नमस्कार मित्रांनो. प्रत्येक ऋतूनुसार म्हणजेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूनुसार आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरते. जेणेकरून, आपले आरोग्य निरोगी राहू शकेल. मित्रांनो, सध्या आता पावसाळा ऋतू सुरू आहे. पावसाळा हा ऋतू लागताच अनेक आजारांना सुरुवात होत असते. पावसाळ्यामुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाणही वाटत असते. अनेक जणांना तर बाहेर ऑफिस साठी कामाला जावे लागत असते. त्यामुळे आपण आपल्या शरीराचे अवयवांची काळजी देखील योग्य रीतीने घेतली पाहिजे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचत असते आणि या पावसाच्या पाण्यातून, डबक्यातून आपल्याला चालत जावे लागत असते. मित्रांनो, हे पाणी अस्वच्छ असते. गढूळ पाण्यातून, चिखलातून आपण चालत गेल्यामुळे आपल्या पायांना या अस्वच्छ पाण्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे, आपण आपल्या पायांकडे लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून, आपल्याला पायांना इन्फेक्शन होणार नाही. इन्फेक्शन झाल्यामुळे पायांच्या बोटांमध्ये चिखल्या होत असतात. त्यामुळे, आपण आपले पाय पावसाळ्याच्या दिवसातही वेळोवेळी कोरडे ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पावसाच्या पाण्यामुळे अनेकांना पायाच्या बोटांमध्ये चिखल्या होत असतात. पावसाळ्याच्या पाण्यामुळे आपल्या पायाच्या बोटाला चिखल्या होऊ नयेत, यासाठी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो आज आपण, पायाच्या बोटात चिखल्या होऊ नयेत,काय काळजी घ्यावी. याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, पावसाळ्यात पायाच्या बोटात चिखल्या होऊ नयेत, यासाठी आपण कुठल्या प्रकारची विशेष काळजी घेतली पाहिजे? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!
पावसाळ्यात पायाच्या बोटात चिखल्या होऊ नयेत यासाठी आपण घ्यावयाची काळजी:-
पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचल्यामुळे अनेक वेळा आपल्याला पायांना इन्फेक्शनच्या धोका निर्माण होत असतो. तर मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसात देखील आपण आपल्या पायांचे विशेष काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्याच्या पाण्यामुळे अनेक वेळा आपल्या पायाच्या बोटात चिखल्या होत असतात. तर या चिखल्या होऊ नयेत, त्यासाठी आपण विशेष कोणते प्रकारचे काळजी घेऊ शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!
- सर्वप्रथम, मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसात आपण पावसाळ्याच्या ऋतुला सुटेबल होईल अशीच प्रकारची चप्पल वापरले पाहिजे.
- आपण पायात घालणारे बूट, चप्पल, अथवा सॅंडल ही अगदी घट्ट नसावीत. पावसाळ्याच्या दिवसात आपण विशेष करून आपल्या पायांसाठी घट्ट चप्पल बूट न वापरता थोडे सैल चपला, बूट अथवा सॅंडल वापरले पाहिजेत.
- आजकाल तर बाजारात पावसाळ्याच्या या विशेष ऋतूसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चपला शूज निघालेले आहेत. तर अशा प्रकारचे शूज, चपला आपण वापरल्या पाहिजेत. जेणेकरून, आपल्या पायाच्या खाली जास्तीत जास्त पाणी साचून राहणार नाही.
- ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा, त्यावेळी चप्पल अथवा शूज काढून ठेवले पाहिजेत व तुमचे पाय कोरडे केले पाहिजे. जेणेकरून, तुमच्या पायांना चिखल्या होणार नाही.
- पावसाळ्याच्या पाण्यात बराच वेळ आपले पाय भिजत असतात. त्यामुळे पायांना भेगा जाऊन त्यामध्ये माती साचत असते म्हणून आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. घरी गेल्यावर कोमट पाणी एका भांड्यात घेऊन त्यामध्ये पाय साधारण दहा ते पंधरा मिनिटे बुडवावे त्यामध्ये तुम्ही लिंबू देखील पिळून टाकू शकतात. त्यामुळे तुमच्या पायातील साचलेले बारीक मातीचे कण व पायाची घाण निघून जाण्यास मदत होऊ शकते.
- कोमट पाण्यातून पाय स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या पायाला खोबरेल तेलाने पाच मिनिटे मालिश केली पाहिजे. यामुळे तुमच्या पायाला एक प्रकारे मॉइश्चरायझर मिळत असते.
- पावसाळ्याच्या पाण्यामुळे जर तुमचे पाय हे लालसर झाले असतील, तुमच्या पायाच्या बोटांमध्ये जर लालसरपणा तुम्हाला जाणवत असेल तर अशा वेळेस तुम्ही अँटि फंगल पावडर लावावी. जेणेकरून होणारे इन्फेक्शन वेळीच थांबू शकते. अँटी फंगल पावडर ही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देखील घेऊ शकतात.
- मित्रांनो, पावसाच्या पाण्यामुळे तुमच्या पायांमधील जर स्किन ही भिजली असेल, पांढरी झालेली असेल, तर ती तुम्ही तसेच राहू द्यावी तिला काढण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यामुळे तुमचे इन्फेक्शन वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि परिणामी पायांच्या पोटात चिखल्या होण्याचे प्रमाण वाढेल. त्या ठिकाणी तुम्ही पावडर टाकू शकतात.
- अनेक जन पार्लरमध्ये जाऊन मॅनिक्युअर पेडिक्युअर करत असतात. त्यामुळे हाताची व पायांच्या बोटांची विशेष काळजी घेतली जात असते. तर मित्रांनो, पावसाळ्यात देखील तुम्ही पेडिक्युअर करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून, तुमच्या पायाची स्वच्छता राखता येईल.
- पायाच्या बोटात चिखल्या होऊ नयेत, त्यासाठी तुम्ही नियमितपणे शूज न वापरता अधून मधून पावसाळी चप्पल देखील वापरली पाहिजे. जेणेकरून, तुमचे पाय कोरडे होण्याचे प्रमाण वाढेल. परिणामी, तुमच्या पायांच्या बोटांचे इन्फेक्शन होण्यापासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते.
मित्रांनो, पावसाळ्यात विशेष करून आपण पायांच्या बोटांची काळजी जास्तीत जास्त घेतली पाहिजे. कारण, या दिवसांमध्ये पायाच्या बोटांमध्ये चिखल्या होण्याचे प्रमाण वाढत असते. पावसाळ्याला सूटेबल असे आपण सँडल्स व चप्पल वापरले पाहिजे. तसेच, आपल्या त्याप्रमाणे तुम्ही नियमित शूज न वापरता अधून मधून सॅंडल देखील वापरली पाहिजे. पावसाळ्यात नियमित शूज वापरल्यामुळे पाय थोडेही कोरडे न राहता भिजलेले राहू शकतात. परिणामी, पायाला लवकर चिखल्या होण्याचे प्रमाण हे वाढते. म्हणून आपण आपले पाय कोरडे होण्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आपण पावसाळ्याच्या दिवसात पायाच्या बोटात चिखल्या होऊ नयेत, यासाठी आपण कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे, याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे.
मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.
धन्यवाद.