स्वप्नात मुलगा दिसणे शुभ की अशुभ

0
1448

 

नमस्कार मित्रांनो स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे अगदी लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पडतात. स्वप्नांचे नियम नसतात. स्वप्न हे कुठल्याही वेळी, कोणत्याही क्षणी  येऊन आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात. तसेच काही स्वप्न हे आपल्या मनातील भ्रम सुद्धा असतात. किंवा आपण ज्या गोष्टीचे सतत विचार करतो त्याबद्दलही पडू शकतात. तर मित्रांनो, स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये मुलगा दिसणे? मित्रांनो, मुलगा मुलगी यांची निर्मिती देवानेच केलेली आहे. तसेच मुलगा मुलगी एक समान असे मानले जाते. तसेच जर तुमच्या स्वप्नामध्ये मुलगा दिसत असेल, तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, मला स्वप्नात मुलगा का दिसला असेल? तसेच स्वप्नात मुलगा येणे हे शुभ असते की अशुभ असते? तर मित्रांनो, स्वप्नांचे अर्थ हे वेगवेगळे असतात. जसे की स्वप्नात स्वतःचा मुलगा दिसणे? स्वप्नात इतर कोणीतरी मुलगा दिसणे? त्यानुसार तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहे. चला तर मग जाणून घेऊया स्वप्नात मुलगा दिसणे हे शुभ असते की अशुभ असते.

स्वप्नात मुलगा दिसणे
स्वप्नात मुलगा दिसणे

स्वप्नात मुलगा दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात मुलगा दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला स्वप्नामध्ये मुलगा कुठे दिसतो? काय करतांना दिसतो? कशा अवस्थेत दिसतो? तसेच कोणाचा दिसतो? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात….! 

वाचा  स्वप्नात मकडी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात मुलगा दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न मध्ये जर एखादी स्त्री मुलगा जर स्वप्नामध्ये बघत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, लवकरच तिच्या जीवनामध्ये आनंददायी गोष्टी घडणार आहेत. तसेच एखादी अविवाहित मुलगी जर स्वप्नात मुलगा बघत असेल, तर त्याचा अर्थ होतो की, लवकरच तिच्या शुभविवाह ठरणार आहे. तिथे जोडीदार तिला लवकरच मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नामध्ये लहान मुलगा दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात लहान मुलगा दिसणे, अतिशय शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात लहान मुलगा दिसणे याचा असा अर्थ होतो की, लवकरच तुमच्या दाम्पत्या जीवनामध्ये मुलाचे, बाळाचे सुख लवकर मिळणार आहे. तसेच ज्यांना मुले असतील, ते त्यांच्या मुलांविषयी खूप सुखी समाधानी आणि आनंदी राहणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात मुलगा फाटक्या कपड्यांमध्ये दिसणे

मित्रांनो जर स्वप्नामध्ये मुलगा जर तुम्हाला फाटक्या कपड्यांमध्ये दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला नुकसान होणार आहेत. तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवायला हवेत. नाहीतर कर्जही घ्यावे लागू शकते. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नामध्ये अनोळखी मुलगा दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्न मध्ये जर तुम्ही स्वप्नात एखाद्या अनोळखी मुलाला बघून स्वप्नात घाबरून उठत असेल, तर ते स्वप्न मिश्र स्वरूपाचे मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, कोणीतरी नवीन व्यक्ती तुमच्या परिवारामध्ये येणार आहे किंवा व्यवहारांमध्ये तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीसोबत संपर्कात येणार आहेत, त्यामुळे कोणत्याही कामांची पडताळणी जरूर करावीत, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात मुलगा नाराज दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार स्वप्न मध्ये जर तुम्हाला एखादा मुलगा नाराज दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला जीवनामध्ये अपयशाचा सामना करावा लागणार आहे. तसेच तुम्ही कोणावरही लवकर विश्वास ठेवतात. त्यामुळे तुमची फसगत होऊ शकते. नुकसानदाय स्थिती होऊ शकते. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात आकाश दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नामध्ये मुलगा रडताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला एखादा मुलगा रडताना दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, काही काळात तुम्हाला काहीतरी नाराजगी मिळणार आहे. म्हणजेच तुमच्या तब्येतीवर काहीतरी परिणाम होणार आहे. किंवा काहीतरी दुखद बातमी तुम्हाला मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात मुलगा मारामारी करताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला एखादा मुलगा स्वप्नात मारामारी करताना दिसत असेल, तर ते स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या घरात वाद विवाद होऊ शकतात. मतभेद होऊ शकतात. किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात, किंवा जो बिझनेस, नोकरी करतात, त्यामध्ये तुम्हाला नुकसानदायक स्थिती बघावी लागू शकते. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नामध्ये मुलगा खुश दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला एखादा मुलगा खुश दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुमच्या जीवनात आनंददायी गोष्टी येणार आहेत. सुखी- समाधानी आयुष्य तुम्ही जगणार आहेत. तसेच अचानक धनलाभ होण्याचे संकेत ही संभावत आहे व तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या लवकर पूर्ण होणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात स्वतःचा मुलगा दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला स्वतःचा मुलगा दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत समाधानी आहेत आणि तुमची मुले भविष्यामध्ये मोठ्या स्थानावर व प्रगतीच्या दिशेने जाणार आहेत. तसेच तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालयला हवेत. असे संकेत हे स्वप्नात येते. 

चला, तर मग मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये मुलगा दिसणे हे शुभ असते की अशुभ असते त्याबद्दल काही माहिती आम्ही तुम्हाला सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

वाचा  स्वप्नात गवती चहा दिसणे शुभ की अशुभ

                       धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here