नाकावर असलेले काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

0
1653
नाकावर असलेले काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय
नाकावर असलेले काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरातील विविध अवयवांचे आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक अवयव विविध प्रकारे त्यांची महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे महत्त्वाचे पाच ज्ञानेंद्रिय असतात. ती ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे ,नाक, कान, त्वचा आणि जिभ या विविध पाच ज्ञानेंद्रियांची आपण काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. कारण की जर या वेगवेगळ्या 5 ज्ञानेंद्रिया ची जर व्यवस्थित रित्या काळजी घेतली नाही तर आपल्याला विविध समस्या उद्भवू शकतात. ह्या पाच ज्ञानेंद्रिये मधील सर्वात महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले नाक.नाकामुळे आपण वेगळ्या गोष्टीचा गंध घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला श्वास घेण्यास देखील नाक मदत करते. पण जर याच नाकाला जर वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले तर आपल्याला त्याच्या अधिकच वेदना जाणवू शकतात. नाकाशी निगडीत आपल्याला विविध समस्या देखील होऊ शकतात. जसे की नाकावर असलेले काळे डाग, नाक सतत गळणे इत्यादी. 

बऱ्याच लोकांना नाकावर आलेले काळे डाग आवडत नाही. नाकावरील काळे डाग असल्यामुळे त्यांना त्यांच्या सौंदर्यात अडथळा निर्माण होतो असे जाणवते. पण हे नाकाला असलेले काळे डाग हे जन्मतः देखील असू शकतात. पण जर तुम्हाला या नाकावर असलेले काळे डाग जर घालवायचे असेल तर तुम्ही विविध घरगुती उपाय यांचा देखील वापर करू शकतात..

बरेच लोक या समस्येपासून आराम मिळण्यासाठी कोणत्याही सल्ला न घेता विविध औषधाचा वापर करतात. त्यामुळे नाकावरचे काळे डाग हे अजून देखील वाढू शकतात. त्यामुळे आपल्याला जर हे नाकावरचे काळे डाग घालवायचे असेल तर तुम्ही विविध घरगुती उपाय देखील वापर करून नाकावर असलेले काळे डाग घालवू शकतात.

नाकावर असलेले विविध काळे डाग घालवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रभावशाली घरगुती उपाय देखील करू शकतो. घरगुती उपाय केल्यामुळे आपल्या नाकावर असलेली विविध काळे डाग दूर होण्यास आपल्याला मिळू शकेल. तर मग जाणून घेऊया !

नाकावर असलेले काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय :-

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की नाकावर असलेले काळे डाग घालवण्यासाठी कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपाय आपण करू शकतो ज्यामुळे नाकाला पडलेले काळे डाग या समस्येपासून आराम मिळण्यास आपल्याला मदत मिळू शकेल ? चला तर मग बघुया !

  • लिंबाचा रस लावून बघावा :-

आपल्या रोजच्या जेवणा मधील चव वाढवण्यासाठी आपण लिंबू चा वापर करत असतो. त्याच बरोबर विविध कामांसाठी देखील लिंबू चा वापर केला जातो. लिंबू चा वापर केल्यामुळे आपल्याला विविध समस्यां पासून आराम मिळू शकतो. जर मित्रांनो तुम्हाला नाकावर असलेले काळे डाग जर घालवायचे असेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करावा. लिंबूमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषक तत्व त्याचबरोबर विविध विटामिन मुळे आपल्या नाकावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते. आपल्याला ज्या ठिकाणी नाकावर काळे डाग असेल त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा व काही सेकंदानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. असे जर तुम्ही थोडे दिवस केले तर तुमच्या नाकावर असलेले काळे डाग दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल.

  • कोरफडीचा जेल बघावा :-

विविध वनस्पती देखील आपल्याला विविध समस्या पासून आराम देण्यास मदत करतात. त्यामधील कोरफड ही वनस्पती देखील आपल्याला विविध समस्यांपासून आराम देण्यास मदत करते. कोरफड मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध घटकांमुळे आपल्याला असणारे शरीराशी निगडित विविध समस्या दूर करण्यास कोरफड आपल्याला करते. आयुर्वेदानुसार देखील कोरफडीला एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. जर तुम्हाला नाकावर सतत येणारे काळे डाग या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही नाकावर कोरफडीचा जेल लावून बघावा. कोरफडीचा ताजा गर घेऊन आपल्या नाकावर ज्या ठिकाणी काळे डाग असतील तेथे लावा व थोड्या वेळा नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. कोरफड मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध वेगवेगळ्या गुणधर्मामुळे आपल्या चेहऱ्यावर किंवा नाकावर आलेले काळे डाग दूर होण्यास मदत मिळू शकेल. त्यामुळे हा एक महत्त्वाचा उपाय नाकावरचे काळे डाग दूर करण्यासाठी आपल्यासाठी ठरू शकतो.

  • टोमॅटोची पेस्ट लावून बघावी :- 

आपल्या स्वयंपाक घरात टोमॅटो देखिल विविध जेवण बनवण्यासाठी वापरला जातो. पण याचा टोमॅटो चा वापर आपण आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या देखील दूर करण्यास वापरू शकतो. बऱ्याच जणांना नाकाला काळे डाग असणे या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर आपण नाकावर टोमॅटोची पेस्ट लावून बघावी. टोमॅटो मध्ये उपलब्ध असणाऱ्या लायकोपीन व तसेच विविध वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटकांमुळे आपल्याला नाकावर असणारे काळे डाग दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल. टोमॅटो चांगला कूच करून घेऊन त्यामध्ये थोडेसे लिंबाचा रस टाकावा व ही पेस्ट तयार करून आपल्या नाकावर ज्या ठिकाणी काळे डाग असतील त्या ठिकाणी लावावे. दोन ते पाच मिनिटं ही पेस्ट तसेच राहू द्यावी. त्यानंतर चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुऊन घ्यावा असे केल्यामुळे आपल्या नाकावर असलेला काळा डाग दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकेल.

वाचा  अंजीर चे फायदे

 

    .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here