स्वप्नात धनुष्यबाण दिसणे शुभ की अशुभ!

0
283
स्वप्नात धनुष्यबाण दिसणे शुभ की अशुभ!
स्वप्नात धनुष्यबाण दिसणे शुभ की अशुभ!

नमस्कार मित्रांनो. स्वप्न शास्त्रानुसार, आपण बघितलेल्या प्रत्येक स्वप्नाचा एक विशिष्ट प्रकारचा अर्थ असतो. मित्रांनो, काही जणांना स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पशुपक्षी दिसत असतात. तर काही जणांना वेगवेगळ्या प्रकारचे फुले, फळे, वगैरे. दिसत असतात. स्वप्नात धनुष्यबाण दिसणे हे स्वप्न अतिशय सुंदर मानले जाते, का तर हे प्रभू श्रीराम चे शस्त्र आहे.

आपण दिवसभरामध्ये ज्या गोष्टींचा विचार केलेला असतो, ज्या घटना बघितलेल्या असतात, ज्या वस्तू बघितलेल्या असतात, तर अशाही स्वरूपाचे स्वप्न आपल्याला पडत असतात. तर कधी अशी स्वप्न पडतात की, ज्याबद्दल आपण कधी विचाराही केलेला नसतो.

मात्र, अशी स्वप्न ही आपला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घट्ट बद्दल काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून आपण बघितलेले स्वप्नांचा अर्थ देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यातील संकेत जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशाच एका वेगळ्या स्वप्नाबद्दल सांगणार आहोत. स्वप्नात धनुष्यबाण दिसणे शुभ की अशुभ! रामायण महाभारत यासारख्या कथांमध्ये तुम्ही धनुष्यबाण तर बघितलेलेच असणार, किंवा याबद्दल ऐकलेले असणार. पूर्वी धनुष्यबाणाचा खूप वापर केला जाई.

आजही आपण मैदानी खेळामध्ये धनुष्यबाण हा खेळही आवर्जून खेळत असतो. धनुष्यबाण यावरही अनेक स्पर्धा आजही घेतल्या जातात. मित्रांनो, पूर्वी शिकारी शिकार करण्यासाठी धनुष्यबाणाचा वापर करत असे. तसेच, राजा, महाराजा हे देखील धनुष्यबाण हाती बाळगत होते, आवश्यक तेव्हा त्याचा वापर करत होते.

अनेक युद्धांमध्ये धनुष्यबाणाचा वापर केला जाई. जर तुम्ही दिवसभरामध्ये दिवस धनुष्यबाण बघितले असेल, अथवा धनुष्यबाणाची एखादी स्पर्धा बघितली असेल, तर तुम्हाला असे स्वप्न पडू शकते.

धनुष्यबाण संबंधीचे स्वप्न हे तुम्हाला वेगळे स्वरूपात देखील पडू शकते जसे की, स्वप्नात तुम्ही धनुष्यबाण चालवताना दिसणे, स्वप्नात तुम्हाला खूप सारे धनुष्यबाण दिसणे, स्वप्नात तुम्ही धनुष्यबाण खरेदी करताना दिसणे,स्वप्नात तुम्ही धनुष्यबाण विकताना दिसणे, स्वप्नात तुम्ही धनुष्यबाण तयार करताना दिसणे, स्वप्नात धनुष्यबाण मोडताना दिसणे वगैरे. स्वरूपाची स्वप्न पडू शकतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात धनुष्यबाण दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला धनुष्यबाण दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही जे काही काम हाती घेणार आहात त्यामध्ये तुम्हाला खूपच यश मिळणार आहे. असे स्वप्न दिसणे खूपच चांगले मानले जाते. जर तुम्ही तुमच्या मार्गावरून भटकलेले असाल, तर लवकरच तुम्हाला तुमचा योग्य मार्ग मिळणार आहे. एक नवीन योग्य दिशा तुम्हाला मिळणार आहे. तुमचे मानसिक टेन्शन जाणार आहे.

वाचा  स्वप्नात स्वतःचे नोकरी प्रमोशन झालेले दिसणे

स्वप्नात धनुष्यबाण चालवताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही धनुष्यबाण चालवताना दिसलेले असाल, म्हणजेच धनुष्यबाणाचा तीर सोडताना दिसलेले असेल, तर हे अत्यंत शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अगदी कमी वेळेत मोठे यश मिळणार आहात. अनेक जण तुमच्या कार्याबद्दल तुमचे कौतुक करणार आहे. समाजात तुमचा मानसन्मान वाढणार आहे.

स्वप्नात तुम्ही धनुष्यबाण तयार करताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्नात तुम्ही धनुष्यबाण तयार करताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुम्ही एका नवीन कामाला सुरुवात करणार आहात आणि हा काळही तुम्हाला योग्य असणार आहे. तुम्ही जे काही काम हाती घेणार आहात त्यामुळे तुम्हाला मोठे यश मिळणार आहे.

स्वप्नात तुम्ही धनुष्यबाण खरेदी करताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही धनुष्यबाण खरेदी करताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तुमचे आर्थिक टेन्शन नष्ट होणार आहे. तुमच्या कामातील अनेक अडथळे दूर होणार आहेत.

स्वप्नात तुम्ही धनुष्यबाण विकताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही धनुष्यमान विकताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कामांमध्ये खूप सारे अडथळे निर्माण होणार आहेत. अनेक संकटे तुम्हाला येणार आहेत. तुमची कामे पूर्ण होता होता मध्येच अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक टेन्शनही येऊ शकते.

स्वप्नात तुम्हाला तुटलेले धनुष्यबाण दिसणे. 

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला तुटलेले धनुष्यबाण दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या सोबत अशुभ घटना घडण्याची शक्यता आहे. तुमच्या कामांमध्ये अनेक छोटे-मोठे संकट येण्याची शक्यता आहे. असे स्वप्नात दिसल्यास तुम्ही वेळीच सावध होऊन सावधगिरीने कामे केली पाहिजेत, सतर्क राहिले पाहिजे.

वाचा  स्वप्नात उंदीर दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्हाला खूप सारे धनुष्यबाण दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला खूप सारे धनुष्यबाण दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या सोबत चांगल्या घटना घडणार आहेत. तुमच्या आयुष्यात अनेक नवीन सकारात्मक बदल घडवून येणार आहेत. येणारा काळ हा तुमच्यासाठी खूपच सुखद राहणार आहे.

स्वप्नात तुम्ही धनुष्यबाण मोडताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही धनुष्यबाण मोडताना दिसलेले असाल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमची मानसिक स्थिती ही खराब होणार आहे. तुमच्या हातून तुमच्याच कामाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तुम्हाला आर्थिक नुकसानही होऊ शकते.

मित्रांनो, स्वप्नात धनुष्यबाण दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here