हे मिश्रण मिक्स करून घ्या. हे मिश्रण टाळू वर 20 मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. केस धुताना तुम्ही हर्बल शांपू असा देखील वापर करू शकतात व यामुळे तुमच्या केसांना तसंच टाळूला नैसर्गिक स्वरूपातील मॉइस्चरायझर मिळते.त्यामुळे निस्तेज व निर्जीव केसांची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.

ॲपल साइडर व्हिनेगर :

एप्पल साइडर विनेगर मध्ये ऍसिटिक ऍसिड नावाच्या नैसर्गिक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.ज्यामुळे टाळूला येणारी खाज कमी होऊ शकते. नॅशनल सोरायसिस फाऊंडेशनच्या माहितीनुसार, एप्पल साइडर विनेगर मध्ये पाणी मिक्स करून हे मिश्रण टाळूवर लावल्यास तुम्हाला भरपूर फायदे मिळतील.

वाचा  लहान मुलांना मोबाईल चे व्यसन लागल्यास कसे सोडवावे

ऑलिव्ह ऑइल :

ऑलिव ऑइल कोमट करून टाळूवर लावून त्याने मसाज केल्यास टाळूच्या त्वचेची येणारी खाज कमी होऊ शकते. या तेलामुळे टाळूला ओलावा मिळतो. हे तेल टाळूला लावून केसांना आणि टाळूला हलक्या हाताने मसाज करावा. आणि काही तासांसाठी हे तेल केसांमध्ये राहू द्यावे. त्यानंतर हर्बल शाम्पूने हेअर वॉश करून घ्यावेत. याने नक्कीच  तुम्हाला मदत मिळेल.

जास्वंदीची फुले आणि पाने :

 • जास्वंदाची फुले पाच ते सहा 
 • दोन ते तीन चमचे दही
 •  लिंबाचा रस आवश्यकतेनुसार

सर्वप्रथम जास्वंदाची पाच ते सहा फुले आणि दोन-चार  जास्वंदीच्या झाडाची पाने एका मिक्सर क्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्या. या पेस्टमध्ये दही आणि लिंबाचा रस मिक्स करा हे मिश्रण एकत्र मिक्स करून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी टाळूवर लावा आणि त्यानंतर हर्बल शाम्पू च्या साह्याने के स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. 

नारळाचे तेल आणि लिंबू :

आपल्या केसांच्या लांबीनुसार नारळाचे तेल आणि लिंबाच्या रसाचे प्रमाण ठरवा आणि नंतर दोन्ही सामग्री एकत्र मिक्स करून घ्या. नंतर हे मिश्रण आपल्या टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. पाच ते दहा मिनिटांसाठी मिश्रण केसांमध्ये राहू द्या आणि नंतर हर्बल शाम्पू च्या साह्याने केस स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे.

खालील गोष्टींची देखील काळजी घ्यावी :

       याव्यतिरिक्त आपण आपल्या जीवनशैलीमध्ये देखील योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. ध्यान धारणा, व्यायाम आणि योगासनांचे सराव करावा. यामुळे ताण तणाव कमी होण्यास मदत मिळते. शिवाय, पोषक तत्त्वांचा आणि विटामिन युक्त आहार यांचे नियमित सेवन करावे. यामुळे केसांची वाढ देखील चांगली होते. आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए, विटामिन सी, विटामिन ई, अमिनो ऍसिड, अँटी अक्सिडेंट,पालेभाज्या, बदाम, आक्रोड, मेथी आणि पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश जरूर करावा. यामुळे तुमचे केस हे लांबसडक होण्यास देखील मदत होऊ शकते केसांना नैसर्गिक चमक येण्यास देखील मदत होईल तसेच वेळोवेळी केसांची नियमित काळजी घेतली पाहिजे.

वाचा  काळे तीळ खाण्याचे फायदे जाणून घेऊया काय आहेत?

   लव्हेंडर तेल तसेच कोरफडच्या रसाचा देखील तुम्ही वापर करू शकतात. यामुळे टाळू शांत होऊन राहून टाळूमध्ये नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास देखील मदत होऊ शकते. तसेच केसे नियमित आठवड्यातून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवावेत. यामुळे देखील टाळूवर कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकणार नाही. परंतु केस धुतल्यानंतर ते व्यवस्थित कोरडे करून घ्यावेत आणि जर केस नीट प्रकारे न सुकल्यास केसांमध्ये कोंडा होऊन खाजेचे प्रमाण वाढते. म्हणजे टाळूला खाज येते. म्हणून केसांची योग्य ती काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. आपण आपल्या केसांचे नीटपणे काळजी घेतल्यास आपली केस स्वच्छ व निरोगी राहतील.

        मित्रांनो टाळूला खाज येणे, याविषयी आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतली आहे. तसेच खाज आल्यास कुठल्या प्रकारच्या घरगुती उपाय करता येतील,टाळूला खाज येऊ नये म्हणून कसल्या प्रकारची काळजी घ्यावी याविषयी देखील आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. आणि हे घरगुती उपाय करुन देखील तुम्हाला मदत होत नसेल तर नक्की तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार करू शकतात. आम्ही सांगितली वरील प्रमाणे माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळू शकतात.

 

 धन्यवाद !

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!