नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पलंगावर बसून जेऊ नये असे का म्हणतात लहानपणी माझी एक सवय होती, मी, कधीही जेवताना किंवा कधीही काही खायचे असेल, तर मी पलंगावर बसून खायची. त्यावेळी मला आई फटकायची म्हणायची, की पलंगावर बसून जेवण करायचे नाही, त्यावेळी मला आईचा खूप राग यायचा, आणि म्हणायची असे का? की पलंगावर बसून जेवू नये, तर त्या वेळी माझी बुद्धी लहान, त्यामुळे मला काही समजायचे नाही. जसी मोठे झाली, तसे मला सगळे समजायला लागले, की पलंगावर बसून जेवणे, म्हणजे आजारपण आपल्या अंगावर आणणे, आणि आत्ताच्या या धावपळीच्या युगात आपण बघतोच आहे, कोणाला एका जागेवर बसूनही जेवायची सवय नाही. कोण कुठे बसणार, कोण कुठे, आता डायनिंग टेबलची सिस्टीम झालेली आहे. लोक डायनिंग टेबलवर बसून, जेवण करतात. पण ते योग्य नाही.
जेवण करताना नेहमी मांडी घालून जेवण करावे. म्हणजे आपल्या पोटाचे स्नायू हे तानले जाऊन, आपल्याला अन्न पचण्यास लवकर सोपे जाते, तसेच अन्न हे परब्रह्म असते. आपण त्याचं आदर करायला हवा, तसेच पलंगावर बसून जेवल्यास, काय होऊ शकते, चला तर मग जाणून घेऊयात!
Table of Contents
पलंगावर बसून जेवल्यास काय होते?
पलंगावर बसून जेवल्यास, आजारी असल्यासारखे वाटते. जर कोणी पलंगावर जेवण करत असेल , तर ते त्या अन्नाचा अपमान करतात. शिवाय ज्योतिष शास्त्राप्रमाणे राहूचा अपमानही होतो, पूर्वीच्या काळी तर लोक जेवताना घर शेणाने सारवून, तेथे रांगोळी काढून, ताटात पंचपक्वान्न देऊनआपल्याला जेवायला बसायला सांगायचे, त्या जेवणामध्ये भाजी, चपाती, डाळ, भात, कडधान्य, गोडाचा पदार्थ राहायचा. त्यामुळे त्यांचे आरोग्यही उत्तम होते, व ते निरोगी होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अन्न हे परब्रह्म असते. आणि पलंगावर बसून जेवले, तर तुम्ही आपल्या अन्नाचा अपमान करतात, शिवाय आताच्या जेवणामध्ये जंकफूड, मैदा युक्त पदार्थ, चायनीज, असे पदार्थ खातात. तेही डायनिंग टेबल वर उभे राहिल्या राहिल्या धावपळीत जेवण करतो, व जेवताना टीव्ही बघतो. आपले लक्ष आपल्या जेवणात राहत नाही. त्यामुळे आपण सारखे आजारी पडतो. आणि आपले वजनही वाढु शकते. व आपण आजाराला आमंत्रण देऊ शकतो.
आपण पलंगावर बसून जेवण करतो, व किती अन्न उष्टे पाडतो, आपण बळीराजा शेतकरयाचा एक प्रकारे अपमान करतो, कारण तो एका दाण्यासाठी किती मेहनत घेतो.
तसेच पलंगावर बसून जेवल्याने, घरातील लक्ष्मी ही नाराज होते, व आपल्या घरात लक्ष्मीचा तुटवडा होतो. असे पूर्वीच्या लोकांचे म्हणणे होते.
तसेच शास्त्रीय व वैज्ञानिक कारणानुसार, जर तुम्ही पलंगावर बसून जेवत असाल, तर आपण ज्या पलंगावर जेवतो, त्या जागेवर आपण झोपतो, तसेच आजारी असल्यास, त्या पलंगावर झोपलेले असल्यामुळे, ही सूक्ष्म किटाणू आपल्या बेडवर असू शकतात. आपल्या अंगावरील किटाणू त्या पलंगावर पडतात, आणि आपण पलंगावर बसून जेवत असल्यास, ते किटाणू आपल्या अन्नपदार्थात पडून, आपण आजारांना आमंत्रण देणे होय असे म्हणतात. शिवाय, पलंगावर जेवल्यामुळे आपल्याला अन्नपचन व्यवस्थित होत नाही, पोट गच्च भरल्या सारखे वाटते, आणि आपले यकृत ते व्यवस्थित काम करत नाही, खाली बसल्यावर आपली, सुखासन मध्ये स्थिती राहते, आणि खालची जागा कडक असल्यामुळे, आपल्याला त्याची जाणीव राहते व आपले शरीर सुदृढ राहते.
कोणत्या अवस्थेत बसून जेवण करावे?
आता तुम्ही म्हणाल, की पलंगावर बसून जेवण करू नये, मग जेवण करताना नेमके कोणत्या अवस्थेत असावे? तर जेवण करताना नेहमी सुखासन मध्ये बसले जाते. त्यामुळे आपल्या मनाची एकाग्रता वाढते. शिवाय आपण जे खातो ते आपल्याला पचण्यास मदत मिळते.
सुखासनात बसून जेवल्यामुळे आपली पाठ ताठ राहते, व आपली अन्ननलिका सरळ राहते, आपण जे खातो ते पचण्यास मदत मिळते.
खाली बसून जेवल्यास कोणते फायदे होतात?
हल्ली आपल्याला बघायला मिळते, की कोणाला एकत्र जेवायला बसायला वेळ नसतो, तसेच जेवायला बसल्यावर पलंगावर बसतात, आणि टीव्ही बघतात. कोणाचे लक्ष जेवणात राहत नाही. पण असे करू नका. कारण अन्न हे परब्रम्ह असते, ही म्हण सगळ्यांनाच माहिती आहे. हया अन्नाचा आपण मान ठेवायला हवा. आपण पलंगावर बसून जेवण करू नये, कारण पलंगावर बसून जेवने, म्हणजे आजारांना आमंत्रण देणे होय. तसेच, आज आपण जाणून घेणार आहोत, की जमिनीवर बसून जेवल्याने, आपल्याला कोणते फायदे होऊ शकतात. चला तर मग बघुयात.
तुमची पचनक्रिया सुरळीत होते
हो, तुम्हाला नवलच वाटेल, तुम्ही म्हणाल की, खाली बसून जेवणाचा आणि पचनक्रिया सुरळीत होण्याचा काय संबंध असेल बरं, तर खरंच खाली बसून जेवल्यामुळे, तुमची पचनक्रिया सुरळीत होते. कारण जेवताना मांडी घालून बसल्यामुळे, तुमची पद्मासनाची, सुखासन ची स्थिती येते. त्यावेळी तुमच्या पाठीचा मागचा भाग व पोटाचा पुढच्या भागाचे स्नायू ताणले जातात. यांच्यामुळे तुमच्या चयापचयाची क्रिया ही सुरळीत होऊन, अन्नपचन हे सुरळीत होते. मग तुम्हाला जड जड असल्यासारखे वाटत नाही.
तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते
मांडी घालून बसल्याने, तुमचे जेवणाकडे सगळं लक्ष राहते. मांडी घातल्यामुळे तुमच्या पायांचा ही व्यायाम होतो, व पद्मासनाची स्थिती होते. आणि तुम्ही जे जेवण करतात, ते पचण्यास तुम्हाला सोपे पडते. मांडी घालून बसल्यामुळे तुमचा मेंदू हा शांत असतो. तुमचा मेंदू शांत असल्यामुळे, तो तुमच्या भूक व जेवणाकडे बारकाईने लक्ष देतो. अन्नपदार्थ आपण नीट बारीक चाऊन खातो, त्यामुळे आपल्याला, ऍसिडिटी पोटफुगी सारख्या समस्या होत नाही. शिवाय वजनही नियंत्रित राहते.
कुटुंबात प्रेम वाढते
हल्ली आपण बघत आहोत, की कोणाला कोणासोबत बसायलाही वेळ नाही. जर तुम्ही खाली मांडी घालून सगळे एकत्र कुटुंबासोबत जेवण केले, तर तुमच्या कुटुंबात प्रेम वाढते, व एकोपा राहतो. आणि ज्यावेळी तुम्ही जेवताना शांतचित्ताने कुटुंबासोबत जेवण करतात, ते सगळ्यांच्या अंगी लागते, व तुमचा परिवार सुदृढ व निरोगी राहतो.
पोटाचे विकार होत नाही
हो, जेवताना जर तुम्ही मांडी घालून बसले, तर तुमचे पचन हे सुरळीत होते. तसेच वास्तुशास्त्राप्रमाणे जर तुम्ही मांडी घालून बसले, तर तुमचे मन हे, शांत असते, व त्यांचे पूर्ण लक्ष जेवणावरच राहते, व मांडी घालून बसल्यामुळे तुमचा जठराग्नी प्रदीप्त होतो. त्यामुळे तुमचे अन्नपचन सुरळीत होते, त्याच्यामुळे तुम्हाला पोटाचे विकार हे होत नाही. शिवाय मांडी घालून बसल्यामुळे एकाग्रताही वाढते.
चला, तर आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की पलंगावर बसून का जेऊ नये. तसेच खाली बसून जेवल्यामुळे, तुमच्या शरीराला कोणते फायदे होतात. ते सांगितलेले आहेत. आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे.
धन्यवाद