नमस्कार मित्रांनो. आपल्याला शांत झोप लागल्यावर आपण हमखास स्वप्न बघत असतो. कारण झोप लागल्यावर प्रत्येकाला स्वप्न पडत असतात. स्वप्नामध्ये आपण अगदी दूर दूरच्या ठिकाणावर फिरून येत असतो. काहीजण स्वप्नामध्ये तर चंद्रावर देखील जाऊन येत असतात. मित्रांनो स्वप्न ही दोन प्रकारचे असतात. काहींना स्वप्न हे चांगले प्रकारचे पडत असतात. तर काहींना एकदम वाईट स्वप्न पडत असतात. काही जणांना स्वप्न तर अशी पडतात की, ज्या स्वप्नांना बघून ते अगदी झोपेतून घामेघूम होऊन घाबरून उठत असतात. स्वप्नामध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या घटना बघत असतो. खरंतर आपण दिवसभरामध्ये ज्या गोष्टींचा जास्तीत जास्त विचार केलेला असतो, ज्या गोष्टी आपल्या नजरेसमोर घडलेल्या असतात, तर अशा घटना आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात. काही स्वप्नही आपल्याला वारंवार पडत असतात. स्वप्नामध्ये सारखे सारखे त्याच गोष्टी दिसत असतात. तर मित्रांनो, अशा स्वप्नांकडे आपण दुर्लक्ष न करता, त्यातील संकेत समजून घेतले पाहिजे. कदाचित असे स्वप्न हे आपल्याला आपल्या पुढील भविष्याच्या वाटचाली बद्दल काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असावीत. त्यामुळे आपण वेळीच सावध होऊ शकतो.अनेक जणांना स्वप्नामध्ये प्राणी दिसत असतात. विविध प्रकारचे प्राणी ते बघत असतात. स्वप्नामध्ये प्राणी दिसणे याचे तुम्हाला दोन संकेत कळू शकतात एक म्हणजे अशुभ व दुसऱ्या म्हणजे शुभ. खरं तर प्राण्यांवरून आपल्याला कळू शकते हे स्वप्न शुभ आहे की, अशुभ आहे. स्वप्नामध्ये तुम्ही नेमके कोणत्या प्रकारचे प्राणी बघितलेले असेल? आणि कुठे बघितले असेल? त्यावरूनच तुम्हाला चांगले वाईट संकेत करू शकतात. जर तुम्ही स्वप्नामध्ये प्राणी बघितलेले असतील, तर घाबरून जाऊ नका. कदाचित असे स्वप्न हे तुम्हाला तुमच्या पुढील भविष्याच्या वाटचाली बद्दल काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असावे. तुम्हाला तुमच्या स्वप्नात प्राणी दिसलेले असतील, तर ते नेमके तुम्ही कोणत्या स्वरूपात त्यांना बघितलेले होते? कुठल्या जागी बघितले होते? तर यावरून तुम्हाला शुभ व अशुभ संकेत कळू शकतात. तर मित्रांनो आज आपण स्वप्नात प्राणी दिसणे शुभ की अशुभ याबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेणार आहोत.
Table of Contents
स्वप्नात प्राणी दिसणे शुभ की अशुभ.
मित्रांनो तुम्ही स्वप्नात प्राणी बघितलेले आहेत काय? जर तुम्हाला स्वप्नात प्राणी दिसले असतील तर घाबरून जाऊ नका. स्वप्नामध्ये तुम्ही प्राणी हे नेमके कोण-कोणते बघितलेले आहेत? स्वप्नात तुम्ही प्राणी हे कोणत्या स्वरूपात बघितलेले आहेत? कुठल्या जागेवर बघितले आहेत? तर यावरून तुम्हाला शुभ व अशुभ संकेत कळू शकतात. याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.
सिंह दिसणे : Sinh Pahne
स्वप्न शास्त्रानुसार,जर तुम्हाला स्वप्नामध्ये सिंह हा प्राणी दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. सिंह हा जंगलाचा राजा आहे. या स्वप्नाचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला एखादे उच्च पद मिळणार आहे. तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळणार आहे. तुमचे जे अपूर्ण कामे राहिलेले होते ते लवकरच पूर्ण होणार आहे आणि यशस्वीरित्या पार पडणार आहेत.
स्वप्नात हत्ती दिसणे : Hatti Disne
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये हत्ती हा प्राणी दिसलेला असेल, तर हे चांगले संकेत देणारे स्वप्न मानले जाते. मित्रांना हत्ती हा मोठा असतो. त्याचे वजनही भरपूर प्रमाणात असते. हा प्राणी शाकाहारी असतो. या शब्दाचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही बलवान, ताकतवान होणार आहे. तुमचं पद वाढणार आहे आणि तुम्ही आनंदीत राहणार आहात.
लांडगा दिसणे : Landga Baghne
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये लांडगा हा प्राणी दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. मित्रांनो, लांडगा हा इतर प्राण्यांवर आक्रमक हल्ला करत असतो. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्यावर तुमचे शत्रू एखादे संकट टाकणार आहे. तुम्हाला हरवणार आहे. तुम्हाला एखादी हानी पोहोचवणार आहेत. तुमच्यावर तुमचे विरोधक, शत्रू हे भारी पडणार आहेत.
जिराफ दिसणे : Jiraf Pahne
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नामध्ये जिराफ प्राणी बघितला असेल, तर हे चांगले संकेत देणारे स्वप्न मानले जाते. मित्रांनो, जिराफ हा दिसायला आकर्षित असतो. सर्व प्राण्यांमध्ये हा उंच असतो. याची मान ही फार उंच असते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही ज्या संघर्षातून, संकटातून बाहेर पडलेले आहात, तर या कार्यावर लोक तुमच्यावर प्रभावित होणार आहेत. तुमच्याकडून शिक घेणार आहेत. तुमची कामगिरी बघून, कर्तुत्व बघून लोकांनाही तुमच्यासारखे बनावेसे वाटणार आहे.
उंट दिसणे : Unt Disne
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये उंट दिसलेला असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला शारीरिक कष्टाला सामोरे जावे लागणार आहे. लवकरच तुम्ही आजारी पडणार आहेत. शारीरिक पीडा तुम्हाला होणार आहे. शरीरासंबंधित तुम्हाला हानी पोहोचणार आहे.
वाघ दिसणे : Vagh Baghne
स्वप्न शास्त्रानुसार,जर तुम्ही स्वप्नामध्ये वाघ बघितलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. मित्रांनो, वाघाला बघता बरोबर सर्वजण थरथर कापत असतात. घाबरत असतात. वाघ हा त्याचे सर्व काम यशस्वीरीत्या पूर्ण करत असतो. तो कुठल्याही गोष्टींना घाबरत नसतो. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या हाती घेतलेले कार्य हे न डगमगता, न घाबरता एकदम आत्मविश्वासाने पूर्ण करणार आहेत. तुम्ही सर्व कामांमध्ये पुढे राहणार आहात. त्यामुळे लोक तुमची प्रशंसा करणार आहेत.
झेब्रा दिसणे : Zebra Disne
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये झेब्रा दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमची नवीन लोकांशी ओळख होणार आहे आणि ही लोक तुम्हाला प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कार्यामध्ये मदत करणार आहे. तुमची साथ देणार आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला ही लोक मदत करणार आहेत. त्यांची चांगली साथ मला मिळणार आहे. जेणेकरून, तुम्ही तुमचे हाती घेतलेले कार्य हे सर्व यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात आणि त्यामध्ये तुम्हाला मोठा फायदाही होणार आहेत. त्यामुळे तुम्ही खूप खुश राहणार आहात.
गेंडा दिसणे : Genda Disane
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये गेंडा दिसलेला असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. गेंडा हा अगदी खतरनाक प्राणी असतो. इतर प्राण्यांसमोर गेंडा येताच सर्व प्राणी पळ काढतात. त्याला घाबरून दूर दूरच पळतात. तर मित्रांनो, या स्वप्नाचा अर्थ असा की,तुम्ही तुमच्या सर्व कार्यांमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहेत. कुठलाही शत्रू तुमच्यावर विरोध करणार नाही. कारण तुम्ही प्रत्येक शत्रूवर भारी पडणार आहात. आणि तुमचे काम आहे तुम्ही यशस्वीरित्या पुढे नेणार आहात.
कांगारू दिसणे: Kangaroo Pahne
स्वप्न शास्त्रानुसार,जर तुम्हाला स्वप्नामध्ये कांगारू दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. मित्रांनो, कांगारू हा खूपच चंचल असतो. अगदी कमी वेळात तो त्याचे कार्य पूर्ण करत असतो. कांगारू हा इतर प्राण्यांपेक्षा अगदी फास्ट पळत असतो. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही तुमचे कार्य हे अगदी कमी वेळेत पूर्ण करणार आहात. कमी वयात तुम्हाला उच्च पदावर स्थान मिळणार आहे.
अस्वल दिसणे : Asval Bghne
स्वप्न शास्त्रनुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये अस्वल दिसलेला असेल,तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. अस्वल याला मनुष्यासारखे दोन हात दोन पाय असतात. स्वप्नात जर तुम्ही असेल बघितला असेल, तर हे चांगले मानले जात असते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अगदी संघर्ष करून, कष्टाची कामे करून, मेहनत करून यशस्वी होणार आहात. तुम्हाला तुमच्या कामांमध्ये पुढे जाऊन मोठा फायदा होणार आहे.
ससा दिसणे : Sasa Disne
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नामध्ये ससा बघितला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही जे काही कार्य हाती घेतलेले आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडीअडचण न येता यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला फायदाही होणार आहे. तुमच्या घरामध्ये प्रत्येक सदस्य हा आनंदी राहणार आहे. तुमचे नाते हे अगदी दृढ होणार आहेत. नात्यांतील दुरावा दूर होऊन प्रेम वाढणार आहे.
मित्रांनो, स्वप्नामध्ये जर तुम्ही विविध प्रकारचे प्राणी बघितले असतील तर घाबरू नका. प्राण्यांच्या वैशिष्ट्यावरून तुम्हाला त्याचे चांगले व वाईट संकेत कळू शकतात. हे तुमच्या पुढील भविष्याच्या वाटचालीबद्दल काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्नही करत असतील. स्वप्नामध्ये प्राणी दिसल्यावर तुम्हाला कोणत्या प्रकारचे संकेत मिळू शकतात, हे आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहे.
तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.
धन्यवाद.