स्वप्नात औषध दिसणे शुभ की अशुभ!

0
558

 

नमस्कार मित्रांनो झोपे दरम्यान आपल्याला अनेक प्रकारचे स्वप्न पडत असतात. त्यातील काही चांगले, तर काही वाईट देखील असतात. मित्रांनो, आपण दिवसभरामध्ये आपल्या मनात हे विचार आणलेले असतात अथवा ज्या व्यक्तींशी आपण भेटलेलो असतो, बोललेलो असतो, तर अशाही स्वरूपाचे स्वप्न आपल्याला पडत असतात. काही जणांना स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशु-पक्षी, व्यक्ती, वस्तू, घटना दिसत असतात तर काही जणांना स्वप्नामध्ये देवी देवता देखील दिसत असतात.मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्वप्नात औषध दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत.

जर तुम्ही स्वतः आजारी असा अथवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल, तर तुम्हाला या स्वरूपाचे स्वप्न पडू शकते. जसे की, तुम्ही औषध खरेदी करताना दिसणे वगैरे स्वरूपाची. मित्रांनो इंग्लिश मध्ये औषधींना मेडिसिन असे म्हटले जाते, तर हिंदीमध्ये दवाई असे म्हटले जाते. जर अचानक आपले आरोग्य बिघडले अथवा सर्दी वगैरे झाला तर आपणास औषधीची गरज भासते म्हणजेच औषध घेतल्यावर आपण बरे होण्यास मदत होत असते. मित्रांनो, तुम्हाला देखील स्वप्नात औषध दिसलेले आहे का? जर स्वप्नात तुम्ही औषध बघितलेले असेल, तर ते तुम्ही नेमके कोणत्या स्वरूपात बघितले होते? त्यानुसारच तुम्हाला त्या स्वप्नाचे संकेत कळू शकतात. चला तर मग स्वप्नात औषध दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात औषध दिसणे
स्वप्नात औषध दिसणे

स्वप्नात औषध दिसणे शुभ की अशुभ!

    काही व्यक्तींना स्वप्नात औषधी दिसत असतात. जसे की स्वप्नात ते औषधी खरेदी करताना दिसणे, स्वप्नात औषध विकताना दिसणे, स्वप्नात औषध खाताना दिसणे,स्वप्नात तुम्हाला खूप सारे औषधे दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडत असतात, तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात काका दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात औषध दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला औषध दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला मानसिक टेन्शन येणार आहे. तुमच्या कार्यात अनेक अडचणी येणार आहेत. अनेक संकटांचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे. त्यामुळे, तुमचे आरोग्य देखील बिघडू शकते.

स्वप्न तुम्ही औषधी खरेदी करताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही औषध खरेदी करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या कार्यात ज्येष्ठ वरिष्ठ मंडळींचा सल्ला घ्यावा लागणार आहे. कुठलेही कार्य करताना तुम्ही घाई गडबड न करता अनेकांचा सल्ला घेऊन तुमची कामे केली पाहिजेत.

स्वप्न तुम्ही औषध विकताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही औषध विकताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कार्यात अपयश मिळू शकते. परिणामी तुमच्या इतरही कार्यात अडचणी निर्माण होणार आहेत. तुम्हाला आर्थिक संकट येऊ शकते.

स्वप्नात तुम्हाला मेडिसिन स्टोर दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला मेडिसिन स्टोर दिसलेले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. हे स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अनेक अडचणी, संकटे येतील. परंतु त्यावर लगेच मार्ग देखील सापडणार आहे. अनेक संकटांचा सामना करून तुम्हाला यश मिळणार आहे.

स्वप्नात तुम्ही औषध खाताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही औषध खाताना दिसलेले असेल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्ही कुठलेही कार्य करताना त्या कार्याच्या फळाची अपेक्षा ठेवतात. म्हणजेच तुम्ही कुठलेही काम केले तरी तुम्ही तत्काळ त्याच्या परिणामाची अपेक्षा ठेवतात.

स्वप्नात तुम्हाला खूप सारे औषधे दिसणे.

    स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला खूप सारे औषधे दिसलेले असतील, तर हे चांगले स्वप्न मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तुमची तब्येत अचानक खराब होणार आहे. असे स्वप्न दिसल्यास तुम्ही पूर्वीपेक्षा तुमच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे.

वाचा  स्वप्नात बस दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुमच्या हातून औषधाची बॉटल तुटताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुमच्या हातून औषधाची बॉटल तुटताना तुम्हाला दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या नोकरीमध्ये अथवा तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या हातात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी, तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकते.

स्वप्नात तुम्ही इतरांना औषधी वाटताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही इतरांना औषधी वाटताना दिसलेले असाल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होणार आहात. गरजवंतांना मदत करणार आहात. अनेक गरीब लोकांच्या मदतीला तुम्ही धावून जाणार आहात.

       मित्रांनो, स्वप्नात औषध दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

       धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here