स्वप्नात लग्न पत्रिका दिसणे शुभ की अशुभ

0
599
स्वप्नात लग्न पत्रिका दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात लग्न पत्रिका दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे वेगवेगळ्या प्रकारे पडतात. स्वप्न हे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पडतात. स्वप्नामध्ये आपल्या सभोवताली जे परिसर आहे, ज्या व्यक्ती आहेत, त्या सगळ्या आपल्या स्वप्नात येऊ शकतात. तसेच काही स्वप्न हसवणारे असतात. तर काही रडवणारे असतात. तर काही चिडवणारे असतात. स्वप्नात लग्न पत्रिका दिसणे हे स्वप्न लग्नकार्य करणाऱ्या लोकांच्या बाबतीत मानले जाते.

तर मित्रांनो, तुमच्या स्वप्नात काय दिसले? यावर त्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. तर असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नात लग्न पत्रिका दिसणे?

मित्रांनो, ज्यावेळी एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह जुळतो, तेव्हा त्यांच्या लग्नाचा एक अवधी असतो आणि त्या काळामध्ये लग्नपत्रिका छापून सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले जाते. सगळ्यांनी आशीर्वाद द्यायला यावे, असे त्या पत्रिकेमध्ये छापले जाते.

तर मित्रांनो, तुमच्या स्वप्नामध्ये लग्न पत्रिका येत असेल, तर तसेच तुम्ही मनामध्ये निरनिराळे प्रश्न निर्माण करतात, ही माझ्या स्वप्नात लग्न पत्रिका का आली? तसेच स्वप्नात लग्नपत्रिका येणे, शुभ असते किंवा अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात लग्न पत्रिका दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात लग्न पत्रिका येणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्ना शास्त्रनुसार स्वप्नामध्ये लग्नपत्रिका येणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये लग्नपत्रिका कुठे दिसली? कोणत्या प्रकारे दिसली? कशी दिसली? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात..! 

वाचा  स्वप्नात वीज दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात लग्न पत्रिका दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये लग्नपत्रिका दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्र नुसार त्याचा अर्थ होतो की, तुमच्या जीवनातील ताण-तणाव, संकट आता कमी होऊन, तुम्ही शांत आणि समाधानी आयुष्य जगणार आहेत. तुमच्या जीवनात आनंददायी गोष्टींची आता सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही या स्वप्नात खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात लग्न पत्रिका जळताना/जळालेली दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात लग्नपत्रिका ही तुम्हाला जळताना किंवा जळालेली दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही दिवसात तुमचे आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहे. किंवा काही दुखद: बातमी तुम्हाला मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात स्वतःची लग्नपत्रिका दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये तुमची स्वतःची लग्न पत्रिका जर तुम्हाला दिसत असेल, तर ते अतिशय शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, लवकरच तुमचा विवाह ठरणार आहे. तुमच्या जीवनामध्ये कोणीतरी असा व्यक्ती येणार आहे, जो तुम्हाला समजून घेणार आहे.

समजा तुमचा विवाह जमला झाला आहे, जर तुमच्या स्वप्नात तुमचीच लग्नपत्रिका येत असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की, तुमचे वैवाहिक जीवन हे सुखी आणि समाधानी राहणार आहे. आनंददायी गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात लग्न पत्रिका छापताना दिसणे

मित्रांनो  स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात लग्न पत्रिका छापताना जर तुम्हाला दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही दिवसात तुम्हाला खूप मोठे काम येणार आहे. मोठे प्रोजेक्ट मिळणार आहे आणि तुमचे नाव प्रसिद्ध होणार आहे. तसेच तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात धनुष्यबाण दिसणे शुभ की अशुभ!

स्वप्नात लग्न पत्रिका फाडलेली दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये लग्नपत्रिका जर तुम्हाला फाटलेली किंवा फाडताना दिसली असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही जे काम करत आहेत, त्या कामांमध्ये कोणीतरी जाणून बूजून अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच तुमचे नुकसान व्हायला हवे, अशी त्यांची इच्छा आहे, त्यामुळे तुम्ही खबरदारी घ्यावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात लग्नपत्रिका प्रिंटिंग करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये लग्नपत्रिका जर तुम्ही प्रिंटिंग करताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा अर्थ होतो की, तुमच्या जीवनात अनेक आनंदाच्या गोष्टी येणार आहेत. काहीतरी सुखद धक्का तुम्हाला मिळणार आहे. तसेच अचानक धनलाभ ही तुम्हाला होऊ शकतो. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात स्वतःचे लग्न दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला तुमच्या स्वतःचे लग्न होताना दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळ तुम्हाला अडचणी येणार आहेत. ताण-तणाव येणार आहे. तसेच आर्थिक स्थिती ही बिघडणार आहे. त्यामुळे तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवावे आणि कोणतेही काम करताना त्याची तपासणी करूनच करावे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दुसऱ्याचे लग्न दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात तुम्ही दुसऱ्याची इतर कोणाचे लग्न बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचे असे अर्थ आहे की, येत्या काही दिवसात तुम्हाला आनंददायी गोष्टीची वार्ता मिळणार आहे. तसेच तुमचे लग्न लवकर जमणार आहे. तसेच लग्न झाले असेल, तर घरात काहीतरी गोड आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. किंवा तुमच्या ज्या इच्छा पूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात लग्न पत्रिका तुम्ही देवाजवळ ठेवताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये लग्नपत्रिका जर तुम्ही देवाजवळ ठेवताना दिसत असणार, तर त्याचा अर्थ होतो की, तुम्ही एखाद्या मोठ्या बिजनेसची सुरुवात करणार आहे. व्यवसायाची सुरुवात करणार आहे. किंवा तुम्हाला नोकरी मिळणार आहे.

वाचा  स्वप्नात आतंकवादी दिसणे शुभ की अशुभ

त्यामुळे तुम्ही देवाजवळ आशीर्वाद घेणार आहेत. तसेच देवाच्या आशीर्वाद तुमच्या सदैव पाठी राहील, तसेच त्या बिझनेस मध्ये किंवा नोकरीमध्ये तुम्ही यशस्वीरित्या कामगिरी करणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये लग्नपत्रिका दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here