स्वप्नात मोबाईल दिसणे शुभ की अशुभ

0
348
स्वप्नात मोबाईल दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात मोबाईल दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. आपल्या शरीराचा थकवा जावा यासाठी आपण झोप घेत असतो. झोप घेतल्यामुळे आपल्याला बरे देखील वाटत असते. पुरेपूर विश्रांती घेतल्यामुळे एक प्रकारे शरीरात उत्साह निर्माण देखील होत असतो. मित्रांनो, झोपेच्या दरम्यान आपल्याला अनेक प्रकारचे स्वप्न पडत असतात. स्वप्न पडणे, हे तर आता स्वभाविकच झालेले आहे. झोप लागली म्हणजे स्वप्न ही हमखास पडत असतात. काही स्वप्न ही चांगल्या स्वरूपाची असतात, तर काही स्वप्न एकदम वाईट स्वरूपाची असतात. स्वप्नांना कशाचे बंधन नसते. अगदी स्वप्नामध्ये आपल्याला काही पण दिसत असते. कुठलाही घटनाक्रम दिसत असतो. मित्रांनो स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्नात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटा, आकृती, पशुपक्षी, प्राणी दिसत असतात. तर काही जणांना स्वप्नामध्ये मोबाईल देखील दिसत असतो.मित्रांनो, तुम्हालाही स्वप्नात मोबाईल दिसतो का? तुमच्या स्वप्नात तुम्ही मोबाईल बघितलेला आहे का? असे स्वप्न तुम्ही बघितले असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. कदाचित हे स्वप्न तुम्हाला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असावे. मोबाईल तर सर्वांनाच ठाऊक आहे. अगदी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोबाईलचा सर्रास वापर करत असतात. मोबाईल ही अशी वस्तू आहे, की ज्यामुळे आपले अनेक ऑनलाईन कामकाज होत असते. मोबाईल मुळे आपले अनेक प्रकारचे फायदे होत असतात. अनेक प्रकारचे काम सोपे होत असतात. जेणेकरून, आपल्या वेळेची बचतही होत असते. परंतु, मोबाईल मुळे अनेक प्रकारचे वाईट कामे ही होत असतात. त्यामुळे चांगले आणि वाईट हे आपल्या हातात असते. लहान मुलं तर अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईलवर गेम खेळत असतात. अर्थातच, मोबाईल मुळे त्यांच्या अभ्यासातून दुर्लक्ष होत असते. तसेच, आउटडोर चे गेम देखील खेळण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असते. म्हणून मोबाईल हा चांगलाही आहे आणि वाईटही आहे. हे ज्याच्या त्याच्या वापरण्यावर अवलंबून असते. काही वेळा आपल्या स्वप्नामध्ये मोबाईल दिसत असतो. बरेच जण मोबाईल चे स्वप्न पडल्यावर घाबरून जातात आणि विचार करत बसतात, की असे स्वप्न आपल्याला नेमके का तरी पडले असावे? तर मित्रांनो मोबाईलची स्वप्न पडल्यावर ते तुम्हाला नेमके कोणत्या स्वरूपात पडले होते? यावरून त्याचे शुभ व अशुभ संकेत आपल्याला कळू शकतात. तर मित्रांनो आज आपण स्वप्नात मोबाईल दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

स्वप्नात मोबाईल दिसणे शुभ की अशुभ.

मित्रांनो, तुम्हाला स्वप्नात मोबाईल दिसला असेल तर घाबरू नका. परंतु, तुम्ही मोबाईल हा कोणत्या स्वरूपात बघितला होता? त्यावरून तुम्हाला त्याचे शुभ व अशुभ संकेत कळू शकतात.

वाचा  स्वप्नात सूर्योदय दिसणे शुभ की अशुभ!
स्वप्नात मोबाईल दिसणे
स्वप्नात मोबाईल दिसणे

स्वप्नात मोबाईल दिसणे : Swapnat Mobile Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये मोबाईल दिसला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला एखादी मोठी खुशखबर मिळणार आहे. आनंदाची वार्ता तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे असे स्वप्न पडल्यावर तुम्ही आनंदी झाले पाहिजे.

मोबाईलवर कुणाशी तरी बोलताना दिसणे : Mobilevr Bolne

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्ही मोबाईलवर कुणाशी तरी बोलताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. मित्रांनो, या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. तुमचा व्यापार, व्यवसाय हा वाढणार आहे. त्यामध्ये भरपूर तुम्हाला फायदा होणार आहे.

तुमचा मोबाईल चोरीला जाणे : Mobile Chori Jane

स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्नामध्ये तुमचा मोबाईल हा चोरीला गेलेला तुम्हाला दिसलेला असेल, तर हे स्वप्न अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही काळामध्ये तुमचे जिवलग मित्र तुमच्या पासून दूर जाण्याची संभावना आहे. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या पासून दूर जाण्याची शक्यता आहे.

मोबाईलवर काम करताना दिसणे : Mobilevr Kam Karne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये तुम्हाला तुम्ही मोबाईलवर काम करताना दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचा व्यापार हा चांगला चालणार आहे. तुम्हाला नवीन मित्र मिळणार आहे आणि ते तुम्हाला प्रत्येक कामात साथ देणार आहे. तुमची मदत करणार आहे. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे.

मोबाईल हरवलेला दिसणे : Mobile Harvane

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये मोबाईल हरवलेला दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. मित्रांनो, या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमची जे मदतगार मित्र होते, जे तुम्हाला प्रत्येक कामात साथ देणारे होते ते तुमचे मित्र तुमच्या पासून दूर जाण्याची शक्यता आहे. असे स्वप्न पडल्यावर तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे.

वाचा  स्वप्नात टेबल दिसणे शुभ की अशुभ

मोबाईलची रिंग ऐकू येणे : Mobilechi Ring Aikne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये मोबाईलची रिंग ऐकायला आलेली असेल, मोबाईल वाजण्याचा आवाज ऐकलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला अशुभ वार्ता ऐकायला मिळणार आहे. अनेक संकटांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे. येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्या शत्रू हे तुम्हाला हानी पोहोचवणार आहे तुमचे नुकसान करणार आहे त्यामुळे तुम्ही असे स्वप्न पडल्यावर सावधानता बाळगली पाहिजे.

मोबाईल दुरुस्त करताना दिसणे : Mobile Durust Karne

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्ही मोबाईल दुरुस्त करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. मित्रांनो, या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचे जे नाते बिघडलेले होते ते तुम्ही पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न करत आहात. तुमच्या नातेवाईकांमध्ये जे मतभेद झालेले होते, जे गैरसमज झालेले होते, ते तुम्ही दूर करणार आहात. एक प्रकारे तुम्ही तुमचे नातेवाईकांचे तुमचे या व्यक्तींचे संबंध चांगले करणार आहात. त्यांची नाराजगी दूर करणार आहात.

तुम्ही मोबाईल खरेदी करताना दिसणे : Mobile Khredi Karne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये तुम्ही मोबाईल खरेदी करताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला लवकरच बडती मिळणार आहे तुमचा अचानक पगार वाढ होणार आहे. तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्मिती होणार आहे. तुमचं घरांमध्ये जे स्थान होतं नोकरीमध्ये जे स्थान होतं त्याहून तुम्हाला उच्च स्थान मिळणार आहे. असे स्वप्न पडल्यावर तुम्हाला भरपूर प्रकारचे फायदे होणार आहेत.

मोबाईल विकताना दिसणे : Mobile Vikne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये तुम्हाला तुम्ही तुमचा मोबाईल विकताना दिसलेले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्या घरातील सदस्य हे काहीसे नाराज होणार आहेत. तुमच्या घरातील आनंद हा कमी होणार आहे. कदाचित तुमच्या चुकीमुळे ही समस्या उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे प्रत्येक काम हे खबरदारीने केले पाहिजे. निर्णय हे विचारपूर्वक घेतले पाहिजे.

मोबाईल फुटणे : Mobile Futane

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये तुमचा मोबाईल हा तुम्हाला फुटलेला अवस्थेत दिसलेला असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच काही संकटांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. मित्रांनो हे स्वप्न जर तुम्हाला दोन-तीन वेळा पडलेले असेल तर हे स्वप्न पडल्यावर तुम्ही सावधान झाले पाहिजे सावध झाले पाहिजे. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी काम करण्यापूर्वी ते विचारपूर्वक केले पाहिजे. अचूक निर्णय घेतला पाहिजे. जेणेकरून, तुमच्या भविष्यातील होणारी हानी टाळू शकते.

वाचा  स्वप्नात भजन किर्तन दिसणे शुभ की अशुभ

एकाच वेळी भरपूर मोबाईल दिसणे : Ekach Veli Bharpur Mobile Disne

स्वप्न शास्त्रनुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये एकाच वेळी भरपूर मोबाईल दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला एक एक करून शुभ वार्ता कानी ऐकायला मिळणार आहे. तुमचे सर्व कार्य हे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे तुमच्या व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला लवकरच खुशखबर मिळणार आहे.

टच स्क्रीन वाला मोबाइल दिसणे : Touch Screen Vala Mobile Disane

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये टच स्क्रीन वाला मोबाइल दिलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला नवीन मित्र मिळणार आहे. त्या मित्रांमध्ये तुमची चांगली मैत्री जमणार आहे तुम्ही मौजमजा करणार आहे. तुमचे मित्र हे तुम्हाला प्रत्येक कामात साथ देणार आहे.

तुम्हाला मोबाईलचे कव्हर दिसणे : Mobileche Cover Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये मोबाईलचे कव्हर दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. मित्रांनो या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या कुटुंबावर अगदी जीवापाड प्रेम करतात. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेत असतात. त्यांच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा हट्ट पुरवत असतात. त्यांना  काय हवे, काय नको वगैरे सगळं बघत असतात. तुमचं कुटुंब सुखी कसे राहिल, याची तुम्ही जास्तीत जास्त काळजी घेत असतात आणि त्या दृष्टीने तुमचे कार्य करत असतात असे स्वप्न पडल्यावर तुम्ही आनंदी झाले पाहिजे.

दुसऱ्याचा मोबाईल चोरी करताना तुम्हाला दिसणे : Dusryacha Mobile Chori Kartana Tumhi Pahne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल चोरी करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. मित्रांनो, या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही स्वतःहून तुमच्या आनंदाला नजर लावत आहात. तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्मिती झालेली होती, त्यामुळे असे स्वप्न पडल्यास तुम्हाला हा संकेत मिळू शकतो की तुमच्या घरातील सदस्य हे नाराज होणार आहेत. तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांवर नजर ठेवली पाहिजे. त्यांच्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. असे स्वप्न पडल्यावर तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे.

स्वप्नात मोबाईल दिसणे, शुभ की अशुभ आपल्याला संकेत हे त्याच्या स्वरूपावरून आपल्या कळू शकतात, हे आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here