स्वप्नात भगवान विष्णू दिसणे शुभ की अशुभ

0
386
स्वप्नात भगवान विष्णू दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात भगवान विष्णू दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. झोपेच्या दरम्यान  विविध प्रकारचे स्वप्न आपण बघत असतो. प्रत्येक स्वप्नाचा एक वेगळा अर्थ दडलेला असतो. स्वप्न ही आपल्या जीवनाच्या संबंधित पडत असतात. जर आपल्या पुढील जीवनामध्ये काहीतरी चांगल्या घटना घडणार असतील, तर त्याचे संकेत हे स्वप्न आपल्याला देण्याचे कार्य करत असतात आणि जर एखादी दुर्घटना घडणार असेल, एखादी वाईट घटना घडणार असेल, तर त्याचे संकेत देखील स्वप्नाद्वारे आपल्याला आधीच कळू शकतात. फक्त आपण त्या स्वप्नांचा अर्थ समजला पाहिजे, त्याचे संकेत समजून घेतले पाहिजे. स्वप्नामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती, रंगछटा दिसत असतात. तर काही जणांना स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशु-पक्षी व्यक्ती देखील दिसत असतात. तर काहीजण स्वप्नामध्ये भगवान विष्णू देखील दिसत असतात. मित्रांनो, ज्या व्यक्ती देवाची पूजा ही मनापासून करत असतात अगदी मन लावून भगवंताची आराधना करत असतात तर अशा लोकांना स्वप्नामध्ये देव देखील दिसत असतात.तर काहीजणांना स्वप्नामध्ये भगवान विष्णू यांचे दर्शन होत असते. असे लोक फार भाग्यवान समजले जातात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचा संगम हा खूप श्रेष्ठ मानला जात असतो, म्हणजेच दत्तावतार. भगवान विष्णूंच्या कथा तर तुम्ही ऐकलेल्या असतील. जेव्हा जेव्हा या सृष्टीवर या पृथ्वीवर राक्षसांनी अवतार धारण केलेला होता तेव्हा तेव्हा भगवान विष्णूंनी वेगवेगळ्या रूपात त्यांचा संहार देखील केलेला आहे, राक्षसांना नष्ट केलेले आहेत. भगवान विष्णूंनी अनेक रूपात अवतार धारण केलेले होते. जसे की, श्रीकृष्ण परशुराम, श्रीराम वगैरे. श्रीरामांचा अवतार, श्रीरामांची कथा ही तर सर्वांनाच माहित आहे आणि कृष्णाची देखील कथा हे सर्वजण जाणून आहेत. भगवान विष्णूंची महती ही न्यारीच आहे. असे म्हटले जाते की, ज्या ज्या ठिकाणी भगवान विष्णूंचे मनोभावे सेवा केले जाते आराधना केली जाते पूजा केली जाते त्या त्या ठिकाणी लक्ष्मी माता ही आपोआप येत असते लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होत असते. तर मित्रांनो तुम्हाला देखील स्वप्नामध्ये भगवान विष्णू दिसलेले आहेत का? जर तुम्हाला स्वप्नात भगवान विष्णू दिसलेले असतील तर त्यांना तुम्ही नेमके कोणत्या स्वरूपात बघितलेले होते? त्यावरून, तुम्हाला त्याचे शुभ व अशोक संकेत कळू शकतात.मित्रांनो आज आपण स्वप्नात भगवान विष्णू दिसणे शुभ की अशुभ या स्वप्ना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, स्वप्नात भगवान विष्णू दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

स्वप्नात भगवान विष्णू दिसणे शुभ की अशुभ.

अनेकांना स्वप्नात देवी देवता दिसत असतं तर काहीच राहणार स्वप्नात भगवान विष्णूंचाही अवतार दिसत असतो. तर मित्रांनो, स्वप्नात भगवान विष्णू दिसणे ,आपण त्यांची सेवा करताण दिसणे, आपण भगवान विष्णूंच्या मंदिरात जाणे, या सर्व स्वप्नांचा अर्थ नेमका काय असू शकतो? तर या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

वाचा  स्वप्नात पाण्याची टाकी दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात भगवान विष्णू दिसणे
स्वप्नात भगवान विष्णू दिसणे

स्वप्नात भगवान विष्णू दिसणे : Swapnat Bhagvan Vishnu Disne

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात भगवान विष्णू तुम्हाला दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. अगदी फार मोजकेच लोक असतील की, ज्यांना स्वप्नामध्ये भगवान विष्णूंचा अवतार दिसलेला असेल  त्यांचे दर्शन झालेले असेल. मित्रांनो जर तुम्ही असे स्वप्न बघितले असेल, तर याचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसात तुम्ही जे जे कार्य हाती घेतलेले असेल, तेथे कार्य यशस्वीपणे पूर्ण होणार आहेत  तुमचे मनोवांचीत फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्मिती होणार आहे. तुम्हाला उच्च स्थानावर पद मिळणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ देखील होणार आहे.

तुम्हाला भगवान विष्णूंचा फोटो दिसणे : Bhagvan Vishnucha Photo Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भगवान विष्णूंचा फोटो दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुमच्यावरील सर्व संकटे दूर होणार आहेत  तुमच्या वरील आर्थिक संकट दूर होणार आहे. तुमची आर्थिक प्रगती होणार आहे. तुम्ही सर्व कार्यात यशस्वी होणार आहात. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होणार आहे. जर असे स्वप्न एखाद्या व्यापाराला दिसले असेल, तर त्याचा व्यापार हा खूप मोठा मोठा होत जाणार आहे. त्याच्या व्यापारा मध्ये त्यांना भरपूर नफा मिळणार आहे.

भगवान विष्णूंचे मंदिर दिसणे : Vishnuche Mandir Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भगवान विष्णूंचे मंदिर दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात. भगवंताच्या सेवेत तुमचे मन रमणार आहे. धार्मिक कार्यात तुम्ही इतरांनाही सामील करून घेणार आहात. तुमच्या मनातील विचार हे स्वच्छ व सुंदर असणार आहेत.

वाचा  स्वप्नात काच दिसणे शुभ की अशुभ

विष्णूंची पूजा करताना दिसणे : Vishnuchi Pooja Krne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही सर्व कार्यांमध्ये यशस्वी होणार आहात. तुमच्या वरील सर्व संकटे दूर होणार आहेत. येणारा काळ हा तुमच्यासाठी सुखद असणार आहे. जर तुम्ही या आधी भगवान विष्णूंची सेवा करत होतात आणि मध्येच जर सेवा करणे सोडलेली असेल आणि अशा वेळेस जर तुम्हाला असे स्वप्न पडलेले असेल, तर याचा अर्थ असा की, तुम्ही पुन्हा भगवान विष्णूंच्या सेवेत रुजू झाले पाहिजेत. भगवान विष्णूंचे तुम्ही आराधना केली पाहिजे. त्यांची मनापासून सेवा केले पाहिजे. जेणेकरून, येणारा काळ हा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकेल. तुमच्या वरील संकटे नष्ट होतील.

तुम्हाला भगवान विष्णूंची मूर्ती दिसणे : Bhagvan Vishnuchi Murti Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भगवान विष्णूंची मूर्ती दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुमच्याकडून एखाद्या शुभकार्यास सुरुवात होणार आहे. येणाऱ्या दिवसात तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धीचा वास लाभणार आहे. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तुमच्यावरील सर्व संकटे दूर होणार आहेत.

भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोन्ही एकत्रित दिसणे : Vishnu Ani Lakshmi Donhi Ektrit Bghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता दोन्हीही एकत्रित दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचे दाम्पत्य जीवन हे सुखी, समाधानी होणार आहे. तुमच्या नात्यांमध्ये स्नेहसंबंध रूढ होणार आहेत.तुमच्यात प्रेम टिकून राहणार आहे. तुम्ही प्रत्येक कार्यामध्ये दोघांना सहकार्य करणार आहात. परिस्थिती कशीही असो, तुम्ही एकमेकांना साथ देणार आहात. एकमेकांना समजून घेणार आहात.

वाचा  स्वप्नात कुस्ती दिसणे शुभ की अशुभ

विष्णूंच्या हातात सुदर्शन चक्र दिसणे : Vishnuchya Hatat Sudarshan Chakr Pahne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भगवान विष्णूंच्या हातात सुदर्शन चक्र दिसलेले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही दिवसात तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात करणार आहात. त्यांच्यावर तुम्ही विजय मिळवणार आहात. तुमच्या प्रत्येक लढाईमध्ये तुम्ही त्यांना हरवणार आहात. त्यामुळे असे स्वप्न दिसणे,शुभ मानले जाते.

विष्णू सोबत शेषनाग देखील दिसणे : Vishnu Sobat Sheshnag Dekhil Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भगवान विष्णू सोबत शेषनाग दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्यावरचे मोठे संकट टळणार आहे. तुमच्यासोबत एखादी घडणारी दुर्घटना नष्ट होणार आहे. तुम्ही संकट मुक्त होणार आहात. तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात करणार आहात. प्रत्येक लढाईमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात.

भगवान विष्णूंची मूर्ती खंडित झालेली दिसणे : Vishnunchi Murti Khandit Hone

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भगवान विष्णूंची मूर्ती खंडित झालेली दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचे तुमच्या मित्रांसोबत अथवा तुमचे नातेवाईकांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमचे एखाद्या व्यक्तीशी भांडण होणार आहे. तुमचे नाते संबंध खराब होणार आहेत.

विष्णूंच्या हातात शंख दिसणे : Vishnuchya Hatat Shankh Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भगवान विष्णूंच्या हातात शंख दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तर तुम्हाला अचानक धनप्राप्ती होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. तुम्ही तुमच्या सर्व कार्यात सफल यशस्वी होणार आहात. जर तुम्ही व्यापार, व्यवसाय करत असाल, तर त्यामध्ये तुमचे मोठा फायदा होणार आहे. तुमचा व्यापार हा वाढत जाणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल,तर नोकरीमध्ये तुम्हाला उच्च स्तरावर पद मिळणार आहे. म्हणजेच तुमचे प्रमोशन होणार आहे. तुम्हाला पगार वाढ होणार आहे.

तर मित्रांनो, स्वप्नात भगवान विष्णू दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

….. धन्यवाद…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here