स्वप्नात हाताची बोटे तुटताना दिसणे शुभ की अशुभ!

0
346
स्वप्नात हाताची बोटे तुटताना दिसणे
स्वप्नात हाताची बोटे तुटताना दिसणे

नमस्कार मित्रांनो. झोपेच्या दरम्यान प्रत्येकाला स्वप्न पडत असतात. काही स्वप्न ही चांगले असतात. तर काही स्वप्न ही वाईट देखील असतात. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्नामध्ये हाताचे बोटे तुटताना दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत.

कुठलेही कार्य करायचे म्हटले तर आपण आपल्या हातांनी काम पूर्ण करत असतो. अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपला हातांची तसेच हातांच्या बोटांची मदत होत असते. जेवण करण्यासाठी देखील आपण आपल्या हातांच्या बोटांचा उपयोग करत असतो.

मित्रांनो, आपल्या शरीराचे प्रत्येक अवयव हे अगदी महत्त्वपूर्ण असतात. शरीरातील प्रत्येक अवयवांमुळे आपले सर्व काम हे व्यवस्थितपणे सुरळीत राहण्यास मदत होत असते. जर दिवसभरामध्ये तुम्ही काम करताना तुमच्या हातांना इजा झालेली असेल अथवा किंवा फळ वगैरे कापताना, भाजीपाला कापताना तुमच्या बोटांना लागलेले असेल, तर तुम्हाला रात्री झोपेच्या दरम्यान अशा स्वरूपाचे स्वप्न पडू शकते. 

काही-काही व्यक्ती तर इतका विचार करत असतात की, त्यांना रात्री झोपेच्या दरम्यान स्वप्नामध्ये देखील अशा स्वरूपाचे स्वप्न पडू शकते. मित्रांनो, तुम्हालाही स्वप्नामध्ये हाताची बोटे तुटताना दिसलेली आहेत का? जर तुम्हाला असे स्वप्न पडलेले असेल, तर त्याचा अर्थ देखील तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

चला तर मग, स्वप्नात हाताची बोटे तुटताना दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात हाताची बोटे तुटताना दिसणे, शुभ की अशुभ!

काही व्यक्तींना स्वप्नात हात देखील दिसत असतो. जसे की, स्वप्नात हाताची बोटे तुटताना दिसणे स्वप्नात हातांची बोटे दिसणे, स्वप्नात हाताच्या बोटांमधून रक्त निघताना दिसणे, स्वप्नात हाताच्या बोटांना जखम झालेली दिसणे, वगैरे.

वाचा  स्वप्नात एअरपोर्ट दिसणे शुभ की अशुभ

स्वरूपाचे स्वप्न पडू शकतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

स्वप्नात हाताची बोटे तुटताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला हाताची बोटे तुटताना दिसलेली असेल, तर या स्वप्नांचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमचे काम करत असताना, इतर व्यक्तींवर देखील विश्वास ठेवला पाहिजे. तुम्हाला वरिष्ठ मंडळीच्या सल्ल्याची गरज भासणार आहे.

इतर व्यक्तींची देखील तुम्ही तुमच्या कार्यामध्ये मदत घेतली पाहिजे. कुठलेही कार्य अगदी सावधगिरीने केले पाहिजे. नाहीतर तुमच्या हातून तुमच्या कामाचे नुकसान होऊ शकते.

स्वप्नात तुम्हाला इतर व्यक्तींचे हाताची बोटे तुटताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला इतर व्यक्तींची हाताची बोटे तुटताना दिसलेले असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या अगदी जवळचा मित्र अथवा व्यक्ती ही मानसिक टेन्शनमध्ये येणार आहेत किंवा शारीरिक कष्ट त्याला भोगावे लागणार आहे. त्याला तुमच्या मदतीची गरज भासणार आहे. तुम्ही त्याला मदतीचा हात दिला पाहिजे.

स्वप्नात तुम्हाला हाताच्या बोटातून रक्त निघताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला हाताच्या बोटातून रक्त निघताना दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर नवीन काम हाती घेणार असाल, आणि जर तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर तुम्ही हे काम काही काळानंतर सुरू केले पाहिजे.

नाहीतर तुम्हाला तुमच्या कामांमध्ये अनेक अडथळे येऊ शकतात. तुमच्या कार्याचे नुकसानही होऊ शकते. असे स्वप्न पडल्यास तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे.

स्वप्नात तुमच्या हाताच्या बोटांना जखम होताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला तुमच्या हाताच्या बोटांना जखम होताना दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते  या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमचे तुमच्या घरातील लोकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

वाचा  स्वप्नात सरकारी नोकरी मिळताना दिसणे शुभ की अशुभ!

घरातील सदस्यांसोबत तुमचे मोठे भांडण होण्याची शक्यता आहे. असे स्वप्न दिसल्यास तुम्ही वेळी सावध होऊन तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

स्वप्नात तुम्ही हाताची बोटे खाताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही हाताची बोटे खाताना दिसलेले असाल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मानसिक टेन्शनमध्ये येणार आहात. तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला खूप प्रेशर येणार आहे. तुमच्या आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्ही हाताचा अंगठा तोंडात घालताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्न तुम्ही हाताचा अंगठा तोंडात घालताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल सतत चिंता सतावणार आहे. सतत तुम्ही मानसिक टेन्शनमध्ये राहणार आहात. त्यामुळे तुमचे कार्यामध्ये देखील लक्ष राहणार नाही.

मित्रांनो, स्वप्नात हाताची बोटे तुटताना दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here