स्वप्नात अंडी दिसणे शुभ की अशुभ

0
769

 

नमस्कार मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे वेगवेगळ्या प्रकारचे पडत असतात. तसेच काही स्वप्न हे आपल्याला भविष्य काळामध्ये येणाऱ्या गोष्टीबद्दल संकेत देत असतात. तर स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये अंडी दिसणे. मित्रांनो, अंडी भरपूर जणांना खायला आवडतात व त्या विषयी अशी म्हणही आहे की, “संडे हो या मंडे” “रोज खाऊ अंडे” अंडे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामध्ये भरपूर प्रोटीनची मात्रा असते. तसेच सौंदर्यवर्धक ही असतात. केसांना अंडे लावल्याने केस सिल्की आणि चमकदार होतात. तसेच अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरातील झीज भरून निघते. अंड्या पासून तुम्ही आमलेट, केक, अंडा-भुर्जी, अंडाकरी वेगवेगळ्या प्रकारे करून खाऊ शकतात. तसेच उकडलेले अंडी मीठ टाकून खायला चविष्ट लागतात. मित्रांनो तुमच्या स्वप्नामध्ये जर अंडी दिसत असेल, तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, मला स्वप्नात अंडे का बर दिसले असतील? तसेच स्वप्नात अंडे दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला तर मग जाणून घेऊयात स्वप्नात अंडी दिसणे हे शुभ असते की अशुभ असते. 

स्वप्नात अंडी दिसणे
स्वप्नात अंडी दिसणे

स्वप्नात अंडी दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये अंडी दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये अंडे कशा स्वरूपात दिसतात? कुठे दिसतात? कशा अवस्थेत दिसतात? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात..! 

वाचा  स्वप्नात अद्रक दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात अंडी दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये अंडी दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की तुम्ही जीवनामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा कमी होऊन, तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार करणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात अंडी खाताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शस्त्र नुसार स्वप्नामध्ये अंडी खाताना दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निरोगी जीवन जगणार आहेत. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहेत. तसेच काहीतरी शुभकार्य तुमच्या हातून होणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात अंडे खरेदी करताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शस्त्र नुसार स्वप्नामध्ये अंडी खरेदी करताना दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही खूप मोठ्या व्यवहारांमध्ये उतरणार आहेत. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. किंवा अचानक धनलाभ होण्याचे संकेत ही दर्शवत आहे. 

स्वप्नात अंडी विकताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये अंडी विकताना दिसणे, हे स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला जीवनामध्ये अडचणींचा काळ जाणवणार आहेत. तसेच कार्यामध्ये अडथळे जाणवणार आहे. नुकसानदाय स्थिती बघावी लागणार आहे. तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवावे नाहीतर कर्ज घ्यावे लागू शकते. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात अंड्या पासून भाजी किंवा भुर्जी बनवताना दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात अंड्यापासून भाजी किंवा भुर्जी किंवा वेगळे पदार्थ बनवताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, लवकरच तुम्ही मोठ्या बिजनेस मध्ये जाणार आहेत. तसेच एखाद्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही गुंतणार आहेत. तसेच व्यवहारांमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला बढोतरी किंवा प्रगती होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात दवाखाना दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात अंडे फुटलेले दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्न मध्ये जर तुम्हाला अंडी फुटलेले अवस्थेत दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुम्हाला ताण-तणाव जाणवणार आहेत. घरामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी मतभेद होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. तसेच कोणावरही विश्वास करताना त्यांची पडताळणी जरूर करा, नाहीतर तुमची फसवत होऊ शकते. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात तुम्ही आमलेट खाताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही आमलेट खाताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न तुमच्या प्रगतीची आणि उन्नतीच्या दिशेने वाटचाल करणार असे दर्शवत आहे. म्हणजेच येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला काहीतरी आनंदी वार्ता मिळणार आहेत. तसेच जीवनामध्ये तुम्ही खूप प्रगतशील व्यक्ती बनणार आहे. तुम्हाला मानसम्मानाचे योग संभावत आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सोन्याची अंडी दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये सोन्याची अंडी दिसणे, हे शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला गुप्तधनाचा लाभ होणार आहे. किंवा अचानक धनलाभ किंवा लॉटरी लागण्याचे संकेत आहे. तसेच तुमच्या ज्या इच्छा  अपूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तुम्ही या स्वप्नात खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात अंडी दिसणे हे शुभ असते की अशुभ असते त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

                         धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here