प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2022

0
638
प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2022
प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2022

नमस्कार मित्रांनो ,आज आपण एक नवीन योजना जाणून घेणार आहोत. या योजनेमुळे प्रत्येकाच्या घरात दिवा पेटावा म्हणून शासनाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित असलेल्या लोकांसाठी विज सहज उपलब्ध व्हावी याकरिता “प्रधानमंत्री सौभाग्य योजना” ही योजना अमलात आणली.

या योजनेअंतर्गत देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब घरांना वीज सुविधा मोफत दिली जाणार आहे. आजही आपल्या देशात अशी अनेक घरे आहेत जी कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे विजेशिवाय आपले जीवन जगत आहेत, हे आपणा सर्वांना माहीत आहे, अशा परिस्थितीत सरकारने त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2022 हि योजना 25 सप्टेंबर 2017 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती दिवशी उत्तर प्रदेश, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमधील सर्व गावांना वीज पुरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. केंद्रसरकारने पंतप्रधान सौभाग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी 16,320 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे.

वीज जोडणीसाठी प्रत्येक गावात कॅम्प लावले जाणार आहेत. चला तर मग प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2022 या योजनेसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रधानमंत्री सौभाग्य योजनेची उद्दिष्टे :

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक योजना सुरू केली आहे ज्याचा उद्देश प्रत्येकाच्या घरात वीज पोहोचवणे हा आहे. प्रधानमंत्री सौभाग्य योजना ( प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना ) विशेषत: समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यांना वीज परवडत नाही. एकात्मिक विद्युत विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना यासारख्या इतर अनेक ऊर्जा योजना आहेत ज्या सरकारने वीज पुरवण्याच्या याच उद्देशाने सुरू केल्या आहेत. प्रधानमंत्री सौभाग्य योजनेचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक शहर आणि गावातील प्रत्येक घरात वीज पोहोचवणे हे आहे. केंद्र सरकारने सौभाग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी 16,320 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या योजनेअंतर्गत ट्रान्सफॉर्मर वायर आणि मीटर यांसारख्या उपकरणांवरही सरकारी अनुदान दिले जाणार आहे.बॅटरी बँकेच्या दुरुस्तीसाठी येणारा खर्च 5 वर्षांसाठी सरकार देणार आहे.या योजनें अंतर्गत प्रत्येक गावात वीज जोडणीसाठी कॅम्प लावले जाणार आहेत.

या योजनेस “प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना” असे देखील म्हटले जाते. या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने अंतर्गत वीज जोडणीसाठी २०११ च्या सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणनेच्या आधारे देशातील अशा लोकांची निवड करण्यात आली होती, ज्यांची नावे या समाजात दिसून येतील. त्यांना आर्थिक जनगणनेत वीज जोडणी मोफत दिली जाईल आणि दहा सुलभ हप्त्यांमध्ये देता येईल.

प्रधानमंत्री सौभाग्य योजना बजेट :

पंतप्रधान सौभाग्य योजनेसाठी सरकारने 16,320 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. या योजने अंतर्गत 12,320 कोटी रुपयांच्या सरकारी मदतीची तरतूदही सरकारने केली आहे. प्रधानमंत्री सौभाग्य योजने अंतर्गत अर्थसंकल्पाचा सर्वाधिक हिस्सा ग्रामीण भागासाठी ठेवण्यात आला आहे. सरकारने ग्रामीण भागासाठी 14,025 कोटी रुपयांचे बजेट ठेवले असून शहरी भागासाठी 2.50 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. सरकारच्या माध्यमातून ज्या भागात सध्या वीज सारख्या सेवा उपलब्ध नाहीत, त्यांना सोलर पॅक देण्यात येणार असून, या सोलर पॅकमध्ये 1 पंखा आणि 5 एलईडी बल्ब असतील.
प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2022 पर्यंत दुर्गम आणि दुर्मिळ भागात असलेल्या विनाविद्युत असलेल्या कुटुंबांसाठी 200 ते 300 W चे सौर उर्जा पॅक देखील प्रदान केले जातील, ज्यामध्ये 5 LED बल्ब, 1 DC पॉवर प्लग, 1 DC पंखा यांचा समावेश आहे. बॅटरी बिघाड झाल्यास, सरकार 5 वर्षांसाठी बॅटरी बँकेचा खर्च उचलेल. ह्या योजनेंतर्गत त्या सर्व उपकरणांमध्ये सबसिडीही दिली जाईल जे विजेशी संबंधित असतील.

योजना  साठी लागणारी पात्रता :

अर्जदार गरीब कुटुंबातील असावा आणि त्याच्या/तिच्या घरात वीज कनेक्शन नसावे.
ज्या गरिबांची नावे सामाजिक-आर्थिक जनगणनेत नोंदवली जातील त्यांना ही मोफत वीज दिली जाईल.
ज्या गरीबांचे नाव यादीत नाही ते एकाच वेळी किंवा 10 हप्त्यांमध्ये 500 रुपये शुल्क भरून अर्ज करू शकतात.

योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा :

प्रधानमंत्री सौभाग्य योजना साठी ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज आपल्याला करता येतो. आपण आपल्या जवळच्या वीज विभागात जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकतो.

सर्व प्रथम लाभार्थ्याला वीज कार्यालयात जावे लागते, तेथे विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याकडून प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2022 शी संबंधित अर्जाविषयी आपल्याला माहिती मिळू शकते. अर्ज करण्यासाठी, लाभार्थ्याने वीज कार्यालयातून फॉर्म घ्यावा.

प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2022 चा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अत्यंत गरीब कुटुंबातील असावा तसेच त्याच्या घरी विद्युत कनेक्शन नसावे. या योजनेअंतर्गत त्यांनाच लाभ देण्यात येईल ज्यांचे नाव सामाजिक व आर्थिक जनगणना 2021 च्या यादीत असेल. ज्यांचे नाव सामाजिक व आर्थिक जनगणना 2021 च्या यादीत नाही ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात परंतु त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी 500 रुपये भरावे लागतील. हे पैसे 10 हप्त्यात भरण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे, म्हणजे तुम्ही प्रती महिना 50 रुपये भरून सौभाग्य योजना 2022 चा लाभ घेऊ शकता.

सौभाग्य योजना 2022 साठी आवश्यक कागदपत्रे

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • रहिवासी दाखला
 • मोबाइल नंबर
 • ड्राइविंग लायसन्स
 • आणि बाकी आवश्यक असलेली माहिती

तुम्हालासुद्धा प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2022 साठी ओंनलाईन रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील खालील प्रकारे करू शकता.

सौभाग्य योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

 • सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2022 च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
 • www.pmmodiyojna.in वेबसाइटवर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
 • मुखपृष्ठावर तुम्हाला Guest Login चा पर्याय दिसेल त्या वर क्लिक करा.
 • Guest Login वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पृष्ठ उघडेल.
 • या पृष्ठावर तुम्हाला मोबाइल क्रमांक किंवा ईमेल ID टाकून लॉगिन बटन वर क्लिक करावे लागेल.
 • नंतर पुढील पृष्ठावर तुमच्या समोर सौभाग्य योजनेचा अर्ज उघडेल तुम्हाला अर्जा मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.

नंतर तुमची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री सौभाग्य योजना माहिती जाणून घेण्यासाठी शासनाने एक ॲप्लिकेशन तयार केलेले आहे ते एप्लीकेशन देखील आपण डाउनलोड करून घेऊ शकतो ते खालील प्रमाणे:

सौभाग्य योजना मोबाइल ॲप डाउनलोड प्रक्रिया :

 • सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store उघडावे लागेल.
 • आता तुम्हाला सर्च बॉक्समध्ये PM सौभाग्य योजना टाकावी लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला सर्च बटणावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर एक यादी उघडेल.
 • या यादीत तुम्हाला सौभाग्य ॲप दिसेल.
 • तुम्हाला त्या ॲप वर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला Install बटणावर क्लिक करावे लागेल.
 • इन्स्टॉल बटणावर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाइलवर पंतप्रधान मोबाइल ॲप डाउनलोड होईल.

अशाप्रकारे आम्ही प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसंबंधी ची सविस्तर माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व अशाच विविध योजनेसंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देत रहा व योजनेबद्दल काही शंका असल्यास कमेंट करून पाठवा.

या योजनेसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधून आपण माहिती मिळवू शकता.

पंतप्रधान सौभाग्य योजना टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक:- 1800 121 5555.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here