स्वप्नात गुरुचरित्र दिसणे शुभ की अशुभ

0
827
स्वप्नात गुरुचरित्र दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात गुरुचरित्र दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. सकाळी उठल्यावर प्रथम आपण स्नान करून देवाच्या आराधना करत असतो. अनेक व्यक्तींना सकाळी उठल्यावर स्नान झाल्यावर देवाच्या आराधना करायची सवय असते. देवाचे मुख बघितल्याशिवाय काहीजण तर घराबाहेरही पडत नाहीत. असे म्हटले जाते की, देवाची पूजा केल्यावर, आराधना केल्यावर आपले मन शांत राहते. मनात शुद्ध विचार येत असतात. तसेच, अनेक तणावापासून देखील आपण दूर राहतो आणि असे अनेकांच्या बाबतीत घडतही असते. स्वप्नात गुरुचरित्र दिसणे हे स्वप्न आधात्मिक स्वरूपाचे मानले जाते.

मित्रांनो काहीजण देवाची भक्ती तर एवढी मनापासून करतात, आराधना एवढी करतात की त्यांना स्वप्नातही देवी देवता दिसू लागतात. काहीजण तर अनेक धार्मिक ग्रंथ वाचन करत असतात. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्नात गुरुचरित्र दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत.

वर्षाभरामध्ये काही विशिष्ट वेळा अशा ठरलेल्या असतात की, ज्या वेळेस मंदिरामध्ये, मठामध्ये अथवा केंद्रामध्ये पारायण केले जात असते. तर काहीजण स्वतःहून घरी पारायण करत असतात. पारायण म्हणजे एक ग्रंथ हा नियमित म्हणजे सात दिवस वाचला जात असतो. ग्रंथ मोठा असेल तर त्यानुसार तसे दिवस ठरवलेले असतात

मित्रांनो, गुरुचरित्राचे पारायण हे देखील अनेक लोक करत असतात. काही जण इतके भक्तीभावाने करतात मनापासून करतात की, त्यांना स्वप्नात देखील गुरुचरित्र दिसू लागते. मित्रांनो तुम्हाला स्वप्नात गुरुचरित्र दिसलेले आहे का जर दिसली असेल तर त्याचा नेमका काय अर्थ असू शकतो हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. कारण, प्रत्येक स्वप्नामध्ये एक विशिष्ट प्रकारचा अर्थ दडलेला असतो. एक संकेत लपला असतो जे आपण जाणून घेतले पाहिजे. चला तर मग स्वप्नात गुरुचरित्र दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात गुरुचरित्र दिसणे शुभ की अशुभ!

       काही व्यक्तींना स्वप्नामध्ये गुरुचरित्र दिसत असते. जसे की, स्वप्नात गुरुचरित्र ग्रंथ घेताना दिसणे? स्वप्नात गुरुचरित्राचे पारायण करताना दिसणे? गुरुचरित्राच्या पारायण ला जाताना दिसणे? स्वप्नात तुम्हाला कोणीतरी गुरुचरित्र ग्रंथ देताना दिसणे? वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात आई समई लावताना दिसणे शुभ की अशुभ !

स्वप्नात गुरुचरित्र दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला गुरुचरित्र दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्ही अध्यात्मिक मार्गाला लागणार आहात. तुम्ही देवाची आराधना भक्ती भावने करणार आहात. तुमच्यावर गुरूंची कृपा राहणार आहे तुमच्यावरील संकटे दूर होणार आहेत.

स्वप्नात तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ घेताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ घेताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या घरा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होणार आहे. तुम्ही गुरूंच्या सेवेला लागणार आहात. येणारे दिवस हे तुमच्यासाठी सुखद राहणार आहेत तुम्ही संकट मुक्त होणार आहात.

स्वप्नात तुम्ही गुरुचरित्राचे पारायण ला बसताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला बसताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्ही संकट मुक्त होणार आहात. टेन्शन मुक्त होणार आहात. तुमची अडकलेली कामे लवकरात लवकर पुढे जाणार आहेत. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तरी तर तुम्हाला नोकरी मिळणार आहे.

स्वप्नात तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ भेट म्हणून देताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ हा भेट म्हणून देताना कोणीतरी दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्यावरचं मोठ संकट, गंडांतर टळणार आहे. तुम्ही नित्यनियमाने गुरुचरित्राची सेवा केली पाहिजे. तुमच्या गुरूंची सेवा केली पाहिजे. नियमित नित्य सेवा केली पाहिजे.

स्वप्नात तुम्ही गुरुचरित्र पारायण ला जाताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही गुरुचरित्र पाहायला जाताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात लवकरच तुम्ही आध्यात्मिक मार्गाला लागणार आहात. नित्य नियमाने तुम्ही गुरूंची सेवा करणार आहात. इतरांनाही अध्यात्मिक मार्ग दाखवणार आहात. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होणार आहे.

वाचा  स्वप्नात मोर दिसणे शुभ की अशुभ

स्वप्न तुम्हाला खूप सारे गुरुचरित्र ग्रंथ दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्हाला खूप सारे गुरुचरित्र ग्रंथ दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. ह्या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचे पुढील येणारे भविष्य हे सुखद राहणार आहेत. तुम्ही संकट मुक्त होणार आहात. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत. गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे.

स्वप्नात तुम्हाला मंदिरात गुरुचरित्र पारायण दिसणे

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्हाला मंदिरामध्ये गुरुचरित्र पारायण चालू असताना दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये रुची निर्माण होणार आहे. तुम्ही नियमितपणे न चुकता नित्य सेवा करणार आहात. तुम्ही अन्नदान करणार आहात  गरजवंतांना मदत करणार आहात.

स्वप्नात तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ इतरांना भेट म्हणून देताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही इतरांना गुरुचरित्र ग्रंथ भेट म्हणून देताना दिसलेले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांत तुम्ही सामाजिक कार्यात सहभाग घेणार आहात. गुरु सेवेचे महत्त्व इतर लोकांना पटवून देणार आहात. तुमच्यावर गुरूंची कृपा राहणार आहे.

स्वप्नात तुम्ही घरी गुरुचरित्र पारायण करताना दिसणे.

    स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही घरी गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी देवाची विनंती करणार आहात. तुम्ही अनेक समस्यांनी घेरलेले आहात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. येणाऱ्या काळात तुमच्या समस्या या दूर होणार आहेत तुम्ही संकट मुक्तही होण्याची शक्यता आहे.

      मित्रांनो, स्वप्नात गुरुचरित्र दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नांचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

वाचा  स्वप्नात मेहंदी दिसणे शुभ की अशुभ

        धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here