मनातली भीती घालवण्यासाठी काय करावे

0
1188
मनातली भीती घालवण्यासाठी काय करावे
मनातली भीती घालवण्यासाठी काय करावे

बऱ्याच वेळेस माणसाला भिती हा शब्द आठवला की त्याचा ताण वाढतो. तसेच घरातल्या कामाचा ताण अशा बऱ्याच प्रकारच्या ताण आठवतो याचप्रकारे माणसाला इतर प्रकारच्या भीती देखील असु शकते. तर ती त्यांच्या मनात आणि डोक्यात दोन्ही प्रकारे असू शकते. मग आता तुम्ही म्हणाल की नक्की कोणत्या प्रकारे असते? तर तसं बघायला गेलं तर मी भीती कोणताही प्रकार नसतो लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनामध्ये काही ना काही कोणत्या तरी प्रकारची भीती असेल आणि कोणाची भीती कधी कोणत्या प्रकारे बाहेर येईल ते सांगता येत नाही. तसेच तुम्हाला जर समोरून बघून समजणार देखील नाही की या माणसाला कोणत्या प्रकारची भीती आहे. कोणत्या प्रकारचा तान आहे हेदेखील तुम्हाला समजणार नाही. तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ही मनातली भीती म्हणजे नक्की काय असतं? ती कशी कोणत्या प्रकारे आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये असते की ती नंतर निघायचे नावच घेत नाही. याच प्रकारे आपण यावर काही उपाय देखील बघणार आहोत जेणेकरून ते उपाय तुम्ही घरच्या घरी करून तुमच्या मनातल्या भीती घालवू शकता चला तर मग जाणून घेऊया. चला तर मग जाणून घेऊयात मनातली भीती घालवण्यासाठी काय करावे.

मानसिक भय म्हणजे काय ?

तर आपण आता भीती म्हणजे नेमकं काय असतं त्याच्या बद्दल थोडीशी माहिती बघितली. आता आपण जाणून घेऊया की नक्की मानसिक प्रेम म्हणजे काय असतं चला तर मग बघुया.

काल्पनिक भय

अनेक वेळेस आपण असे बघतो की अनेक लोकांना काल्पनिक भीती असते. म्हणजेच बरेच लोक आपापल्या कल्पनेमध्ये हरवून जातात आणि बऱ्याच वेळेस तेच लोकं कल्पनेमध्ये बऱ्याच गोष्टी बघतात किंवा त्या गोष्टींची कल्पना करावी लागतात. मग ती गोष्ट वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. म्हणजेच कोणाला भुता पासून भीती वाटत असेल. तर तो त्याच्या कल्पनेमध्ये नेहमी भुताला बघुन घाबरतो. हे एक उदाहरण झालं पण जर हेच जर मोठ्या लोकांसोबत होत असेल तर? त्यांच्यासोबत काही अशा घटना झालेल्या असतात की ज्यामुळे हे मोठे लोक त्यामध्येच गुंतून जातात आणि सतत त्याचाच विचार करतात यामुळे हळूहळू त्यांचा ताण तणाव वाढत जातो.      

वाचा  जांभूळ पावडर चे फायदे

मानसिक तान

तर बऱ्याच वेळेस मानसिक ताण देखील समोरच्याला असू शकतो. म्हणजेच समाजाचा तान किंवा कामाचा ताण अशा बऱ्याचशा मानसिक ताणाला तोंड देऊन एका वेळेनंतर माणूस थकून जातो. त्याला हा मानसिक ताण असह्य होतो. सर्वात वाईट हा मानसिक ताण असतो कारण यामध्ये डोक याबरोबरच आपल्या शरीरावर देखील परिणाम होतो. तसेच आपल्या आहारापासून आरोग्या पर्यंत आपल्याला परिणाम दिसून येतो.

मनातली भीती घालवण्यासाठी काय करावे

आपण मनातले भय नक्की काय असतं हे तर बघितलं तर ते कोणत्या प्रकारचा असतो हे देखील आपण जाणून घेतलं. आता आपण बघुया जर आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारची भीती असेल तर आपण ते कोणत्या प्रकारे दूर करू शकतो.

योगा व मेडिटेशन/प्राणायाम करा

आपला सर्वात चांगला मित्र म्हणजे योगा या मित्राकडून आपल्याला खूप काही घेता येईल. तुम्ही नियमितपणे सकाळी उठून योगा करत असाल तर तुमच्या बऱ्याच समस्यांचा समाधान मिळेल. याच प्रकारे तुम्हाला जर मानसिक तणाव किंवा कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती असेल तर मेडिटेशन/प्राणायाम करावे. असे केल्याने तुमच्या शरीरामधील सर्व अवयवांवर तुमचा ताबा अजून घट्ट होईल. तसेच तुमच्या शरीराचा समतोल देखील चांगला राहील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नियमितपणे मेडिटेशन/प्राणायाम केल्यामुळे हळूहळू मनातली भीती कमी होण्यास मदत होते.

निसर्गाच्या सानिध्यात जावे

आपल्या सर्वात चांगला मित्र म्हणजे निसर्ग होय कारण निसर्गाच्या सानिध्यात मध्ये राहिल्यामुळे आपले मन शांत होण्यास मदत होते. म्हणून जर तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती असेल डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार असतील तर तुम्ही जर निसर्गाच्या सानिध्यात मधे थोडा वेळ घालवला तर तुमच्या सर्व समस्या दूर होतील व तुम्ही हळूहळू शांत देखील व्हाल.

मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवा

खूपदा आपल्या सोबत असे होते की आपण काम आणि घर या दोन्ही गोष्टींमध्ये इतके गुंतून जातो की आपल्याला काही दुसरे जीवन आहे. आपल्यालाही आपले आयुष्य आपल्या परीने जगता आले पाहिजे याचे भानच उरत नाही. यामुळे आपल्या विचारांची देवाण-घेवाण देखील होत नाही. तुम्ही जर मित्रांच्या सोबत थोडा वेळ घालवला एकमेकांच्या समस्या जाणून घेतल्या त्या कशा सोडवायच्या हे जाणून घेतले तर तुम्हाला नक्कीच मदत होईल व तुमचा ताणतणाव मनातली भीती देखील कमी होईल.

वाचा  पायावर पुरळ येणे या समस्या ची लक्षणे व घरगुती उपाय :-

मानसिक भय तुम्हाला काय नुकसान पोहोचवते

आता आपण जाणून घेऊया की नक्की मानसिक भय असल्याने आपल्या शरीराला व आपल्याला कोणते कोणते नुकसान होतात.

आरोग्यावर परिणाम

आपल्याला जर मानसिक ताण असेल मानसिक भय असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. आपले जेवण कमी होते आपल्याला पुरेशी झोप भेटत नाही. यामुळे आपण अशक्त बनत जातो आणि पुरेशी झोप न भेटल्यामुळे आपले डोळे लाल होतात. याच प्रकारे आपल्या डोळ्यांच्या खाली डाग सर्कस देखील येतात चिडचिड होते कोणतीही गोष्ट आपण करत असू तर त्या कामामध्ये लक्ष देखील लागत नाही.

सतत विचार

जर आपल्याला मानसिक भय असेल तर आपण सतत त्यात त्याच गोष्टीचा विचार करतो आणि हे आपल्या मेंदूसाठी आणि शरीरासाठी चांगले नसते. जर आपण एकाच गोष्टीचा सतत विचार करत राहिलो तर आपल्याला या जगाचे भानच उरणार नाही. आपण सतत आपल्यामध्ये गुंतून राहू आणि असे वागणे चांगले नाही ही यामुळे आपण आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये देखील सुखी राहू शकणार.

मनात भीती का येते

मनामध्ये भीती येण्याचे कारण कुठे ना कुठे आपणच आहे. आपणच काही गोष्टींना इतके महत्त्व देतो की ते आपल्या जीवनापेक्षा अधिक होऊन बसते. आपला स्वतःचा विचार देखील याला कारणीभूत ठरू शकतो. याच प्रकारे एखादी घटना जर आपल्यासोबत झाली तर ती नकारात्मक घेण्यापेक्षा सकारात्मक घेतली आणि नेहमी सकारात्मक विचार केला तर तुमच्या मनामध्ये कधी भीती तयार होणार नाही.

जाणून घ्या : लहान बाळाला घाम येणे उपाय

तर मित्रांनो आज आपण बघितले की नक्की भीती म्हणजे काय? तसेच मनामध्ये भय निर्माण होण्याची कारणे? कोणती त्यावर उपाय कोणते? याचप्रकारे मनामध्ये भीती का येते हेदेखील आपण जाणून घेतले. तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

वाचा  स्वप्नात दांडिया खेळताना दिसणे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here