स्वप्नात शिवजयंती साजरी करताना दिसणे शुभ की अशुभ

0
159
स्वप्नात शिवजयंती साजरी करताना दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात शिवजयंती साजरी करताना दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो स्वप्न हे अगदी लहान पासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पडतात. स्वप्नांचे नियम नसतात. आपण कुठलेही स्वप्न बघू शकतो. असे म्हणतात की, ब्रह्म मुहूर्तावर बघितलेले स्वप्न हे खरे होतात, व आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देतात. स्वप्नात शिवजयंती साजरी करताना दिसणे हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणाऱ्या लोकाना पडतात असे मानले जाते.

तर मित्रांनो, स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये शिवजयंती साजरी करताना दिसणे? मित्रांनो, शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. त्यासाठी थोर शिवभक्त आणि अख्खा महाराष्ट्र त्याच्या तयारीला जोमाने लागतो. 

शिवजयंतीची रॅली काढली जाते, छत्रपती शिवाजी महाराज हा जयघोष सगळीकडे केला जातो. शिवरायांचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. थोर व्यक्तीमत्व असलेले, रुबाबदार असे ते पुरुष होते. आपल्या मराठमोळ्या लोकांसाठी त्यांनी खूप काही केलेले आहे. जर स्वप्नामध्ये शिवजयंती दिसत असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज दिसत असेल, तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, माझ्या स्वप्नामध्ये शिवजयंती का आली असेल?

तसे स्वप्नात शिवाजी छत्रपती महाराज का दिसले असतील?व ते स्वप्नात दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात. 

स्वप्नात शिवजयंती दिसणे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात शिवजयंती साजरी करताना दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला स्वप्नामध्ये शिवजयंती कशी दिसते? तुम्ही काय करताना दिसतात? शिवजयंतीची तयारी कशा प्रकारे करतात? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ असतात. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  स्वप्नात खुश दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात शिवजयंती दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये शिवजयंती दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, लवकरच तुम्हाला काहीतरी मोठे स्थान किंवा मोठेपण मिळणार आहे. अभिमानास्पद तुम्हाला वाढणार आहे. तसेच मानसन्मानही तुम्हाला मिळणार आहे आणि कोणत्यातरी मुख्य कामगिरीसाठी तुमची निवड होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात शिवजयंतीची तयारी करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही शिवजयंतीची तयारी करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, आगामी काळामध्ये तुम्हाला तुमचे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व सिद्ध करण्यासाठी खूप मोठे काम/ जबाबदारी मिळणार आहे. त्यातून तुम्ही यशस्वीरित्या सफल होणार आहेत.  तुमच्या कामाचे कौतुक केले जाणार आहे व आनंददायी गोष्टी घडणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात छत्रपती शिवाजी महाराज दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसणे, हे शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही धैर्यवान आणि हिम्मतवान व्हावेत. असे संकेत हे स्वप्न देत आहे. म्हणजेच तुमचे शत्रू तुमच्या आजूबाजूला आहे, त्यामुळे तुम्ही कोणतेही काम करताना चतुराईने करा आणि त्यांच्यावर विजय मिळवावे, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात शिवजयंतीचा जयघोष करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही शिवजयंतीचा जयघोष करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे, तुम्ही तुमचे काम उत्तम दर्जाचे करत आहेत. त्यामुळे तुम्हाला मानसम्माना चे योगही संभवत आहे. किंवा काहीतरी वेगळ्या कामगिरीसाठी तुम्हाला निवडले जाऊ शकते. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात शिवजयंतीची मिरवणूक होताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये शिवजयंतीची मिरवणूक होताना जर तुम्हाला दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला काहीतरी आनंदाची गोड बातमी मिळणार आहे. शुभ वार्ता मिळणार आहेत.

वाचा  स्वप्नात स्वतःचा व्यवसाय दिसणे शुभ की अशुभ

तसेच परिवारामध्ये प्रेमळ वातावरण राहणार आहे.  किंवा परिवारासोबत तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचे बेत आखणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात शिवजयंती साजरी करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही शिवजयंती साजरी करताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनामध्ये चाललेले ताण-तणाव, नकारात्मक ऊर्जा आता कमी होणार आहे.

अभिमानास्पद तुम्हाला आता वाटणार आहे, आणि सुखी जीवनाची वाटचाल तुम्ही करणार आहे. तसेच काहीतरी कार्यक्रम तुमच्या घरी होणार आहे. किंवा एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही हजेरी लावणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही शिवाजी महाराजांचे नमस्तक करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही शिवाजी महाराजांचे नमस्तक करताना दिसत असाल, तर ते शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असा कोणी थोर व्यक्ती मिळणार आहे.

जो तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करण्यास मदत करणार आहे. व तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाणार आहेत. तसेच एखाद्या चांगल्या व्यवहारांमध्ये किंवा कामांमध्ये तुम्ही लवकरच गुंतणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये शिवजयंती साजरी करताना दिसणे, किंवा शिवाजी महाराज दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत.

तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here