स्वप्नात शनिदेव दिसणे शुभ की अशुभ

0
540

 

नमस्कार मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. बऱ्याच वेळेला असे होते ज्यावेळी आपण झोपतो, त्यावेळी आपल्याला आपल्या झोपेमध्ये चित्र विचित्र आकृत्या दिसतात त्यांना स्वप्न असे म्हणतात. मित्रांनो, स्वप्न हे आपल्याला खूप काही दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. तर ते म्हणजे स्वप्नामध्ये शनिदेव दिसणे. मित्रांनो, शनि देवाचे नाव घेतले की सगळे घाबरतात पण खरे सांगू शनिदेव हा आपला शत्रू नसून तर आपल्या मित्र आहेत. जो चुकीच्या मार्गाला जातो, त्याला त्याच्या मार्गावर आणण्यासाठी शनिदेव प्रयत्न करत असतात. शनि देवाला न्याय देवता असे म्हणतात. तसेच चांगले कर्म करणाऱ्यांना ते नेहमी चांगलीच फळ देतात, तसेच जो व्यक्ती चुकीचे काम करतो, किंवा कोणाला नुकसान, अडथळे आणण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर शनीची वक्री नजर पडू शकते.  मग त्याला त्याच्या जीवनामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो, तसेच ज्याच्या त्याच्या राशीनुसार जन्म नक्षत्र नुसार काहीजणांना शनिदेवाचा सामना करावा लागू शकतो. शनि देवाला सूर्यपुत्र असे म्हणतात. जर मित्रांनो तुमच्या स्वप्नामध्ये शनिदेव दिसत असेल, तर तुम्ही खूप घाबरून जातात. मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, मला शनिदेव का दिसले? तसेच स्वप्नामध्ये शनिदेव दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला तर मग जाणून घेऊयात स्वप्नात शनिदेव दिसणे हे शुभ असते की अशुभ असते.

स्वप्नात शनिदेव दिसणे
स्वप्नात शनिदेव दिसणे

स्वप्नात शनिदेव दिसणे, शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये शनिदेव दिसणे हे मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार तुम्हाला स्वप्नामध्ये शनिदेव कुठे दिसले? कोणत्या अवस्थेत दिसले? कशाप्रकारे दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला जाणून घेऊयात… ! 

वाचा  स्वप्नात मेथीची भाजी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात शनिदेव दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये शनिदेव दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, लवकरच तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी मिळणार आहे. किंवा चांगली नोकरी किंवा चांगल्या व्यवहारांमध्ये तुम्ही गुंतणार आहे आणि त्यात तुम्हाला सुख, समाधान लागणार आहे. असे संकेत या स्वप्नात येते. 

स्वप्नात शनि देवाची मूर्ती दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही शनि देवाची मूर्ती बघत असाल, तर ते मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. म्हणजेच त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला आनंददायी गोष्टी मिळतीलच तसेच त्यासोबत तुम्हाला काही  नुकसानदायक स्थिती मध्ये जावे लागू शकते. हे तुमच्या ग्रहणानुसार अवलंबून आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात शनि देवाचे मंदिर दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्न मध्ये जर तुम्हाला शनि देवाचे मंदिर दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तसेच नोकरीमध्ये प्रमोशन किंवा वर्चस्व मिळू शकते. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात शनिदेव रागात दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला शनिदेव रागात दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला त्रासदायक स्थिती बघावी लागू शकते. तसेच व्यवहारांमध्ये ही नुकसान होऊ शकते. आर्थिक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते. तसेच तुम्ही जे काम करत आहे, त्यामध्ये चुका करत आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात शनिदेव आशीर्वाद देताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला शनिदेव आशीर्वाद देताना दिसत असतील, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला शनि देवाची कृपा होणार आहे. तसेच तुमच्या जीवनातील ताण-तणाव, संकट, आर्थिक नुकसान हे कमी होऊन, तुम्ही सुखी समाधानी आयुष्य जगणार आहे. असे संकेत स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात पागल दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्ही शनि देवाला तेल चढवताना दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही शनि देवावर तेल चढवताना दिसत असाल, तर ते मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये अडचणी तान-तणाव चालू असतील, असे वाटत असेल आणि शनि देवावर तुम्ही ते चढवताना दिसत असाल तर त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही शनि देवाची पूजा करायला हवी, देवावर दर शनिवारी तेल चढवायला हवेत. असे संकेत देते. 

स्वप्नात तुम्ही शनि देवाची पूजा करताना दिसणे

मित्रांनो स्वप्नात शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही शनि देवाची पूजा करताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रगतीच्या दिशेने जाणार आहेत. तसेच तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहे. सुखाचे दिवस तुम्ही लवकरच अनुभवणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये शनिदेव दिसणे हे शुभ असते की अशुभ असते त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

                         धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here