स्वप्नात भारतीय ध्वज दिसणे शुभ की अशुभ

0
378

 

नमस्कार मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे.स्वप्न अगदी सगळ्यांनाच पडतात. स्वप्नांचे नियम नसतात. तसेच स्वप्नांमध्ये आपण खूप सार्‍या गोष्टी बघू शकतो, जे आपल्याला भविष्य काळामध्ये येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देतात. तर मित्रांनो, त्या स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये भारतीय ध्वज दिसणे. मित्रांनो, आपल्या भारतीय ध्वजाचा सन्मान सगळे लोक करतात. तसेच प्रत्येकाचे आपल्या भारत देशावर प्रेम आहे. तसेच भारताच्या ध्वजामध्ये तीन रंग असतात आणि एक निळ्या रंगाची चक्र असते. नारंगी, पांढरा, हिरवा हे तीन रंगांनी भारताचे झेंडा अगदी शोभून दिसतो. व 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपल्या भारत देशात झेंडा फडकवला जातो. जर तुमच्या स्वप्नांमध्ये भारतीय ध्वज दिसत असेल, तर तुम्ही मनात एकदम गोंधळून जातात, आणि विचार करतात की मला असे स्वप्न का बरं पडले असेल? तसेच स्वप्नामध्ये भारतीय ध्वज दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर मित्रांनो, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला तर मग जाणून घेऊयात स्वप्नात भारतीय ध्वज दिसणे हे शुभ असते की अशुभ असते. 

स्वप्नात भारतीय ध्वज दिसणे
स्वप्नात भारतीय ध्वज दिसणे

स्वप्नात भारतीय ध्वज दिसणे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये भारतीय ध्वज दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्र नुसार तुम्हाला स्वप्नामध्ये भारतीय ध्वज कसा दिसला? कुठे दिसला? कोणत्या अवस्थेत दिसला? कशा प्रकारे दिसला? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊयात..! 

वाचा  स्वप्नात पाहुणे दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात भारतीय ध्वज दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये तुम्हाला भारतीय ध्वज जर दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही स्वतंत्र राहणार आहेत. तुम्ही तुमच्या मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहे. तसे प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्वतंत्रपणे जगायला आवडते, त्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्यात यशस्वी उच्चस्तर गाठणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात झेंडा फडकताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये झेंडा तुम्हाला फडकताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी मार्गावर जाणार आहेत. तसेच तुमच्या जीवनामध्ये अडचणी आता कमी होऊन तुम्ही सुखी आणि समाधानी आयुष्य जगणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात ध्वजारोहण करताना दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही ध्वजारोहण करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला खूप मोठी जबाबदारी मिळणार आहे. किंवा मोठे काम मिळणार आहे आणि ते तुम्हाला योग्यरीत्या आणि यशस्वीरित्या पार करून, तुमचे भविष्य उज्वल करायचे आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात झेंडा खाली पडलेला दिसणे

मित्रांनो भारतीय ध्वज हा आपला भारत देशाची शान आहे आणि जर तुमच्या स्वप्नामध्ये झेंडा तुम्हाला खाली पडलेला दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला नुकसानदायक स्थिती बघायला मिळणार आहे. किंवा कोणीतरी तुमच्या अपमान करणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात झेंडा खरेदी करताना दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये झेंडा खरेदी करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्हाला येत्या काही काळामध्ये धनलाभ होणार आहे. तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाणार आहे, किंवा कामांमध्ये व्यवहारांमध्ये मोठे फायदे तुम्हाला होणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात डास येणे शुभ की अशुभ

स्वप्नात भारतीय ध्वज फाटलेला अवस्थेत दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला भारतीय ध्वज फाटलेल्या अवस्थेत दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार त्याचा अर्थ आहे की, तुम्हाला खूप अडचणीच्या काळ येणार आहे. तसेच तुम्ही जिथे काम करत आहात तिथे तुमचे शत्रू निर्माण होणार आहेत आणि तुमचे कामे बिघडावे, यासाठी प्रयत्न करणार आहेत. किंवा परिवारामध्ये मतभेद, वाद- विवाद होण्याची शक्यता आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात झेंडा विकताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही झेंडा विकताना दिसत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार त्याचा अर्थ आहे की, तुम्हाला आर्थिक टंचाई जाणवणार आहे. नुकसानदायक स्थिती निर्माण होणार आहे. किंवा कर्ज घ्यावे लागणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते.

स्वप्नात भारतीय ध्वजाला मानवंदन करताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही झेंड्याला मानवंदन करताना दिसत असाल, तर ते अतिशय शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्र नुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही उंच शिखर गाठणार आहे. मोठ्या स्थानावर तुम्ही जाणार आहे. किंवा मोठे पद तुम्हाला मिळणार आहे. तुमचे कौतुक सर्वत्र केले जाणार आहे. तसेच तुमच्या एखादी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये भारतीय ध्वज दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

                         धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here