स्वप्नात मोत्याची माळ दिसणे शुभ की अशुभ

0
527
स्वप्नात मोत्याची माळ दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात मोत्याची माळ दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो ज्यावेळी आपण दिवसभर काम करतो, मेहनत करतो आणि रात्रीच्या वेळी गाढ झोपतो, त्यावेळी आपल्या स्वप्नामध्ये आपल्याला चित्र विचित्र आकृत्या दिसतात. व ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. स्वप्नात मोत्याची माळ दिसणे हे स्वप्न जास्तीत जास्त करून सोने व्यापार करणार्या लोकांमध्ये पडते असे मानले जाते.

तसेच स्वप्नांमध्ये आपण खूप सार्‍या गोष्टी बघू शकतो.  स्वप्न हे अगदी लहान पासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पडतात. तर स्वप्नांपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये मोत्याची माळ दिसणे?

मित्रांनो, मोती हे शिंपल्यांमध्ये मिळतात. तसेच तो दिसायला अगदी सुंदर आणि मोहक असतो.काही लोक मोत्याची अंगठी घालतात. तर काही दागिने बनवतात. तर काहीजण माळा बनवतात. तसेच मोती हा थंड असतो. त्यामुळे तो आपल्या शरीरावर घातल्यामुळे आपल्याला त्याचे फायदे होतात.

तर मित्रांनो, तुमच्या स्वप्नामध्ये असे दिसत असेल, तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात. तसेच मनात प्रश्न येतात की, स्वप्नात मोत्याची मला दिसली  ही शुभ असते की अशुभ असते? तसेच स्वप्नांमध्ये मोत्याची माळा येण्यामागे नेमके काय कारण असू शकते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण तुमच्यासाठी समाधानकारक उत्तर घेऊन आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात मोत्याची माळा दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात मोत्याची माळा दिसणे, हे स्वप्न शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये मोतीची माळा दिसणे, हे मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते  कारण तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये मोती कुठे दिसले? कोणत्या प्रकारे दिसले? कोणत्या अवस्थेत दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात..! 

वाचा  स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात मोती दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये मोती दिसणे हे शुभ मानले जाते. कारण मोठी हे शांत आणि संयमतेची प्रतीक आहे. तसेच ते थंड असते आणि जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये मोती दिसत असेल, तर त्याचा अर्थ आहे की, तुमच्या जीवनात चाललेले ताणतणाव आता हळू कमी होणार आहे. नकारात्मक ऊर्जा हळू कमी होणार आहे. असे संकेत ही स्वप्न देते. 

स्वप्नात मोतीची माळा दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये मोतीची माळा दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मानसन्मान मिळणार आहे. पदोन्नती मिळणार आहे. किंवा तुम्ही एखाद्या व्यवहारांमध्ये उतरणार आहे आणि त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात मोती खरेदी करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये मोती खरेदी करताना दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला लवकरच मोठे यश मिळणार आहे. किंवा अचानक धनलाभ होण्याची संकेत हे स्वप्न संभवत आहे. तसेच तुम्हाला लवकरच काहीतरी आनंदाची गोड बातमी मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात मोतीची माळा तुटलेली दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नांमध्ये मोतीची माळा  जर तुम्हाला तुटलेली दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला काही दिवस जड जाणार आहेत. म्हणजेच तुम्हाला त्रासदाय स्थिती निर्माण होणार आहे. कर्ज घ्यावे लागणार आहे. किंवा ताण-तणाव येणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात काळा मोती दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये काळा मोती दिसणे, हे स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्नशास्त्र नुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुम्हाला नुकसान होणार आहे. अडचणींचा सामना करावा लागणार आहे. किंवा काही दुखद: बातमी तुम्हाला मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात दशक्रिया विधी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्रीने हे स्वप्न मोती बघितला तर? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात जर एखाद्या अविवाहित स्त्री किंवा पुरुषाने मोतीचे स्वप्न बघितले तर, ते त्यांच्यासाठी शुभ संकेत देते. कारण त्याचा असा अर्थ आहे की, लवकरच तुमचा विवाह होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये आनंददायी गोष्टींची सुरुवात होणार आहे.

तसेच तुम्हाला मनासारखे वर किंवा वधू मिळणार आहे. व तुम्ही तुमच्या जोडीदार सोबत सुखाने आयुष्य जगणार आहेत. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात शिंपल्यांमध्ये मोती दिसणे

मित्रांनो, स्वप्ना शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला शिंपल्यामध्ये मोती दिसत असतील, तर ते अतिशय शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, आता तुमच्या जीवनातील चाललेले त्रासदायक स्थिती ताणतणाव नकारात्मक ऊर्जा कमी होऊन, तुम्ही सकारात्मकतेने पुढे जाणार आहे.

जीवनात आनंददायी गोष्टी तुमच्या घडणार आहे. तसेच सुखी आणि समाधानी आयुष्य तुम्ही जगणार आहे. तसेच लवकरच तुमच्या इच्छापूर्ती होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात मोती/ मोतीची माळा एखाद्या वैवाहिक स्त्रीने बघितला तर? 

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर मोती एखाद्या वैवाहिक स्त्रीने बघितला असेल, तर ते स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तिला तिच्या संसारामध्ये सुखद अनुभव येणार आहे. तसेच काहीतरी गोड बातमी मिळणार आहे. म्हणजेच ती गर्भवती होण्याची शक्यता आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात मोत्याचे दागिने दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न मध्ये मोत्याचे दागिने दिसणे हे खूप शुभ स्वप्न मानले जाते. त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करतात तिथे तुम्हाला प्रमोशन किंवा बढोतरी मिळणार आहे.

उच्च पद मिळणार आहे. तसेच भरघोस यश तुम्हाला मिळणार आहे. जीवनात सुखी आणि आनंदी संसार तुम्ही करणार आहे. तसेच व्यवसायामध्येही प्रगती करणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात बाळूमामा दिसणे शुभ की अशुभ

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्न मध्ये मोती दिसणे, किंवा मोत्याची माळा दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत.

तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

 

 धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here