स्वप्नात सूर्य दिसणे शुभ की अशुभ

0
696
स्वप्नात सूर्य दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात सूर्य दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न सगळ्यांना पडतात. स्वप्नांचे नियम नसतात. स्वप्न हे आपल्याला सगळ्या प्रकारचे पडू शकतात. तसेच अगदी लहान पासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पडतात. मित्रांनो स्वप्नांच्या दुनिये पैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे स्वप्नामध्ये सूर्य दिसणे. स्वप्नात सूर्य दिसणे हे स्वप्न योगी लोकांच्या बाबतीत असू शकते असे मानले जाते.

मित्रांनो, पृथ्वीवरील सगळ्यात जीवनावश्य घटक म्हणजे सूर्य होय. कारण आपल्याला ऊन, पाऊस, वारा या सगळ्या गोष्टींची गरज असते. त्यामध्ये सूर्य हा आपल्या महत्त्वाचा घटक आहे. समजा सूर्य एखाद्या वेळेस उगवलाच नाही, तर कसे होईल? सगळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते?

मित्रांनो,  सगळ्या ग्रहांमध्ये सूर्य हा तेजस्वी आणि मोठा आहे. तसेच सूर्यावर आपले जीवन अवलंबून आहे. तसेच हिंदू संस्कृतीमध्ये सूर्याला जल चढवले जाते. त्याची पूजा केली जाते. सूर्याला महत्त्वाचे स्थान दिले जाते. आणि जर का तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये सूर्य दिसत असेल? किंवा सूर्याचे वेगवेगळे रूप दिसत असतील, जसे की सूर्य उगवताना दिसणे, सूर्यास्त होताना दिसणे? ग्रहण दिसणे?

यासारखे निरनिराळे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील, तर त्याचे काय संकेत असू शकतात? तसेच स्वप्नामध्ये सूर्य येणे हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण त्याचे समाधानकारक उत्तर घेऊन आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात..! 

स्वप्नात सूर्य दिसणे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये सूर्य दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये सूर्य कुठे दिसला? कशा प्रकारे दिसला? कशा अवस्थेत दिसला? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात. 

वाचा  स्वप्नात खंडोबाची तळी भरताना दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात सूर्य दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये सूर्य दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, लवकरच तुमच्या जीवनातील ताणतणाव, निराशवादी जीवन हे कमी होऊन, तुम्ही सुखी, समाधानी आणि आनंदाने जीवन जगणार करणार आहे. तसेच काही शुभ वार्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सूर्याला हात लावताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही सूर्याला हात लावताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, लवकरच तुम्हाला काहीतरी मोठे स्थान किंवा मोठेपण मिळणार आहे. मानसन्मानाचे योग ही संभवत आहे. किंवा अचानक खूप मोठे धनलाभ किंवा लॉटरी लागू शकते, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सूर्य उगवताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही सूर्य उगवताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनातील ताण-तणाव तसेच समस्या ह्या कमी होणार आहेत.

तुमच्या जीवनात नवीन आशेची किरणे उमलणार आहेत, व तुम्ही नव्याने तुमच्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. सुखी, समाधानी आयुष्य जगणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सूर्यास्त होताना बघणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये सूर्यास्त होताना ही दिसणे, हे स्वप्न सुद्धा शुभ मानले जाते. कारण दिवसभराच्या थकव्यानंतर ज्यावेळी सूर्य मावळतो, त्याला सूर्यास्त असे म्हणतात. तसेच तुम्ही दिवसभराच्या थकल्यानंतर ज्यावेळी आराम करतात तो आराम तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरतो. म्हणजेच दगदगी मधून त्रासामधून तुम्ही लवकरच मुक्त होणार आहेत. आरामदायक आणि समाधानी जीवन जगणार आहे. असे संकेत स्वप्नात येते. 

स्वप्नात सूर्यग्रहण होताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये सूर्यग्रहण होताना, जर तुम्हाला दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अचानक बदल होणार आहेत. त्रासदायक स्थिती निर्माण होणार आहे. कर्ज घ्यावे लागणार आहे. किंवा प्रत्येक कामामध्ये अडचणी येणार आहेत. पण तुम्ही हिम्मत सोडू नका. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात देवस्थान दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात सूर्य आग ओकताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर सूर्य तुम्हाला आग ओकताना दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, काहीतरी त्रासदायक स्थिती निर्माण होणार आहे. तसेच तुमच्या आरोग्यावरही काही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची व परिवाराची काळजी घ्यावीत, असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात तुम्ही सूर्याची पूजा करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही सूर्याची पूजा करताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनामध्ये सुखी समाधानी आयुष्य तुम्ही जगणार आहे. तसेच घरामध्ये काहीतरी शुभ वार्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे. किंवा आनंददायी गोष्टी तुमच्या घरी घडणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सूर्य रथावर बसलेला दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला सूर्य रथावर दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये रथसप्तमी हा दिवस साजरा केला जातो, जर तुमच्या स्वप्नामध्ये हा दिवस किंवा सूर्य रथावर दिसत असेल, तर हे स्वप्न तुमच्या सौभाग्य प्राप्ती कारक असते, असे मानले जाते.

म्हणजे तुमच्या जोडीदाराचे आयुष्य दीर्घायुष्य होणार आहे. तसेच तुम्ही परिवारासोबत प्रेमळ वातावरणात राहणार आहे. तसेच तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये सूर्य दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here