स्वप्नात निळा रंग दिसणे शुभ की अशुभ !

0
529
स्वप्नात निळा रंग दिसणे शुभ की अशुभ !
स्वप्नात निळा रंग दिसणे शुभ की अशुभ !

नमस्कार मित्रांनो. स्वप्न शास्त्रानुसार, आपण बघितलेल्या प्रत्येक स्वप्नांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा अर्थ दडलेला असतो. एक संकेत लपलेला असतो. आपल्याला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे. कारण यातील काही स्वप्नही अशी असतात, की जी आपल्या जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पाडत असतात. स्वप्नात निळा रंग दिसणे हे एक शुभ संकेत मानले जातात.

स्वप्नांचा अर्थ समजून घेतला, तर आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल वेळेत सावध होऊ शकतो. काही जणांना स्वप्नामध्ये पशु-पक्षी, प्राणी वगैरे. दिसत असतात. तर काही जणांना विशिष्ट प्रकारच्या वस्तू, व्यक्ती, फळे, फुले दिसत असतात. मित्रांनो, दिवसभरामध्ये आपण जे विचार केलेले असतात, ज्या घटना बघितलेल्या असतात, तर त्यांची रूपांतर हे आपल्या स्वप्नात दिसू शकते.

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्नात निळा रंग दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत. रंगांचे अनेक प्रकार आहेत प्रत्येक रंगाचे एक विशिष्ट प्रकारचे महत्त्वही आहे. प्रत्येक रंगाचा एक अर्थ असतो. निळा रंग हा योग्य दिशेचे, मनातील इच्छा पूर्ण होण्याची कार्यात यशस्वी होण्याचे सूचक मानले जाते.

तसेच निळा रंग हा शांततेचे प्रतीकही मानले जाते. तिरंगा म्हणजेच आपल्या भारतीय ध्वजामध्ये मध्यम स्थानी निळा रंगाचे चक्र तर तुम्ही बघितलेलेच असणार हे शांततेचे प्रतीक मानले जात असते. मित्रांनो, जर दिवसभरामध्ये तुम्ही रंगांविषयी विचार केलेला असेल अथवा निळ्या रंगा संबंधित काहीतरी वस्तू अथवा कपडे खरेदी केलेले असतील, तर तुम्हाला अशा स्वरूपाचे स्वप्न पडू शकते.

परंतु, तुम्ही स्वप्न हे नेमक्या कोणत्या स्वरूपात बघितले होते? त्यानुसारच, तुम्हाला त्याचे शुभ व अशुभ संकेत कळू शकतात. जसे की, स्वप्नात निळा रंग दिसणे, स्वप्नात निळ्या रंगाचे पाणी दिसणे, स्वप्नात निळं आभाळ दिसणे, स्वप्नात निळ्या रंगाची रूम दिसणे, स्वप्नात निळ्या रंगाचा रुमाल दिसणे, स्वप्नात निळ्या रंगाचा साप दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडू शकतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात निळा रंग दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला निळा रंग दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात लवकरच तुम्हाला मोठी खुशखबर मिळणार आहे. येणाऱ्या दिवसात तुमच्या कार्यात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे.

वाचा  स्वप्नात दिग्दर्शक दिसणे शुभ की अशुभ !

तुमचा आर्थिक फायदा होणार आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत. असे स्वप्न दिसणे खूप छान मानले जाते.

स्वप्नात निळ्या रंगाचे आभाळ दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला निळ्या रंगाचे आभाळ दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्यावर आलेले संकटे तुमच्या मार्गात आलेल्या अडचणी अडथळे हे लवकरच संपणार आहेत. तुम्ही संकट मुक्त होणार आहात. मानसिक टेन्शन मुक्त होणार आहात. तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी होणार आहात.

स्वप्नात तुम्हाला निळ्या रंगाचा रुमाल दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला निळ्या रंगाचा रुमाल दिसलेला असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते  या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसमवेत कुठेतरी बाहेर गावी फिरायला जाणार आहात. मजा मस्ती करणार आहात.

स्वप्नात तुम्हाला निळ्या रंगाचे पाणी दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही निळ्या रंगाचे पाणी बघितले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, वैभव, शांतता नांदणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.

तुम्हाला निळ्या रंगाचे डोळे दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला निळ्या रंगाचे डोळे दिसलेले असतील तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून अथवा तुमच्या सहकार्यांकडून धोका मिळू शकतो. तुमच्या कार्यात तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

अशा व्यक्तींपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे. कुठलेही निर्णय घेताना काम करताना खात्रीपूर्वक असते केले पाहिजे. नाहीतर, त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

स्वप्नात तुम्हाला निळ्या रंगाचा साप दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, तर स्वप्नात तुम्हाला निळ्या रंगाचा साप दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्ही नवीन कार्याला प्रारंभ करणार आहात. त्यामुळे, तुम्हाला मोठे यश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात एक नवीन दिशा मिळणार आहे. तुमच्यावरील नकारात्मक शक्ती या नष्ट होणार आहेत.

वाचा  स्वप्नात घसरगुंडी दिसणे शुभ की अशुभ

तुम्हाला निळ्या रंगाचा रूम दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला निळ्या रंगाचा रूम दिसलेला असेल, निळ्या रंगाचे फर्निचर वगैरे दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या कार्यात अडथळे निर्माण होणार आहेत. तुमची कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

मित्रांनो, स्वप्नात निळा रंग दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

 

           धन्यवाद….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here