स्वप्नात विवाह स्थळ दिसणे शुभ की अशुभ!

0
843

 

नमस्कार मित्रांनो. स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संकेत लपलेला असतो. एक विशिष्ट प्रकारचा अर्थ लपलेला असतो. झोपेच्या दरम्यान आपल्या अनेकविध स्वप्न पडत असतात. या स्वप्नांच्या दुनियेत आपण रममान होत असतो. काही स्वप्न ही चांगली स्वरूपाची पडत असतात, तर काही स्वप्न ही अगदी भयंकर रूप धारण करणारी देखील असतात. आपल्या मनात जे विचार आलेले असतात, ज्या घटना आपण बघितलेल्या असतात, तर त्या स्वरूपाचे देखील आपल्याला स्वप्न पडू शकतात. मित्रांनो, काही जणांना तर स्वप्नामध्ये विवाह स्थळ देखील दिसत असतो. जर आपण एखाद्या ठिकाणी लग्नाला गेलेला असेल अथवा तुमच्या मित्राचे अथवा तुमच्या नातेवाईकांचे कोणाचे तरी लग्न झालेले असेल, तर अशा स्वरूपाचे स्वप्न तुम्हाला पडू शकते. मग अशावेळी स्वप्नात तुम्हाला स्वतःचं लग्न होताना दिसणे, स्वप्नामध्ये विवाह स्थळ दिसणे वगैरे स्वरूपाची स्वप्न पडू शकतात. मित्रांनो,आज आपण स्वप्नात विवाह स्थळ दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ जाणून घेणार आहोत. चला तर मग, या स्वप्नाचा नेमका अर्थ काय असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात विवाह स्थळ दिसणे
स्वप्नात विवाह स्थळ दिसणे

स्वप्नात विवाह स्थळ दिसणे शुभ की अशुभ!

    काही व्यक्तींना स्वप्नात विवाह स्थळ देखील दिसत असते तसेच स्वप्नात त्यांचे स्वतःच लग्न होताना दिसणे, स्वप्नात स्वतः लग्नाचा जोडा घातलेला दिसणे, स्वप्नात नवरदेव नवरी सात फेरे घेताना दिसणे, स्वप्नात नवरी दिसणे स्वप्नात नवरदेव दिसणे, स्वप्नात अक्षता पडताना दिसणे वगैरे स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात हिरवी साडी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात विवाह स्थळ दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला विवाह स्थळ दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या घरात शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे. तुमचे अथवा तुमच्या नातेवाईकातील कुणाचे तरी लग्न ठरण्याची शक्यता आहे. येणारे दिवस हे तुमच्यासाठी आनंददायी असणार आहेत.

स्वप्नात तुम्ही स्वतः लग्नाचा जोडा घातलेला दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही स्वतः लग्नाचा जोडा घातलेला तुम्हाला दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. जर हे स्वप्न एखाद्या विवाहित व्यक्तीने बघितलेले असेल, तर त्याचे दांपत्य जीवन हे सुखी समाधानी होणार आहे हा संकेत यातून मिळतो आणि हे स्वप्न जर एखाद्या अविवाहित व्यक्तीने बघितलेले असेल, तर लवकरच त्याचे लग्न जुळण्याची शक्यता आहे त्याच्या घरात शुभ कार्य घडणार आहे हा संकेत यातून मिळू शकतो.

स्वप्नात तुम्हाला नवरदेव नवरी नटून थटलेले दिसणे.

    स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्न तुम्हाला नवरदेव नवरी हे सजलेले धजलेले दिसलेले असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता आहे.

स्वप्नात लग्नात तुमच्या अंगावर अक्षता पडताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात लग्नात तुमच्या अंगावर अक्षता पडताना तुम्हाला दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. तुम्हाला अचानक धनालाभ होणार आहे. तुमची आर्थिक प्रगती मजबूत बनणार आहे.

स्वप्नात तुम्हाला नवरी लग्नाच्या जोडात दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला नवरी ही लग्नाच्या जोडात दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला मोठी खुशखबरी मिळणार आहे. लवकरच तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी होणार आहात.

वाचा  स्वप्नात गरुड दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्हाला नवरदेव नवरी सात फेरे घेताना दिसणे.

    स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला नवरदेव नवरी सात फेरे घेताना दिसलेले असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये अपयश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे कामांमध्ये निर्णय घेताना योग्य विचारपूर्वक घेतले पाहिजे. वरिष्ठ मंडळींचे देखील सल्ला घेतला पाहिजे.

स्वप्नात तुम्हाला लग्नाच्या वस्तू दिसणे.

      स्वप्न शासनुसार जर स्वप्नात तुम्हाला लग्नाच्या भरपूर वस्तू दिसलेल्या असतील, तर हे चांगले स्वप्न मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमचे विरोधक तुमच्या विरोधात काहीतरी काम करणार आहेत. तुमचे विरोधक तुमच्यावर भारी पडणार आहे. तुमची फसवणूक करणार आहेत.

स्वप्नात तुम्हाला बारात दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला बारात दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तुम्ही आजारी पडणार आहात. असे स्वप्न दिसताच तुम्ही पूर्वीपेक्षाही तुमच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे.

स्वप्नात तुमचे स्वतःचे पुन्हा लग्न होताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात तुम्हाला तुमचे स्वतःचे पुन्हा लग्न होताना दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्या दांपत्य जीवनात भांडण होण्याची शक्यता आहे. तुमचे मतभेद होणार आहेत. वाद विवाद होण्याची शक्यता आहे.

     मित्रांनो, स्वप्नात विवाह स्थळ दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

       धन्यवाद.

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here