स्वप्नात बाळूमामा दिसणे शुभ की अशुभ

0
835

 

नमस्कार मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो स्वप्न हे वेगवेगळ्या प्रकारचे पडू शकतात. काही स्वप्न हे विचित्र असतात. तर काही स्वप्न हे आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती देण्यासाठी येत असतात. तर स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत स्वप्नात बाळूमामा दिसणे. मित्रांनो बाळूमामा यांचे नाव बालप्पा आहे. बाळूमामा हे कर्नाटक राज्यातील बेळगाव  जिल्ह्यातील  चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या गावात राहत होते. बाळूमामा हे 18 व्या शतकातील संत होते.  तसेच त्यांनी त्यांच्या भाची सोबत विवाह केला होता. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील लोकांचे प्रश्न सोडवले. बाळूमामा यांनी  वयाच्या 74 व्या वर्षी समाधी घेतली होती. तसेच बाळूमामांच्या मेंढ्या या सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि लोक त्यांच्या दर्शनासाठी खूप गर्दी करतात. तर मित्रांनो तुमच्या स्वप्नामध्ये बाळूमामा दिसत असेल, किंवा बाळूमामाच्या मेंढ्या दिसत असेल, तर निरनिराळे प्रश्न निर्माण होतात की, मला असे स्वप्न का बरं पडले असेल? तसेच स्वप्नामध्ये बाळूमामा दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

स्वप्नात बाळूमामा दिसणे
स्वप्नात बाळूमामा दिसणे

स्वप्नात बाळूमामा दिसणे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये बाळूमामा दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये बाळूमामा कुठे दिसले? कशा प्रकारे दिसले? काय करताना दिसले? किंवा कोणत्या अवस्थेत दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, जाणून घेऊयात…! 

वाचा  स्वप्नात फुलांचा हार दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात बाळूमामा दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये बाळूमामा दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते. कारण बाळूमामांनी नेहमी लोकांना सत्यचा आणि चांगल्या प्रकारचा मार्ग दाखवलेला आहे. तुम्हाला जर असे स्वप्न दिसत असेल, तर त्याचा असा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या कार्यामध्ये कुठेतरी चुकमुक करत आहेत. त्यामुळे तुम्ही तुमची कार्य योग्य गतीने आणि चांगल्या प्रकारे करावीत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बाळूमामाशी बोलताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्ना मध्ये जर तुम्ही बाळूमामाशी बोलताना दिसत असाल, तर ते स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनातील ताण-तणाव, समस्या या कमी होणार आहे. तुम्हाला असा व्यक्ती/ गुरु भेटणार आहे, जो तुमच्या उज्वल भविष्यात तुमची मदत करणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बाळूमामा रागावलेले दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला बाळूमामा रागावलेले दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की तुम्हाला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या कामांमध्ये जाणून- बुजून अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे तुम्ही कामे नीट जपून व काळजीपूर्वक करावीत, नाहीतर त्याचा फायदा कोणी घेऊ शकतो. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बाळूमामाच्या मेंढ्या दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये बाळूमामाच्या मेंढ्या दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. बाळूमामाच्या मेंढ्या या खूप श्रेष्ठ मानल्या गेलेल्या आहेत आणि जर तुम्हाला त्या तुमच्या स्वप्नात असेल, तर स्वप्नशास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की तुम्हाला जीवनामध्ये खूप मोठे स्थान किंवा मोठेपण मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद देताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये बाळूमामा जर तुम्हाला आशीर्वाद देताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनातील समस्या लवकरच कमी होणार आहे. तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. तसेच तुम्हाला मानसन्मानाचे योगही संभावत आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

वाचा  स्वप्नात स्वामी विवेकानंद दिसणे शुभ की अशुभ

मित्रांनो बाळुमामांनी वयाच्या 74 व्या वर्षी समाधी घेतली होती आणि जर तुम्हाला ते स्वप्नामध्ये दिसत असेल, तर ते मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुम्हाला जीवनामध्ये चढउताराचे दिवस बघावे लागणार आहे. अडचणींचा ही सामना करावा लागणार आहे. पण तुम्ही मेहनत केली प्रयत्न केले, तर त्यातून यश तुम्हाला जरूर मिळेल. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बाळूमामा आजारी दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये बाळूमामा जर तुम्हाला आजारी दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहे. किंवा काहीतरी भयानक संकट तुमच्या ओढवून येणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बाळूमामा तुम्हाला तुमच्या घरी दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर बाळूमामा तुम्हाला तुमच्या घरी दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुम्हाला खूप मोठे स्थान किंवा मोठे पद मिळणार आहे. तसेच तुम्हाला अचानक धनलाभचे योग संभावत आहे, आणि तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये बाळूमामा दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेतच. तसेच मित्रांनो आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

                         धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here