मुक्का मार लागणे घरगुती उपाय

0
550
मुक्का-मार-लागणे-घरगुती-उपाय
मुक्का-मार-लागणे-घरगुती-उपाय

नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाने आपले आरोग्य जपले पाहिजे. अनेक वेळा आपण चालता चालता जरी पडलो तरी आपला जखम होत असते अथवा मुका मार लागत असतो. लहान मुलांना तर खेळता खेळता अनेक ठिकाणी लागत असते. हाताला, पायाला, गुडघ्याला, हाताच्या कोपरला वगैरे. या ठिकाणी त्यांना एक तर जखम होत असते अथवा जोरात पडल्यामुळे मुका मार तरी लागत असतो. मित्रांनो, मुका मार हा कोणालाही लागू शकतो. अगदी दुर्घटना ही कुणासोबत हे होऊ शकते. काही जणांना गाडीवरून पडल्यामुळे खरचटत असते तर काहींना जोरात पडल्यामुळे जखम तर होत नाही, परंतु आतील भागामध्ये इजा होत असते मुका मार लागत असतो. अगदी घरातल्या घरात राहूनही आपला मुका मार लागू शकतो. जसे की, आपण घरातील एखादा जिना चढताना अथवा घाई गडबडीने चालताना जोरात पडणे वगैरे. यामुळे, देखील आपल्याला मार लागत असतो. जर एखाद्या ओल्या जागेवरून आपला पाय निसटला तरी आपल्याला मुका मार लागू शकतो. मित्रांनो, मुका मार लागणे हे कुणाच्याही बाबतीत घडू शकते. म्हणून आपण आपल्या शरीराची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. आपले आरोग्य जपण्याकडे लक्ष दिले पाहिजे.मित्रांनो, मुका मार लागणे म्हणजेच काय? तर, जर एखादी व्यक्ती ही गाडीवरून पडलेली असेल आणि त्या व्यक्तीला जर खरचटलेले नसेल अथवा जखम झालेली नसेल, तर त्या भागावर ज्या ठिकाणी ती व्यक्ती पडलेली असेल, तेवढा भाग दुखत असेल, तर याला मुका मार लागणे असे म्हणू शकतो. अनेक वेळा लहान मुलेही खेळता खेळता खाली पडत असतात. खाली पडल्यानंतर जर त्यांना कुठलीही प्रकारची जखम न होता फक्त ज्या भागावर ते पडलेले आहे तेवढा भाग दुखापत होत असेल, तर त्याला मुका मार लागणे असे म्हटले जाते. ज्या ठिकाणी मुका मार लागलेला असेल, तर त्या ठिकाणी त्वचेच्या आतील रक्तवाहिन्यांवर परिणाम होत असतो आणि त्या ठिकाणची जागा ही काळपट अथवा हिरव्या कलरची होत असते. मुका मार लागल्यामुळे तेथील भाग हा काळपट दिसत असतो. ज्या ठिकाणी मार लागलेला आहे तर त्या त्वचेच्या आतील भागात दुखापत होत असते तेवढा भाग दुखत असतो, त्रास जास्तच होत असेल, तर त्या भागाला सूज देखील येऊ शकते. मित्रांनो, यालाच मुकामार असे म्हटले जाते. मुक्का मार लागणे घरगुती उपाय जेणेकरून, आपल्याला लवकरात लवकर आराम मिळू शकेल, याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, मुक्का मार लागणे घरगुती उपाय या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात! 

मुका मार लागणे यावर घरगुती उपाय:-

मित्रांनो, मुका मार लागल्यास आपला साधे सोपे घरगुती उपाय माहीत असणे फार गरजेचे ठरते. मुका मार हा कधीही लागू शकतो. त्यामुळे, आपण जर त्यावर प्राथमिक उपाय केले तर आपल्याला नक्कीच आराम मिळू शकतो. मुका मार लागणे यावर आपण कोणत्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  तळहातांना घाम येण्याची कारणे व उपाय

आंबी हळद आणि रगत रोडा:- Aambi Halad Ani Ragat Roda

मित्रांनो, अनेक वेळा आपण सायकल वरून पडल्यामुळे अथवा भिंतीला आपटल्या गेल्यामुळे अथवा तोल गेल्यामुळे जोरात पडल्याने आपल्याला मुका मार लागत असतो. तर अशावेळी ज्या ठिकाणी मार लागलेला असतो, त्या ठिकाणी रक्त गोठण्याची शक्यता असते आणि तिथला भाग हा हिरवट, निळसर पडत असतो. तर अशा ठिकाणी तुम्ही प्राथमिक उपाय म्हणून आम्ही हळद आणि रगत रोडा याचा उपयोग करू शकतात. एक साण घ्यावी. त्यावर आंबी हळद थोडी उगाळून घ्यावी त्यानंतर त्यामध्ये थोडासा रगत रोडा देखील उगाळून घ्यावा. हे दोघे मिश्रण एकत्रित करून थोडसं कोमट करून ज्या ठिकाणी मुका मार लागला असेल, तर त्या ठिकाणी आंबी हळद आणि रगतरोडाचा लेप लावावा. मित्रांनो हा उपाय जर तुम्ही सलग तीन दिवस केलात, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची वेदना न होता लागलेला मुका मार व्यवस्थित होण्यास मदत होऊ शकते.

कोरफडीचा रस:- Korfadicha Ras 

कोरफड ही थंडगार असते. ज्या ठिकाणी तुम्हाला मुका मार लागला असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही कोरफडीचा रस देखील लावू शकतात. कोरफडीचा रस लावल्यामुळे ज्या ठिकाणी मुका मार लागलेला असेल, तर त्या ठिकाणी रक्ताच्या गाठी जमा होत नाहीत. मुका मार लागल्यास तुम्ही कोरफडीचा रस तयार करून त्याचा लेप त्या जागेवर लावावा. असे सलग तीन ते चार दिवस केल्यामुळे, तुमची जखम बरी होण्यास मदत होऊ शकते.

मोहरीचे तेल:- Mohariche Tel

मित्रांनो, मुका मार लागलेल्या जागेवर तुम्ही मोहरीचे तेल देखील लावू शकतात. मोहरीचे तेल लावल्यामुळे त्याचा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. मोहरीचे तेल एका वाटीमध्ये एक चमचा घ्या. त्यामध्ये तुम्ही लसूणच्या पाकळ्यांचा रस काढून टाकावा आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद मिक्स करावी. हे सर्व मिश्रण एकत्रित करून एकजीव झाल्यानंतर कोमट करून ज्या ठिकाणी तुम्हाला मुका मार लागलेला असेल, तर त्या ठिकाणी त्याचा लेप लावावा. असे केल्यामुळे दोन ते तीन दिवसातच तुम्हाला आराम मिळेल. मुका मार लागलेल्या ठिकाणी जर गाठी झालेल्या असतील तर त्या देखील जाण्यास मदत होऊ शकेल.

वाचा  तळहातांना घाम येण्याची कारणे व उपाय

बर्फाचा उपयोग:- Barfacha Upyog

मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्हाला मुका मार लागलेला असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही बर्फाचा उपयोग देखील एक प्राथमिक उपचार म्हणून करू शकतात. मुका मार लागल्यावर त्या ठिकाणची जागा ही फार दुखत असते. अशा वेळेस तुम्ही बर्फाचा तुकडा घेऊन त्या जागेवर बर्फाने शेक द्यावा. बर्फ हा एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन अथवा एका नरम स्वच्छ कपड्यांमध्ये घेऊन त्या जागेवर हळुवारपणे शेक द्यावा. असे केल्यामुळे देखील तुम्हाला आराम मिळू शकतो.

वाळू अथवा गरम पाण्याचा उपयोग:- Valu Athava Garam Panyacha Upyog

ज्या ठिकाणी तुम्हाला मुका मार लागलेला असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही वाळूचा अथवा गरम पाण्याचा उपयोग करू शकतात. थोडीशी वाळू घेऊन ती गरम करून घ्यावी आणि एका जाड कपड्यात बांधून ज्या ठिकाणी तुम्हाला मुका मार लागला असेल, तर त्याचा हळुवारपणे शेक तुम्ही देऊ शकतात. वाळू उपलब्ध नसेल, तर त्या ऐवजी तुम्ही पाण्याचा उपयोग करू शकतात. कोमट पाणी करून घ्यावे आणि एका पिशवीमध्ये घेऊन त्या कोमट पाण्याचा शेक तुम्ही मुका मार लागलेल्या ठिकाणी त्या जागेवर देऊ शकतात. असे केल्यामुळे देखील तुम्हाला लवकर आराम मिळेल.

निरगुडीचा पाल्याचा उपयोग:- Nirgudicha Palyacha Use

मुका मार लागल्यास तुम्ही निरगुडीच्या पानाचा देखील उपयोग करू शकतात. शेतामध्ये निरगुडीचा पाला हा सहज उपलब्ध होत असतो. मित्रांनो, निरगुडीच्या पाला घेऊन त्याची पाने स्वच्छ धुऊन टाकावेत आणि एका पातेल्यामध्ये ते पान काढून घ्यावेत. त्यामध्ये थोडेसे पाणी टाकावे आणि त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद देखील घालू शकतात. हे पाणी चांगले उकळून घ्यावे आणि या पाण्याचा शेक एका कपड्याच्या सहाय्याने तुम्ही मुका मार लागलेल्या ठिकाणी देऊ शकतात.

मित्रांनो, मुक्का मार लागणे घरगुती उपाय याबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

वाचा  तळहातांना घाम येण्याची कारणे व उपाय

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here