स्वप्नात लगोरी खेळताना दिसणे शुभ की अशुभ

0
234

 

नमस्कार मित्रांनो,झोपेच्या दरम्यान आपल्याला अनेक स्वरूपाची स्वप्ने पडत असतात. काही स्वप्न ही आपल्याला जशीच्या तशी आठवत असतात. तर काही स्वप्न ही आपल्याला झोपेतून जाग आल्यावर विसरून देखील जात असतो. मित्रांनो,  स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा एक विशिष्ट प्रकारचा अर्थ असतो. काही स्वप्न ही शुभ फळ देणारी असतात, तर काही स्वप्न ही वाईट फळ देणारी देखील असतात. स्वप्नांचा अर्थ देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्वप्नात लगोरी खेळताना दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत.

लहानपणापासून अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ खेळत आलेले असतात. मैदानी खेळ खेळण्यांमध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचा आनंद दडलेला असतो. मित्रांनो, मैदानी खेळ खेळल्यामुळे आपले आरोग्य हे निरोगी देखील राहते. मैदानी खेळ खेळल्यामुळे एक प्रकारे काम करण्याची रुची देखील वाढते. अनेक जण मैदानामध्ये लगोरी हा खेळ खेळणे देखील पसंद करत असतात. लगोरी म्हणजेच एकावर एक असे सात दगड रचले जातात. या खेळामध्ये पाच ते सात जणांची एक टीम असते. मित्रांनो, हा खेळ खूप प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. तुम्हालाही स्वप्नामध्ये तुम्ही लगोरी खेळताना अथवा तुम्हाला लगोरी हा खेळ दिसलेला आहे का? मित्रांनो, असे स्वप्न जर तुम्हाला पडलेले असेल, तर या स्वप्नाचा अर्थ देखील तुम्ही जाणून घेतला पाहिजे. चला तर मग स्वप्नात लगोरी खेळताना दिसणे, शुभ की अशुभ या अर्थ खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात लगोरी खेळताना दिसणे
स्वप्नात लगोरी खेळताना दिसणे

स्वप्नात लगोरी खेळताना दिसणे शुभ की अशुभ!

     काही जणांना स्वप्नामध्ये लगोरी खेळताना दिसत असते. जसे की स्वप्नात ते लगोरी रचताना दिसणे, स्वप्नात लगोरी खेळताना पडणे, स्वप्नात लगोरी हा खेळ जिंकताना दिसणे, स्वप्नातला लगोरी हा खेळ हरताना दिसणे,वगैरे स्वरूपाची स्वप्ने पडू शकतात, तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात वकील दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात लगोरी खेळताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही लगोरी खेळताना तुम्हाला दिसलेले असेल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसात तुम्ही तुमच्या कामाकडे खूप लक्ष देणार आहात. तुम्ही तुमचे काम अगदी नियोजन पद्ध रितीने करणार आहेत. तुम्ही व तुमचे सहकारी  टीमवर्क ने काम करणार आहात. त्यामुळे तुमच्या कार्यात अचूकता राहणार आहे. तुमचा आर्थिक फायदाही होणार आहे.

स्वप्नात तुम्ही लगोरी रचताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही लगोरी रचताना दिसलेले असेल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अगदी विचारपूर्वक कामांमध्ये निर्णय घेणार आहात. कुठलेही काम हे अगदी घाई गडबडीत न करता तुम्ही ते विचारपूर्वक निर्णय घेऊन केल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये चांगले यशही मिळणार आहे. तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची देखील चांगली साथ मिळणार आहे.

स्वप्नात तुम्ही लगोरी खेळ खेळताना जखम होताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात तुम्ही लगोरी खेळ खेळताना जखम होताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. तुमचे काम करताना तुम्ही अगदी सावधगिरी बाळगली पाहिजे. नाहीतर, तुमचे नुकसान देखील होऊ शकते. 

स्वप्नात तुम्ही लगोरी खेळ जिंकताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्न तुम्ही लोकरी खेळत जिंकताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की ज्या कामांमध्ये तुम्ही खूप मेहनत घेतली होती, परिश्रम केले होते, कष्ट केलेले होते, तर अशा कामात तुम्हाला चांगले मोठे यश मिळणार आहे. तुमची प्रगती होणार आहे. त्यामध्ये तुमचा आर्थिक फायदा देखील होणार आहे.

स्वप्नात तुम्ही लगोरी खेळ हारताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही लगोरी खेळ खेळताना हरताना दिसलेले असाल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या कामांमध्ये खूप प्रयत्न करूनही कष्ट करूनही तुम्हाला अपयश मिळणार आहे. परंतु, तुम्ही निराश न होता पुन्हा जिद्दीने कामाला सुरुवात केली पाहिजे. पुन्हा आत्मविश्वासाने कामाला लागले पाहिजे.

वाचा  स्वप्नात स्वतःला दुःखी बघणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्ही लगोरी खेळताना पडणे.

       स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही लगोरी खेळ खेळताना पडताना दिसलेले असेल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कामांमध्ये काही व्यक्ती अडथळे निर्माण करणार आहेत. अनेक अडचणी तुमच्या कार्यात निर्माण होणार आहेत. परंतु त्यांना न घाबरता, तुम्ही त्या अडथळ्यांवर मात केली पाहिजे. आत्मविश्वासाने काम पूर्ण केले पाहिजे.

स्वप्नात तुम्हाला इतर व्यक्ती लगोरी खेळ खेळताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्न तुम्हाला इतर व्यक्ती लगोरी खेळ खेळताना दिसले असेल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला इतर सहकाऱ्यांसोबत व्यक्तींसोबत  संघर्ष करावा लागणार आहे. तुमची कॉम्पिटिशन वाढणार आहे. त्यासाठी, तुम्ही खूप प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही तुमचे काम अगदी मन लावून केले पाहिजे. तुमच्यातील आत्मविश्वास वाढवला पाहिजे.

स्वप्नात तुम्ही लगोरी खेळ बघताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही लगोरी खेळ बघताना दिसलेले असाल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसात तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन असणार आहात. लवकरच तुम्ही एका नवीन शुभ कार्याला सुरुवात करणार आहात. तुम्हाला तुमचे मित्रही मदत करणार आहेत. मित्रांच्या सहकार्य मुळे तुम्ही तुमच्या कामांमध्ये अगदी कमी वेळेत सफल होणार आहात.

       मित्रांनो स्वप्नात लगोरी खेळताना दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कसे वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

             धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here