स्वप्नात दिवाळी दिसणे शुभ की अशुभ

0
303
स्वप्नात दिवाळी दिसणे शुभ की अशुभस्वप्नात दिवाळी दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात दिवाळी दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पडतात. तसेच स्वप्न आपण ज्या गोष्टीचे सतत विचार करत असतो, त्या गोष्टींबद्दल आपल्याला स्वप्न पडू शकतात. स्वप्नात दिवाळी दिसणे हे स्वप्न भारतीय लोकांच्या सर्वात मोठ्या उत्सावाचे उदाहरण आहे.

मित्रांनो, स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये दिवाळी दिसणे, दिवाळीची पहाट साजरी करताना दिसणे. मित्रांनो, दिवाळीचा सण हा आपण आतुरतेने वाट बघत असतो. त्यामध्ये फटाके फोडण्याची मजा तसेच खमंग सुवासिक, चविष्ट चकली, चिवडा, शंकरपाळे, लाडू, करंजी यांचे नाव घेतले, तरी तोंडाला पाणी सुटते. तसेच दिवाळी सण हा खूपच सुंदर असतो.

तसेच सगळीकडे दिवे, लाईट्स, कंदील, वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई सगळीकडे केली जाते. तसेच वसुबारस, धनतेरस, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज एकापाठोपाठ एक एक दिवस आपले मजेशीर आणि आनंददायी राहतात. त्यामध्ये सगळ्यांच्या गाठीभेटी होतात.

मित्रांनो, तुमच्या स्वप्नामध्ये जर अशी दिवाळीची सुरुवात/ पहाट येत असेल, तर तुम्ही मनात निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण करतात की, मला असे स्वप्न का बरं पडले असेल? तसेच स्वप्नात दिवाळी दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर याचे समाधानकारक उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

स्वप्नात दिवाळी दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात दिवाळी दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला स्वप्नामध्ये दिवाळी कशी दिसते? कोणत्या प्रकारे साजरी करताना दिसली? तुम्ही काय करताना दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  स्वप्नात गजानन महाराज दिसणे शुभ की अशुभ ?

स्वप्नात दिवाळी दिसणे? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला दिवाळी दिसत असेल, तर ते मिश्र स्वरूपाचे मानले जाते. कारण दिवाळी हा सण जरा खर्चिक असतो. त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला खर्च करावा लागणार आहे. तसेच तुम्हाला आर्थिक टंचाई जाणवणार आहे. पण तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवायला हवेत. तसेच प्रत्येक गोष्ट ही मनापासून आणि आनंदाने करणार आहेत. जीवनामध्ये यशस्वी स्थर तुम्ही गाठणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दिवाळीची पहाट साजरी करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये तुम्ही दिवाळीची पहाट म्हणजे नरक चतुर्दशी साजरी करताना बघत असाल, तर ते अतिशय शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुमच्या जीवनातील चाललेले कष्ट तसेच नकारात्मक प्रभाव कमी होणार आहेत. तसेच तुमच्या शत्रूंचा नायनाट होणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या कामांमध्ये खूप मोठे स्थानावर जाणार आहे. त्यामुळे तुम्ही या स्वप्नात खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दिवाळी साजरी करताना दिसणे? 

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न दिवाळी हा सण जर  साजरी करताना तुम्हाला दिसत असेल, तर ते स्वप्न शुभ मानले जाते. कारण हा सण आनंददायी आणि परिवाराला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. व त्यामध्ये तुम्ही स्वतःला मनसोक्त जगताना बघत असाल, तर ते शुभ मानले जाते.

स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळामध्ये तुम्ही परिवारासोबत वेळ घालवणार आहे. तसेच तुमच्या जीवनातील चाललेले ताणतणाव विसरून, तुम्ही आनंदी जीवन जगणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही लक्ष्मीपूजनाची तयारी करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही लक्ष्मीपूजनाची तयारी करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनातील कष्ट कमी होऊन, तुमची भरभराटी होणार आहे. तसेच लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहणार आहे. म्हणजेच तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे संकेत हे स्वप्न संभवत आहे. तसेच घरात सुख, समृद्धी राहणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात गवती चहा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात दिवे लावताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्न मध्ये जर तुम्ही दिवे लावताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव नष्ट होऊन, तुम्ही सुखी आणि समाधानी आयुष्य जगणार आहे. तुमच्या घरात सकारात्मकतेने विचार केला जाणार आहे, व तुमची भरभराटी होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात फटाके फोडताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही फटाके फोडताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. त्याचा असा अर्थ आहे की, अचानकपणे तुम्हाला एखादी आनंददायी किंवा सुखद धक्का बसणार आहे. तसेच तुम्हाला व्यापारामध्ये वृद्धी होणार आहे. म्हणजेच तुम्ही उच्च स्थळ गाठणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही मिठाई फराळाचे पदार्थ तयार करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही मिठाई, फराळाचे पदार्थ तयार करताना दिसत असाल, तर त्याचे शुभ संकेत मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुम्हाला खूप मोठी जबाबदारी मिळणार आहे. मोठे काम मिळणार आहे. 

तुम्ही एखाद्या मोठ्या व्यवहारांमध्ये गुंतणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहे. तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाणार आहे. तसेच सुखद अनुभव तुम्हाला लवकरच येणार आहेत. काहीतरी गोड आनंदाची बातमी मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दिवाळीत तुमच्या घराला आग लागलेली दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये दिवाळीच्या सणामध्ये जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आग लागलेली दिसत असेल, तर अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुम्हाला खूप नुकसान दायक स्थिती बघावी लागणार आहे. एखाद्या तोट्यामध्ये तुम्ही अडकणार आहे. अडचणींचा काळ तुम्हाला येणार आहे किंवा घरात काहीतरी दुःखद बातमी  मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यावी, असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात हिरा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात फटाके फोडताना तुम्हाला चटका लागलेला दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये फटाके फोडताना तुम्हाला चटका लागलेला किंवा हात जळालेला दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार याचा अर्थ होतो की, काही काळात तुमचे आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहे, किंवा तुम्ही जे काम करत आहेत, त्यामध्ये तुम्हाला नुकसान होणार आहे,

म्हणजेच तुमच्या कामांमध्ये कोणीतरी अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला नुकसान व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्यावी व कोणतेही कामे करताना खबरदारी घ्यावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही मिठाई फराळाचे पदार्थ खाताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न मध्ये तुम्ही मिठाई किंवा फळाचे पदार्थ खाताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्र नुसार त्याचा अर्थ आहे की तुमचे आरोग्यावर असलेले जुने त्रास किंवा जुन्या व्याधी कमी होऊन तुम्ही सुदृढ व निरोगी आयुष्य जगणार आहे. तसेच काहीतरी आनंददायी गोष्ट तुम्हाला कळणार आहे. तसेच तुम्ही परिवारासोबत वेळ घालवणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दिवाळी तुम्हाला कोणीतरी गिफ्ट देताना दिसणे? 

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला दिवाळीमध्ये कोणी गिफ्ट देताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला मोठे स्थान किंवा पदोन्नती मिळणार आहे. किंवा अचानक धनलाभाचे ही संकेत संभवत आहे. तसेच तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहे. असे संकेत स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये दिवाळी दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here